शेयर करा

panjabrao dakh

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor या शेती माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही एखाद्या वरती कधी न कधी panjabrao dakh यांच नाव नक्कीच ऐकल असेल. महाराष्ट्रामध्ये सध्या हवामान अंदाज म्हणल की पहिल नाव कानावर येत ते म्हणजे परभणी मधील पंजाबराव डख यांच. २०२३ चा खरीप आता सुरू होणार आहे आणि पुनः एकदा शेतीच्या वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची. म्हणूनच आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत पंजाबराव डख यांच्याबद्दल सविस्तर मध्ये आणि जाणून घेणार आहोत तुमच्या पुढील प्रश्नाची अचूक उत्तरे. प्रश जसे की – पंजाब डख कोण आहेत ? डख यांचा हवामान अंदाज का ठरतो खरा ? पंजाब डख यांना किती शेती ? पंजाब साहेब यांचे शिक्षण काय झाले ? डख मोबाईल नंबर ?



1. panjabrao dakh कोण आहेत ?

– पंजाबराव डख” हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. पंजाबराव डख हे अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत.
– खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांपासून ते दूरचित्रवाणी वाहिन्यांपर्यंत पंजाबराव डख हे नाव सध्या चर्चेचा विषय आहे.
– पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे.
– कारण पंजाबराव डख यांचे भाकीत अवघ्या तीन मिनिटांत राज्यातील तीन कोटी (30 दशलक्ष) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.
– ते गाव – गुगळी धामणगाव, जिल्हा – परभणी, महाराष्ट्र येथेल एक शेतकरी आहेत.
– ते हवामान अंदाज पाहण्यासाठी संगणकाचा वापर करतात आणि उपग्रह नकाशाचा अभ्यास करून निरीक्षणांची नोंद करून अंदाज व्यक्त करतात.
– पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे.

( पंजाबराव डख प्रमाणेच नव्याने लॉंच झालेल्या IFFCO Nano DAP बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – IFFCO Nano DAP )

2. पंजाबराव डख यांचे शिक्षण किती झाले आहे ?

– पंजाब डख हे व्यवसायाने शेतकरी असून सध्या ते त्यांच्या गावातील शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
– कालांतराने, त्यांनी निसर्गाचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण, संगणक, उपग्रह आणि नकाशे यांचा वापर करून हवामान अंदाजात स्वारस्य विकसित केले आहे.
– त्यांनी C-DAC मध्ये एक कोर्स देखील पूर्ण केला आहे, ज्यामुळे त्याचे ज्ञान आणि हवामान अंदाजाची समज अधिकच वाढली आहे.

3. panjabrao dakh यांना नेमकी किती जमीन आहे ?

– पंजाबराव डख हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांच्याकडे वडिलांकडून वारशाने मिळालेली दहा एकर शेती आहे.
– पंजाबरावांनी हवामानाचा अंदाज लावण्यासाठी एक अनोखी पद्धत विकसित केली आहे, जी ते केवळ हवामानाचा अंदाज घेण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या कृषी पद्धती वाढवण्यासाठी देखील लागू करतात.
– आपल्या शेतात ते सोयाबीन आणि हरभरा अशी पीके घेतात आणि उत्कृष्ट उत्पादन मिळवतात. विशेषत:, पंजाबराव डाख यांना सोयाबीन आणि हरभरा लागवडीतून सुमारे आठ लाख (800,000) रुपयांचे वार्षिक उत्पादन मिळत आहे.



4. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज नेमका खरा कसा काय ठरतो ?

– शेतकरी मित्रांनो आता ही एक गुढच आहे.
– कारण हजारो कोटी रुपये खर्च ज्या ठिकाणी आपल्या शासकीय यंत्रणा फेल होतात त्याठिकाणी पंजाबरावांचा हवामान अंदाज हा तंतोतंत खरा होतो अस बऱ्याच शेतकऱ्यांच मत आहे.
– ज्यामुळेच की काय अवघ्या ३ मिनिटामध्ये त्यांचे अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतात.

( सूचना –पंजाबराव डख प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. )

5. panjabrao dakh यांना संपर्क कसा करायचा ? त्यांचा मोबईल नंबर काय आहे ?

– पंजाबराव डख हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेग-वेगळे What’s App Group ( panjabrao dakh whatsapp group )चालवतात. त्यांच्याकडे सध्या एकूण 560 ग्रुप आहेत. आणि ते वेळोवेळी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनल वरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत असतात.
– त्यांच्या यूट्यूब चॅनल ची लिंक आहे – https://www.youtube.com/@Panjabraodakhofficial .
– आणि त्यांचा अधिकृत मोबाइल नंबर आहे – 9158101052.



Conclusion | सारांश –

चला तर शेतकरी मित्रांनो, आशा करती की krushi Doctor वेबसाइट वरील आमचा ( panjabrao dakh: एक आधुनिक हवामान तज्ञ ! )  हा ब्लॉग तुम्हाला आवडला आहे आणि येत्या हंगामात याचा नक्कीच तुम्हाला भरगोस फायदा देखील होईल. परंतु शेतकरी मित्रांनो शेवटी माझी सर्वांना एक विनंती आहे की कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय एखाद्या माहिती वरती विश्वास ठेवणे कधीही धोक्याचे आहे. त्यामुळे आपण शासकीय हवामान तज्ञ यंत्रणा आणि मा. पंजाबराव डख या दोघांची माहिती स्वता तपासून निर्णय घ्यावा.

 लेखक
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489


शेयर करा