शेयर करा

krushi yojana maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी प्रमुख व्यवसाय म्हणून लोक शेती हाच व्यवसाय करतात. महाराष्ट्राची नवीन तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबून आहे. आपला शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो, दिवसभर शेतात राबतो तेव्हा आपल्याला अन्न प्राप्त होते. म्हणून आपला भारत देश कृषिप्रधान म्हणजे शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपण आजच्या लेखामध्ये 2023 साठी कृषी विभागाच्या टॉप 10 योजना (krushi yojana maharashtra) पाहणार आहोत.

शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे

या लेखातील प्रमुख विषय

1) नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (namo shetkari yojana) –

– केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे.
– या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते.
– दर 4 महिन्याच्या अंतराने 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
– आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे.
– त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील.



2) १ रुपयात मिळणारी पीक विमा योजना ( pik vima yojana Maharashtra) –

– आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैटकीत राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे.
– यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे.
– याचा उर्वरित रकमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली होती.
– यासाठी अंदाजे ३,३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते.
https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर शेतकऱ्यांना लॉगिन करावे लागेल.

3) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र (Mukhyamantri saur krishi pump yojana) –

– राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत.
– ही गोष्ट लक्षात घेता, राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ च्या अंतर्गत सुरू केली असून,
– राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहेत.
– सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या ९५ टक्के अनुदान देते.
– लाभार्थीद्वारे केवळ ५ टक्के रक्कम खर्च केली जाईल.
– महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही.
– हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही.
– नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल.
– या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले आहे.
– महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे.
– जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल.
– सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल.
– या सर्व गोष्टींचा विचार करून हि योजना अमलात आणली आहे.
https://www.mahadiscom.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करावे.

4) एक शेतकरी एक डीपी (ek shetkari ek dp) योजना –

– महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी (krushi yojana maharashtra) राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता होती.
– तसेच १४ ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते.
– राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएस उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे.
– महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा – https://www.mahadiscom.in/

5) ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र (tractor anudan yojana maharashtra ) –

– या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे .
– अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
– यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेती विषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात आली आहे .
– या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्र ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे .
– राज्य सरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे.
– या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .
– राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.
– ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज करावा.

6) मागेल त्याला शेततळे योजना (magel tyala shettale yojana) –

— महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे.
– त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली.
– आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली.
– हि योजना शासनाची अत्यंत मात्वाकांक्षी योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाई ग्रस्त, संकटग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
– या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल.
– या मध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आणि आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
– आणि तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल, मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे.

अनुदान –
– या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे, इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून सामुदायिकरीत्या शेततळ्याची मागणी करता येईल.
– या शेततळ्याचे आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील.
– तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापार, पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार करावा आणि तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.
– शेतकऱ्यांनी https://egs.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर आपला अर्ज करावा.



7) पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना 2023 –

– राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रात मध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहीर, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते.
– सिंचन बरोबर शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्यासाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
– त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थ सहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.

अनुदान –
– नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (krushi yojana maharashtra) अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या उपघटकांचा साठी प्रतिहेक्टर अपेक्षित खर्चाचा तपशील हा शेततळ्याच्या आकारानुसार येणाऱ्या एकूण खर्चाचा रकमेच्या ५० टक्के अर्थसाहाय्य शेतकऱ्यांना देय राहील.
– इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

8) नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना (navin vihir yojana) –

– नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
– संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे हा योजनेचा हेतू आहे.

पोखरा अंतर्गत नवीन विहीर साठी अनुदान किती –
– नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीसाठवण निर्मिती म्हणजे नवीन विहिरी ची निर्मिती या घटकांतर्गत या घटकासाठी १०० टक्के अनुदान हे असणार आहे. ते दोन टप्प्यात देण्यात येईल, ते खालील प्रमाणे –
1. पहिला टप्पा – विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोत कामावर खर्च
2. दुसरा टप्पा – विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम १०० टक्के अनुदान रुपये २.५० लाख अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.
या योजनेसाठी (krushi yojana maharashtra) रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.

9) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( birsa munda krushi kranti yojana ) –

– शेतीसाठी मुख्य गोष्ट म्हणजे पाणी ,जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे .
– या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे .
– पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे पाणी स्वतःच्या शेतात करायला मदत मिळणार आहे .
– या योजनेद्वारे (krushi yojana maharashtra) राज्य सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिले आहे आणि कमी पाण्याच्या शेताला जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे.

राज्य शासन खालील प्रमाणे कृषी जलसिंचनावर शेतकऱ्याला अनुदान देणार आहे:-
– या योजनेअंतर्गत नवीन विहीर साठी रु. २. ५० लाख एवढे अनुदान देण्यात येईल.
– इनवेल बोअरींग साठी रु. २० हजार एवढे अनुदान देणार आहे
– पंप संचासाठी रु. २० हजार एवढे अनुदान देण्यात येईल.
– वीज जोडणीसाठी रु १० हजार एवढे अनुदान देण्यात येईल.
– शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी रु. १ लाख व सूक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच रु. ५० हजार किंवा तुषार सिंचन संच रु. २५ हजार ) एवढे अनुदान देण्यात येईल.
– पीव्हीसी पाईप वर रु. ३० हजार एवढे अनुदान देण्यात येईल.
– परसबाग यावर रु. ५०० एवढे अनुदान देण्यात येईल.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईटवर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल.



10. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना २०२३ (mukhyamantri shashwat sinchan yojana) –

– या योजनेअंतर्गत राज्यातील संपूर्ण 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करून लाभ घेता येणार आहे.जे पात्र आणि इच्छुक शेतकरी यांना जास्तीत जास्त पाच हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादित या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.
– मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 अनुदान किती दिलं जाईल?
– या योजनेअंतर्गत जे शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत.
– त्यांना 55% तर इतर शेतकऱ्यांना 45% क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर एवढ्या क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येणार आहे.
– शेतकऱ्यांनी या योजनेचा (krushi yojana maharashtra) लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.

सारांश | krushi yojana maharashtra –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील 2023 साठी कृषी विभागाच्या टॉप 10 योजना (krushi yojana maharashtra) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

१) 2023 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना काय आहे?
उत्तर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने मंगळवारी एक नवीन आर्थिक योजना आणली ज्या अंतर्गत राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातील.

२) शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी क्षेत्रात अनुदानाची गरज कशी होती?
उत्तर – कृषी अनुदान म्हणजे नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आणि अधिक अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ. ते शेतकर्‍यांना विशेषतः लहान शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देतात .

३) ट्रॅक्टर पॉवर टिलरला वित्तपुरवठा करण्यासाठी कर्जाची कमाल मर्यादा किती आहे?
उत्तर – 1.60 लाख रुपये रक्कम कर्जाची कमाल मर्यादा आहे.

४) मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात ?
उत्तर – सरकारने सॉईल हेल्थ कार्ड योजना, नीम कोटेड युरिया, परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY), राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM), प्रधानमंत्री फसल विमा यासारखे अनेक नवीन उपक्रम आणले आहेत. योजना (PMFBY) आणि व्याज अनुदान योजना.

शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे

लेखक

कृषि डॉक्टर टीम


शेयर करा