शेयर करा

us 7067 cotton seeds

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor या शेती बद्दल सर्व माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आपले स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकाच्या एका महत्वाच्या जातीबद्दल म्हणजेच यूएस 7067 (us 7067 cotton seeds) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होत आहे आणि खरीप हंगाम म्हणलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील प्रमुख पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जातं. भारतामध्ये कापूस पिकाला आपण पांढरे सोने देखील म्हणतो. भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जागतिक पातळीवरती कापूस पिकाला आता अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेला आहे. शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कापूस पिकाच्या पिकाबद्दल, लागवडीबद्दल चर्चा करत असतो. त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे की, यंदाच्या हंगामामध्ये कापूस पिकात कोणती वाण आपण लावायचं.

यूएस 7067 (us 7067 cotton seeds) साठी आवश्यक जमीन –

1. यूएस 7067 ही जात लावण्यासाठी आपल्याला जमीन ही मध्यम आणि भारी प्रकारची लागते.
2. तसेच या व्हरायटीसाठी बागायती जमीन सुद्धा चालते.
3. यूएस 7067 cotton seeds या वाणाचा कालावधी किती दिवसाचा आहे असा तुमचा प्रश्न असेल तर हे वाण 160 ते 170 दिवसाचे आहे.
4. या वाणाची लागवड तुम्हाला जर तुम्हाला भारी जमिनीत करायची असेल तर ४ बाय ४ वर करता येईल.
5. जर माध्यम जमीन असेल तर मात्र ४ बाय १.५ किंवा ४ बाय १ वर करू शकता आणि माध्यम जमिनीत 3 बाय 2 अंतरावर या कपाशीचे आपण लागवड करायला पाहिजे किंवा ३ बाय ३ हे अंतर चांगले राहील यात झाडाची संख्या वाढेल.



US 7067 (यूएस 7067) वाणासाठी लागणारे हवामान –

1. मित्रांनो कापसासाठी हे कोरडे हवामान खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते.
2. कापूस हे पीक उगवण्यासाठी 18 ते 22 सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असते.
3. तसेच कापसाच्या वाढीसाठी 24 ते 32 सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असते.
4. उष्ण दिवस आणि थंड रात्र हे कापसाचे बोंडे भरण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असते.

यूएस 7067 (us 7067 cotton seeds) या वाणाची ठळक वैशिष्ट्ये –

1. यूएस 70 67 हे सीड वर्क्स यूएस ॲग्री या कंपनीचे लवकरात लवकर येणारे वाण आहे.
2. साधारणता या वाणाला परिपक्व होण्यासाठी 160 ते 170 दिवसांचा कालावधी लागतो.
3. यूएस 7067 हे वाण मुख्यत्वे मे ते जून या दोन महिन्यांच्या कालावधीत पेरले जाते.
4. पेरणीचे अंतर – युएस 7067 या वाणासाठी दोन ओळींमधील अंतर तीन ते चार फूट ठेवावे आणि दोन रोपांमधील अंतर दीड ते दोन फूट असावे.
5. us 7067 या वाणाची उंची 150 ते 155 सेंटीमीटर झाड उंच होते.
6. या वाणाच्या बोंडांचे वजन पाच ते साडेपाच ग्रॅम भरते.
7. यूएस 7067 या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे आणि जास्त पाऊस झाला तरीही जास्त नुकसान होत नाही.
8. या वाणामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणावर होतो. तसेच हे वाण लाल्या रोगाविरुद्ध बनशील आहे.
9. यूएस 7067 या वाणाच्या बोंडांचा आकार मोठा असल्याने हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस पडले आहे.
10. बोंडांचा आकार मोठा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते.
11. यूएस 7067 या वाणाला पाच पाकळ्या असणारे बोंडे लागतात. त्यामुळे सरकी ची संख्या जास्त भेटते आणि उत्पादनात वाढ होते.
12. मध्यम ते भारी जमीन या वाणाच्या लागवडीसाठी योग्य.
13. कापूस वेचणीला सोपा आहे.
14. सर्व बोंड एकदाच वेचणीला येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याची अशी व्हरायटी आहे
15. दुबार पीक घेण्यासाठी हे वाण अतिशय चांगले आहेत.



us agriseeds cotton 7067 चे पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

1. सर्वसाधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात पेरलेल्या कपाशीला ८०० ते ९०० मि.लि. पाणी लागते.
2. कपाशीला पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेने कमी पाणी लागते. या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये, कारण जादा पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते.
3. पीक फुलो-यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते व बोंडे भरताना ती सर्वांत जास्त असते.
4. कपाशीच्या उगवण, पाते लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असणे जरुरीचे आहे.
5. पेरणी ओलाऊन करावी. नंतर ३ ते ४ दिवसांनी चिंबवणीचे पाणी द्यावे.
6. पावसाळा सुरु होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान व जमिनीनुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात पाऊसमान पाहून पाणी द्यावे.
7. मात्र दोन पाळ्यांत १५ ते २० दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेऊ नये. जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड सरी यापध्दतीने पाणी द्यावे.
8. पहिल्या पाळीला १ ली, ३ री, ५ वी याप्रमाणे साऱ्यात पाणी सोडावे व दुस-या पाळीला २ री, ४ थी, ६ वी याप्रमाणे साऱ्यात पाणी सोडावे.
9. यामुळे कपाशीला लागणाऱ्या पाण्यात सुमारे ३० टक्के बचत होते.

us agri cotton seeds 7067 चे खत व्यवस्थापन कसे करावे ?

1. कापूस लागवड च्या वेळेस 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश वापरावे. तसेच सुधारित वाणांसाठी हे प्रमाण 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश इतके ठेवावे.
2. us 7067 या वाणाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणी बरोबर आपण 10: 26 :26 आणि 12 :32 :16 प्रति एकरी एक बॅग दिली पाहिजे.
3. लागवडीपासून विद्राव्य खतांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे.
4. वाढीच्या अवस्थेमध्ये NPK 19:19:19 100 ग्रॅम+मायक्रोन्यूट्रिएंट 50 मिली प्रती 15 लिटर एक महिन्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे.
5. फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये 12:61:00 100 ग्रॅम+मायक्रो न्यूट्रिएंट 50 ग्रॅम प्रति 15 लिटर प्रमाणे फवारणी करावी.
6. बोंडाची साईज वाढवण्यासाठी 00:52:34+मायक्रो न्यूट्रिएंट ६०ग्रॅम फवारणी करावी.
7. बोंडे लवकर फुटण्यासाठी 00:00:50 100 ग्रॅम+मायक्रो न्यूट्रिएंट 60 ग्रॅम प्रमाणे प्रती 15 लिटर प्रमाणे फवारणी करावी.



us 7067 ची उत्पादन क्षमता किती आहे ?

युएस 7067 या वाणामुळे आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळू शकते.

यूएस 7067 किंमत | us 7067 cotton seeds price –

बाजारामध्ये युएस 7067 या वाणाची किंमत प्रति बॅग 800 ते 850 रुपये आहे.

Conclusion | सारांश-

शेतकरी मित्रांनो आशा करतो की Krushi Doctor Website वरील आमचा us 7067 या वाणाबद्दल लिहलेला हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला तर मग यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकाचा अधिक अभ्यास करुयात आणि कमी उत्पादन खर्चासह अधिक उत्पन्न घेऊयात. तुम्हाला जर कापूस पिकाबद्दल कोणतीही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेज ला नक्की भेट द्या.

 

लेखक,
कृषि डॉक्टर सूर्यकांत
मो – 9168911489


शेयर करा