शेयर करा

solar panel yojana

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोलर पॅनल योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सोलार पॅनल योजना (solar panel yojana) नक्की काय आहे, कोणासाठी आहे, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेत अनुदान किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

प्रस्तावना –

आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वरचेवर वाढ होत चाललेली आहे.त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत. त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना (solar panel yojana) राबवण्याचा विचार केला आहे.



रूफटॉप सोलर योजनेचा उद्देश –

1. रूफटॉप सोलर पॅनलच्या सहाय्याने मासिक घरगुती बिलात बचत करणे.
2. रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेऊन त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळवून देणे.
3. पारंपारिक उर्जा स्तोत्र वरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या योजनेचा उद्देश आहे.
4. राज्यातील व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.
5. राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
6. राज्यातील नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
7. राज्यावरील विजेचा भार कमी करणे.
8. प्रदूषण विरहित वीजनिर्मितीला प्रोत्साहन देणे.

रूफटॉप सोलर योजनेची वैशिष्ट्ये –

1. रूफटॉप सोलर योजना (solar panel yojana) महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
2. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येते.
3. रुफटॉप सोलर योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.
4. राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
5. या योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
6. अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.

रूफटॉप सोलर पॅनल योजनेचे लाभार्थी –

महाराष्ट्र जे नागरिक स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी इच्छुक आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

रूफटॉप सोलर योजना (pm solar rooftop yojana) चे फायदे –

1. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
2. या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान दिले जाईल.
3. या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते.
4. अंदाजे 25 वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.
5. 5 ते 6 वर्षात योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते.
6. रूफटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी 30 पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.



रूफटॉप सोलर योजना (pm free solar panel yojana 2023) साठी आवश्यक कागदपत्रे –

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. मोबाईल क्रमांक
3. अर्जदाराचे बचत बँक खाते
4. अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
5. अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदार संमतीपत्र
6. चालू विज बिल
7. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
8. अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
9. रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.

असा करा ऑनलाईन अर्ज –

1. सर्व प्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx या वेबसाइट वर जावे लागणार आहे.
2. वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं कस्टमर क्रमांक या ठिकाणी टाकून चेक करावे लागणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
3. पुढे गेल्यानंतर तुम्हाला वर तीन पर्याय दिले आहे या पहिल्या पर्यायात तुम्हाला तुमचं संपूर्ण फॉम भरायचा आहे.
4. त्यानंतर दुसऱ्या पर्यायात तुम्हाला तुमचे पेमेंट पूर्ण करावे लागणार आहे.
5. नंतर तिसऱ्या पर्यायात तुम्हाला तुमची एजन्सी सिलेक्ट करावी लागणार आहे
6. आणि नंतर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे या ठिकाणी आपलोड करावी लागणार आहे.
7. हे सर्व झाल्यानंतर तुमचं अर्ज या ठिकाणी पूर्ण होईल.

रुफटॉप सोलर योजनेअंतर्गत ( solar panel yojana) किती अनुदान दिले जाते?

1. घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.
2. 3 किलोवॅट व त्यापेक्षा अधिक 10 किलोवॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी 20 टक्के अनुदान दिले जाते.
3. गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सोलर पॅनल योजना (solar panel yojana) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1.सोलर रूफटॉप योजनेला (solar rooftop yojana) किती अनुदान दिले जाणार आहे?
उत्तर – रुफटॉप सोलर पॅनल योजनेला 40% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

2.रुफटॉप सोलर योजनेला कोण ऑनलाईन अर्ज करू शकतो?
उत्तर – भारतातील कोणताही नागरिक या योजनेला अर्ज करू शकतो.

3. सौर पॅनल बसवल्यानंतर किती दिवसात अनुदानाची रक्कम आपल्या खात्यावर जमा होते?
उत्तर – सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे प्रदान केलेल्या तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.

4. आपल्याला 2 किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी किती रुपये खर्च येतो?
उत्तर – सध्या 2 किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी 1.20 लाख रुपये खर्च येतो.यावर सरकारकडून तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.

लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा