शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवारामध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे हरभरा हे पीक रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. हरभरा हे पीक महाराष्ट्र मध्ये जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. हरभरा पिकामध्ये तस पाहिल तर जास्त कीड आणि रोग येत नाहीत परंतु रोगामध्ये मर रोग आणि किडीमध्ये घाटे आळी हे प्रमुख आहेत.घाटे आळीचा प्रादुर्भाव हा फुलोरा नंतर सुरुवातीचे घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये तसेच घाटे विकासाच्या अवस्था मध्ये झालेला दिसून येतो. बरेच शेतकरी हरभरा घाटे अळी नियंत्रण (gram pod borer) करण्यासाठी वेगवेगळ्या जालीम कीटकनाशकांच्या फवारण्या घेत असतात. तरी देखील त्यांना घाटे आहे शंभर टक्के नियंत्रण करणे शक्य होत नाही. परिणामी आपला हरभरा उत्पादनाचा खर्च वाढत जातो आणि येणारे उत्पादन देखील कमी होते. चला तर मग पाहूया हरभरा पिकातील घाटेआळीचे एकात्मिक नियंत्रण कसे केले जाते –
अ) हरभरा घाटे अळी (gram pod borer) प्रतिबंधात्मक उपाय –
1. लागवडीपूर्वी जमिनीची खोलवर नांगरट करावी.
2. पिकाच्या मध्ये-मध्ये मका व ज्वारी ची ताटे लावावीत.
3. प्लॉट जास्तीत – जास्त तनमुक्त ठेवावा.
4. एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत.
( हरभरा घाटे अळी नियंत्रनाची संपूर्ण माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Youtube Channel )
ब) हरभरा घाटे अळी (gram pod borer) उपचारात्मक उपाय –
1. इंडोक्साकार्ब 14.5% SC – 0.8 मिलि / लीटर पानी ( किंगडोक्सा, घरडा केमिकल्स )
2. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 sc – 0.3 मिलि / लीटर पानी ( एफएमसी कंपनीचे कोराजन )
3. फ्लुबेन्डियामाइड 480SC (39.35% w/w) -100 मिलि / एकर ( बायर कंपनीचे फेम )
4. एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी – 0.25 ग्राम / लीटर पानी ( यूपीएल कंपनीचे प्रोक्लेम )
क) काही महत्वाच्या सूचना –
1. फवारण्या ह्या शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर घ्यावा.
2. फवारणीसाठी पानी हे अनुकूल ph चे घ्यावे. ( 6.5 ते 7.5 )
3. फवारणी करताना वाऱ्याचा वेग जास्त नसू नये.
4. फवारणी करताना मातीमध्ये ओलावा असावा.
5. फवारणी मिश्रण ( द्रावण ) तयार करताना त्यामध्ये स्टीकर अवश्य मिसळावे.
6. आणि फवारणीमध्ये विनाकारण एकापेक्षा जास्त घटक मिसळू नये.
( हाभरा पिकाप्रमाणेच आमची इतर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
Conclusion | सारांश –
अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या हरभरा पिकाचे नियोजन केले तर तुम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे कमी उत्पादन खर्चासह चांगल्या प्रकारच उत्पन्न घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो Krushi Doctor Website वरील दिलेली माहिती आणि “हरभरा घाटे अळी (gram pod borer) नियंत्रण: जाणून घ्या संपूर्ण फवारणी वेळापत्रक” हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकरी मित्रासोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका विषयासह तूर्तास धन्यवाद .
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. हरभरा शेंगा बोअरचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – लागवडीपूर्वी जमिनीची खोलवर नांगरट करावी. पिकाच्या मध्ये-मध्ये मका व ज्वारी ची ताटे लावावीत. प्लॉट जास्तीत – जास्त तनमुक्त ठेवावा. एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत. आणि प्रादुर्भाव वाढल्यानंतर शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
2. हरभरा पीक किती दिवसाचे आहे?
उत्तर – हरभरा पिकाचा कालावधी हा जाती नुसार वेग-वेगळा असू शकतो. पण सरासरी हरभरा पीक ही 100 ते 110 दिवसात काढणीला येते.
3. हरभरा शेंगा बोअरर म्हणजे काय?
उत्तर – ही एक हरभरा पिकातील कीड आहे. याचे शास्त्रीय नाव – ग्रॅम पॉड बोअरर (हेलिकव्हरपा आर्मिगेरा हबनर) हे आहे. जी हरभरा पिकाच्या घाट्यामध्ये जाऊन आतील दाना खाऊन टाकते.
4. चणे कोठून येतात?
उत्तर – तसे पाहिले तर जगभरातील सर्वाधिक उत्पादन हे भारत देशामध्ये घेतले जाते परंतु जगातील इतर 550 हूं अधिक देशामध्ये चणा म्हणजेच हरभरा पिकाचे उत्पादन घेतले जाते.
5. हरभऱ्याचे उत्पादन कोणता देश करतो?
उत्तर – तसे पाहिले तर जगभरातील सर्वाधिक उत्पादन हे भारत देशामध्ये घेतले जाते परंतु जगातील इतर 550 हूं अधिक देशामध्ये चणा म्हणजेच हरभरा पिकाचे उत्पादन घेतले जाते.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत (इर्लेकर)
मो. 9168911489