नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषी डॉक्टर (Krushi Doctor) परिवारामध्ये आपले स्वागत आहेत. आज आपण “टोमॅटो लागवडीची (tomato lagwad) संपूर्ण माहिती: एकरी 3 ते 3.5 हजार क्रेटसचा फॉर्म्युला“ या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. टोमॅटो पिकाची लागवड महाराष्ट्रात सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये होते परंतु सर्वात जास्त लागवड नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा जिल्ह्यामध्ये होते. पिकाचे नवीन नवीन वाण, अचानक भावातील चढ उतार , बाजारपेठांची उपलब्धता या मुळे सध्या लागवड क्षेत्रातील वाढ दिसून येते आहे. उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय लागवड पद्धतीवर भर देणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या लेखामध्ये या सर्व गोष्टींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक जमीन –
१. टोमॅटो लागवडीसाठी पोयट्याच्या किंवा चिकन मातीच्या जमीनी चांगल्या मानवतात.
२. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
३. पाण्याचा चांगला निचरा न होणारी आणि काळी रेगूर मातीमध्ये लागवड केल्यास फुलगळ आणि कमी वाढ यासारख्या समस्या दिसून येतात.
४. लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ -७.५ असणे आवश्यक असते.
टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक हवामान –
१. टोमॅटो पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी कमी आर्द्रता, कोरडे आणि उष्ण प्रकारचे हवामान आवश्यक असते. ढगाळ आणि अति जास्त पाऊस पिकाला अपायकारक असतो, ज्या मुले फुलगळ दिसून येते.
२. पिकाला चांगल्या उत्पादनासाठी २०- ३० अंश सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. परंतु १५ अंश से. पेक्षा कमी आणि ३८ अंश से. पेक्षा जास्त तापमानात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो.
टोमॅटो पिकाच्या वाढ अवस्थेनुसार तापमानाची आवश्यकता –
पीक अवस्था | आवश्यक तापमान (अंश से) |
अंकुरण / उगवण | १६-१९ अंश |
वनस्पतिक वाढ अवस्था (Vegetative growth) | २१-२४ अंश |
फुलोरा आणि फळधारणा अवस्था | रात्रीचे तापमान – १३-१८ अंश | दिवसाचे तापमान – १९-२४ अंश |
टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक जाती / वाण –
विविध खाजगी कंपन्यांनी टोमॅटोचे संकरित वाण विकसित केले आहेत. त्यापैकी खालील काही वाण मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापरले जातात.
वाणाचे नाव | कंपनी | वैशिष्ठे |
आर्यमान | सेमिनीस सीड्स | फळांची तोडणी 60-65 दिवसानंतर लावणीनंतर, TYLCV व्हायरस ला सहनशील, लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चांगली गुणवत्ता. |
TO २०४८ (मेघदूत) | सिंजेंटा इंडिया | लांब बाजारासाठी योग्य, फळांचा एकसमान आकार, खरीप हंगामासाठी शिफारस |
US ४४० | ननहेम्स | खरीप आणि रब्बी हंगामासाठी, ८०-१०० ग्रॅम पर्यंतची एकसमान गोल फळे |
प्रेशियस | क्लोज सीड्स | मोठे ,वजनदार ,अंडगोलाकार ,गर्द लाल व टणक फळ, लांबच्या वाहतुकीसाठी योग्य, ९०-१२० ग्राम पर्यंत एकसमान फळ, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस |
अनिशा | सैवी सीड्स | लागवडीनंतर ७० दिवसांनी पहिली तोडणी, ९०-१०० ग्राम पर्यंत गोल आकाराची लाल फळे, येल्लो लीफ कर्ल व्हायरस प्रतिकारक्षम, जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य मर रोगासाठी प्रतिकारक्षम, चांगली टिकावण क्षमता. |
अंसल | सेमिनीस सीड्स | ८०-१०० ग्रामपर्यंत एकसमान आकाराची फळे, उन्हाळी हंगामासाठी शिफारस, लांबच्या वाहतुकीसाठी योग्य. |
जयम २ | ऍडव्हांटा सीड्स | उन्हाळी हंगामासाठी चांगले वाण, लागवडीनंतर ६०-६५ दिवसांत पहिली तोडणी, उच्च उत्पादन क्षमता, येल्लो लीफ कर्ल व्हायरस प्रतिकारक्षम, लांबच्या वाहतुकीसाठी चांगले वाण. |
TO ३२५१ (साहो) | सिंजेंटा इंडिया | तीनही हंगामासाठी लागवड शिफारस, ८०-१०० ग्राम पर्यंत एकसमान फळ |
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक बियाणे दर –
एक एकर पुनर्लागवड करण्यासाठी बियाणे दर ५० – ६० ग्रॅम प्रति एकर आवश्यक असतो.
पुनर्लागवडीसाठी रोपांची निवड –
- रोपांचे वय २५-३० दिवस असावे.
- जेव्हा पाने गडद हिरव्या रंगाची होतात आणि देठ जाड होतात तेव्हा रोपे लागवडसाठी तयार होतात.
टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक हंगाम –
महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड प्रत्येक हंगामात बाजारभाव लक्षात घेऊन ठेवली जाते.
टोमॅटो लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी ?
- लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी सर्वप्रथम रोटाव्हेटर ने रोटरनी किंवा नांगरणी करून घ्यावी.
- शेतामध्ये नांगरणी झाल्यानंतर रोटरनी करण्याच्या आधी एकरी ३ टन चांगले कुजलेले शेणखत त्यामध्ये ३ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळून शेतात पसरावे.
टोमॅटो लागवड २ पद्धतींनी होते –
१. पाट पाण्यावर लागवड करण्यासाठी ४ फूट सारी काढावी.
२. बेड वर लागवड करण्यासाठी ३ फूट रुंद, २० सेमी उंच आणि शेताच्या लांबीनुसार लांब असा बेड तयार करावा.
बेड वर लागवड करण्यापूर्वी खतांचा बेसल डोस मातीत मिसळून ठिबक संच अंथरावा त्यानंतर मल्चिंग पेपर (२५ मायक्रॉन जाडी) पसरावा.
टोमॅटो रोपांची लागवड –
- टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. तसेच बेडवर लागवड करण्याआधी १ दिवस आधी पाण्याने चांगला भिजवून घ्यावा.
- लोखंडी होल मेकर किंवा पाईपच्या मदतीने मल्चिंग पेपरवर लावणीसाठी १०० मिमी-१२० मिमी व्यासाचा छिद्र तयार करावा.
- लागवड करण्यासाठी १ फूट – १.५ फुटांवर नागमोडी पद्धतीने छिद्र पाडावीत.
टोमॅटो खत व्यवस्थापन –
१. लागवड करण्यापूर्वी डीएपी – ४० किलो + एमओपी ३० किलो प्रति एकरी द्यावे. तसेच एकरी ५ किलो मॅग्नेशियम सल्फेट, गंधक ८ किलो प्रति एकरी द्यावे.
२. टोमॅटो पिकामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, फेरस, झिंक यांच्या सोबतच फुलोऱ्या दरम्यान फळांचा आकार आणि रंग चांगला तयार होण्यासाठी बोरॉन, मॅग्नेशियम यांची आवश्यकता भासते.
३. लागवडीनंतर ३५ दिवसांनी डीएपी ४० किलो, कॅलसियम नायट्रेट ३ किलो आणि बोरॉन १ किलो जमिनीतून द्यावे.
४. फवारणीमधून खते देताना लागवडीनंतर २० दिवसांनी १२:६१:०० – ३-५ ग्राम + चिलेटेड कॅल्बोर १ ग्राम प्रति ली पाणी प्रमाणात फवारणी करावी.
५. पुनर्लागवडीनंतर फुले वाढण्यासाठी २०, ४०,६० दिवसानंतर ट्रायकोन्टेनॉल ०.१% ईडब्ल्यू (मिराकुलोन- डाऊ ) @ १. २५ मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करा.
टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक सिंचन –
- ठिबक – जमिनीच्या प्रकारानुसार २-३ दिवसांच्या अंतराने
- पाटपाणी – ८-१० दिवसानंतर (हिवाळा), ६-८ दिवसांच्या अंतराने (उन्हाळा) द्यावे.
- फुलोरा कालावधीत जास्त पाणी दिल्यामुळे फुलांची गळ वाढून फळांचे सेटिंग कमी होते.
- फळवाढीच्या दरम्यान जास्त पाणी देणे आणि पाण्याचा ताण देणे टाळावे कारण यामुळे फळांना तडे जातात .
टोमॅटो पिकातील कीड व रोग –
टोमॅटोवर नाग आळी, टूटा अबसोल्यूटा, थ्रिप्स, पांढरी माशी, फळ पोखरणारी कीड, लाल कोळी, सूत्रकृमी या सारख्या किडींचा तर करपा, फळांवरील जिवाणूजन्य ठिपके, तिरंगा, मर रोग, प्लास्टिक व्हायरस या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकातील कीड व रोग व्यवस्थापन हा खूप मोठा विषय आहे, तर यासाठी आपण एका दुसऱ्या लेखामध्ये मार्गदर्शन करू.
टोमॅटो काढणी आणि उत्पादन –
- रोप लागवडी नंतर फळांची तोडणी वाणांनुसार ७०-८० दिवसांत सुरु होते.
- एकरी 2500 ते 3000 क्रेट उत्पादन मिळू शकते.
Conclusion | सारांश –
अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor Website वरील आमचा “टोमॅटो लागवडीची (tomato lagwad) संपूर्ण माहिती: एकरी 3 ते 3.5 हजार क्रेटसचा फॉर्म्युला” हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आपण जर वरील माहितीनुसार आपल्या टोमॅटो पिकाची लागवड आणि व्यवस्थापन केले , तर आपण देखील सहज पने कमी उत्पादन खर्चासह टोमॅटो पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो.
FAQ | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. टोमॅटो किती दिवसाचे पीक आहे?
उत्तर – टोमॅटो पिकाचा कालावधी हा लागवडीच्या प्रकारावर अवलंबून असतो. जर आपण ड्रीप वर टोमॅटो लावले असेल तर तुमचे टोमॅटो पीक हे 140 ते 150 दिवसात निघून जाईल. जर आपण मोकळे म्हणजे पाटपाणी पद्धतीचा अवलंब केला असेल तर हाच कालावधी – 120 ते 130 दिवसाचा होऊ शकतो.
2. टोमॅटो पिकाचे एकूण किती तोडे निघतात ?
उत्तर – लागवड पद्धत, हंगाम आणि व्यवस्थापनानुसार तुम्ही टोमॅटो पिकाचे एकूण 5 ते 10 तोडे घेऊ शकता.
3. टोमॅटो पिकाला पानी हे किती दिवसाच्या अंतराने द्यावे ?
उत्तर – टोमॅटो पिकाला लागवड पद्धत, हंगाम आणि व्यवस्थापनानुसार ड्रीप पद्धतीमध्ये – 3 ते 5 दिवसाच्या अंतराने तर पाटपानी पद्धतीमध्ये – 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पानी द्यावे.
लेखक –
कृषि डॉक्टर टीम