शेतकरी मित्रांनो नमस्कार ! धान्य काढणी नंतर बरेच शेतकरी शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी काढणी केलेले धान्य घरामध्ये किंवा वेअर हाऊस मध्ये साठऊन ठेवतात. परंतु धान्य साठवण (grain storage) व्यवस्थापण जर चुकीच्या पद्धतीने झाली तर धान्याचे बरेच नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे पीक काढणी नंतर धान्य साठवणूक पद्धत आणि साठवणुकी दरम्यान कीड व रोग व्यवस्थापन हा मुद्दा देखील आता महत्वाचा ठरत आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी आज “धान्य साठवण (grain storage) व्यवस्थापण: संपूर्ण स्टोरेज प्लॅन” हा विषय सविस्तर मध्ये पाहणार आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख संपूर्ण वाचा आणि लेखाच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका . चला तर मर वेळ न घालवता सुरू करूया.
धान्य साठवणूक (grain storage) मधील महत्वाचे 2 मुद्दे –
1. धान्य साठवण पद्धत
2. साठवणुकी दरम्यान कीड व रोग व्यवस्थापन
( अशी घ्या धान्य साठवण पद्धत या विषयाचा विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Youtube Channel )
1. धान्य साठवण (grain storage) पद्धत –
अ) साठवणूक जागा स्वछता –
1. धान्य साठवणुकीची जागा स्वच्छ आणि निर्जंतुकीकरन करून घेणे खूप गरजेचे आहे.
2. तसेच आपण ज्या वाहनामधून धान्य वाहतूक करणार आहोत त्यांना देखील स्वछ करणे तितकेच आवश्यक आहे.
3. कारण वाहतुकी दरम्यान धान्याला कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.
4. धान्य साठवणूक जागेत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
ब) धान्यातील ओलावा व्यवस्थापन –
1. धान्य काढणी केल्यानंतर आपण जर ते धान्य तसेच साठवून ठेवले तर त्या दाण्यांमध्ये खूप आद्रता असते, त्यामुळे त्यात ओलावा जास्त असतो.
2. ओलावा जास्त असलेल्या धान्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा तसेच किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते.
3. त्यामुळे धान्य साठवणी पूर्वी आपल्याला ते धान्य चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये वाळवून घेणे गरजेचे असते.
4. ज्यामुळे त्या धान्याची आद्रता म्हणजेच ओलावा कमी होईल.
5. धान्याचा ओलावा 8 ते 10 टक्के राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.
6. 8 ते 10 टक्क्यांपेक्षा कमी ओलावा असेल तर धान्यांमध्ये कीड आणि रोग खूप कमी येतात.
क) पोत्याची थप्पी लावण्याची योग्य पद्धत –
1. धान्य चांगल्याप्रकारे उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर ते आपल्याला चांगल्या प्रकारच्या नवीन गोण्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये भरायचे आहे.
2. ज्यावेळेस आपण धान्याच्या पोत्यांची थप्पी लावत असतो त्यावेळेस आपल्याला पुढील गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
3. थप्पी भिंतीपासून अर्धा ते एक मीटर लांब लावायची आहे. म्हणजेच भिंती आणि पोत्यामध्ये आपल्या थोडासा अंतर ठेवायचा आहे.
4. तसेच पोत्यांची थप्पी ही थेट जमिनीवर न ठेवता आपल्याला थप्पी खाली लाकडाची फळी ठेवायचे आहे.
5. जेणेकरून पोत्याचा आणि जमिनीचा डायरेक्ट संपर्क येणार नाही. दोन थप्पी दरम्यान तसेच भिंतीच्या दरम्यानची जी जागा शिल्लक राहील.
6. ती आपल्याला जर आठवड्यातून एकदा स्वच्छ करून घ्यायची आहे.
( धान्य साठवण पद्धत प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
2. साठवणुकी (grain storage) दरम्यान कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे ?
अ) तापमान नियंत्रण –
वातावरणामधील बरेच कीटक आणि रोग तापमानाशी खूप संवेदनशील असतात. म्हणजेच आपण जर साठवणूक ग्रहातील तापमान जर 8 ते 9 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी केले तर त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव हो खूप कमी होतो. आपण जर साठवणूक ग्रहातील तापमान 50 ते 60 अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त केले तर त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटाच्या आत किडी मरण पावतात. त्यामुळे तापमान नियंत्रित ठेलयाने धान्य साठवणूक खूप चांगल्या प्रकारे होते. आणि खूप जास्त दिवसासाठी आपण धान्य साठवणूक निरोगी पद्धतीने करू शकतो.
ब) ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड नियंत्रण –
धान्य साठवणूक ग्रहातील ऑक्सिजन जर एक टक्क्याने कमी केला तसेच धान्य साठवणूक राहतील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण जर 8 ते 9 टक्के इतके ठेवले तर त्याठिकाणी किडी जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड नियंत्रित करून देखील आपण धान्य साठवणूक खूप चांगल्या प्रकारे आणि निरोगी पद्धतीने करू शकतो.
क) औषधांचा वापर –
धान्य साठवनुकी पूर्वी आपण जर धान्यावरती मोहरी तसेच शेंगदाण्याचे तेल 7 ते 8 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात जर चोळले तर कडधान्य सारखे धान्य जवळजवळ 8 ते 9 महिन्या पर्यंत निरोगी होऊ शकते. आणि त्यांचे भुंग्यापासून देखील चांगले संरक्षण होऊ शकते. आपण जर धान्य साठवणूक ग्रहांमध्ये निंबोळी पावडर 5% उपयोग केला तरी देखील खूप चांगल्या प्रकारे कीड नियंत्रण होऊ शकते.
Conclusion | सारांश –
अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो, धान्य काढणीनंतर धान्याच्या साठवणुकीचे जर आपण नियोजन केले तर धान्य आपण चांगल्या आणि जास्त दिवसांपर्यंत साठवून ठेवू शकतो. आणि ज्या वेळेस धान्यांना चांगल्या प्रकारचे मार्केट भाव येतील त्या वेळेस ते धान्य मार्केटमधे विकू शकतो. मित्रांनो Krushi Doctor वेबसाईट वरील आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रा बरोबर शेअर नक्की करा धन्यवाद.
FAQs | सारांश –
1. धान्य साठवणुकीचा अर्थ काय?
उत्तर – धान्य साठवणुक म्हणजे पीक कंपनी नंतर निघालेले धान्य पुढील संपूर्ण वर्षासाठी एका विशिष्ट पद्धतीने साठवणे. ज्यामुळे धान्य सडत किंवा कुजत नाही. आणि त्याची गुणवत्ता टिकून राहते.
2. धान्य साठवण्याची पद्धत काय आहे?
उत्तर – तश्या पहिल्या तर धान्य साठवून ठेवन्याच्या विविध पद्धती आहेत. पण काही प्रचलित पद्धती पाहिल्या तर – धान्य कडक उन्हात वाळवने, धान्याला विशिष्ट कीटकनाशक व बुरशीनाशकांची प्रक्रिया करणे, धान्य कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवणे, धान्य कोरड्या जागी पोत्यामध्ये थप्पी लाऊन ठेवणे, धान्य कोठयामध्ये किंवा कनग्यामध्ये ठेवणे इत्यादि.
3. धान्य साठवण संरचना काय आहेत?
उत्तर – उथळ धान्य साठवण रचना म्हणजे चौरस, गोलाकार किंवा आयताकृती मजल्याचा आराखडा ज्यामध्ये इमारतीची रुंदी किंवा व्यास भिंतीवरील धान्याच्या समतुल्य उंचीच्या दुप्पट आहे अशा धान्य साठवणुकीची संरचना म्हणून परिभाषित केले जाते.
4. धान्य साठवण्याचे दोन मार्ग कोणते?
उत्तर – धान्य साठवण्यासाठी प्रामुख्याने – गोणपाट (सूती किंवा प्लॅस्टिक) किंवा स्टीलची स्टोरेज भांडी यांचा वापर केला जातो.
5. धान्य साठवण्यासाठी उत्तम जागा कोठे आहे?
उत्तर – धान्य साठवण्यासाठी कोरडी आणि वातावरण नियंत्रित असलेली जागा अतिशय योग्य आहे.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत (इर्लेकर)
मो. 9168911489