शेयर करा

chilli thrips control

शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांच पुनः स्वागत आहे कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवारामध्ये. तुम्हाला तर माहीत आहे, की मिरची हे पीक म्हणल की मिरची पिकातील थ्रिप्स आलीच. आणि थ्रिप्स कीड म्हणल की भरमसाठ कीटकनाशकांच्या फवारण्या देखील आल्या. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला खूप साऱ्या फवारण्या घेऊन देखील म्हणावे असे यश मिळत नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की “मिरची पिकातील थ्रिप्स (chilli thrips control) नियंत्रण कसे करावे?”. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया –



मिरचीवरील थ्रिप्स किडीचा जीवनक्रम (thrips life cycle) –

1.थ्रिप्स किडीच्या प्रामुख्याने अंडी, पिले आणि प्रौढ अशा तीन अवस्था असतात.
2. थ्रिप्स किडीची मंदी ही जवळ-जवळ 150 अंडी घालू शकते व ती अंडी उबण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात.
3. अंड्यामधून जी पिल्ले बाहेर येतात, ती फिकट रंगाची असतात ज्यांना पंख नसतात.
4. पूर्ण वाढ झालेली पिल्ले नंतर जमिनीमध्ये कोषावस्थेत जातात. आणि ही कोषावस्था २-३ दिवस राहू शकते,
5. कोशामधून निघणारा प्रौढ हा सर्वसाधारणपणे ६ ते ९ दिवस जगू शकतो.
6. अश्या प्रकारे थ्रिप्स किडिचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस लागतात.

( मिरची पिकावरील थ्रिप्स नियंत्रनाची संपूर्ण माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा –  Krushi Doctor Youtube Channel )

मिरचीवरील थ्रिप्सची लक्षणे (thrips symptoms in chilli) –

1. थ्रिप्स किड ही खूप लहान असते, जी की आपण डोळ्याने खूप कष्टाने पाहू शकतो.
2. थ्रिप्स कीड ही पानाच्या खालच्या बाजूला जास्त आणि वरच्या बाजूला अंशत कमी प्रमानात नुकसान करते.
3. थ्रिप्स ही कीड डायरेक्ट पानामध्ये सोंड खुपसून रसशोषण करत नाही, ते अगोदर पान वरच्या जबड्याने ओरबडतात आणि त्यातून निघणारा रस शोषून घेतात.
4. त्यामुळे आपल्याला मिरची पिकाच्या पानावर तसेच फळावर ओरखडे ओडल्या सारखे निशाण दिसतात.
5. मिरची पिकावर थ्रिप्स किडीच्या प्रादुर्भावामुळे मिरची पिकाची पाने वेडी-वाकडी होतात, आणि वरील बाजुस वळलेल्या दिसून येतात.
6. परिणामी झाडाची वाढ खुंटते आणि फळ, फूल आणि पानांची गुणवत्ता खूप खालवते.

मिरचीवरील थ्रिप्सचे एकात्मिक व्यवस्थापन ( chilli thrips control ) –

अ) प्रतीबंधात्मक उपाय (chilli thrips control) –

1. शेताची खोल नांगरट करावी.
2. नांगरटीनंतर शेत उन्हामध्ये 7 ते 8 दिवस चांगले तापू द्यावे.
3. निरोगी रोपांची आणि बियाण्याची निवड करावी.
2. लागवडी पूर्वी बीज आणि रोप प्रक्रिया अवश्य करावी.
– बियाणे पेण्यापूर्वी बियाण्यांची बीजप्रक्रिया करताना कार्बेन्डाझिम ५० डब्लूपी (धानुस्टीन- धानुका ऍग्रीटेक) २.५ ग्राम+ इमिडाक्लोप्रिड १७.८ एस एल (कॉन्फिडोर- बायर क्रॉप सायन्स) ०.५ मिली प्रति ली पाणी प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यावर चोळावे. त्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी साठी वापरावे. किंवा
– लागवड करताना रोपांच्या मुळांची प्रक्रिया कार्बॉक्सिन ३७.५%+ थायरम ३७.५% (विटावाक्स पावर- धानुका) ३ ग्राम प्रति ली पाणी या प्रमाणात मिसळून करावी.
4. मिरची लागवड केल्यानंतर एकरी 13 पिवळे आणि 12 निळे चिकट सापळे लावावेत.
5. माती परीक्षण आधारित मिरची पिकाचे खत व्यवस्थापन करावे. उरिया खताचा अतिशय संतुलित वापर करावा.
6. पाण्याचा अतिरेक टाळावा. गरजेनुसार पानी द्यावे.
7. प्रादुर्भाव कमी असताना –
– निंबोळी अर्क ( 5% ) – 2 मिलि
– अझाडीरॅक्टिन – ( 1500 ppm ) – 2 मिलि
– ब्युवेरिया बसियाना – 5 ग्राम
– व्हर्टिसिलियम लेकॅनी – 5 ग्राम
( वरील प्रमाण हे 1 लीटर पाण्यासाठी आहे. )

( मिरची प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )

ब) निवरात्मक उपाय (best insecticide for chilli thrips) –

मिरची पिकातील थ्रिप्स किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर खालील कीटकनाशकांची फवारणी करावी.

1. एसीटामिप्रिड 20% एसपी – 1 ग्राम ( धनप्रीत , धानुका )
2. सायन्ट्रानिलिप्रोल 10.26% OD – 2 मिलि ( बेनेव्हिया, FMC )
3. एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी – 4 ग्राम ( प्रोक्लेम , सिंजेन्टा )
4. स्पिनेटोरम 11.7% SC —–> 3 मिलि ( Largo , Dhanuka )
5. फीप्रोनील 5% एससी —–> 3 मिलि ( Regent , Bayer )
6. थायामेथोक्सम 25% Wg —–> 0.2 ग्राम ( Actra , Syngenta )

क) काही महत्वाच्या सूचना –

1. फवारण्या ह्या शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर घ्यावा.
2. वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे 1 लीटर पाण्यासाठी आहे.
3. फवारणीसाठी पानी हे अनुकूल ph चे घ्यावे. ( 6.5 ते 7.5 )
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग जास्त नसू नये.
5. फवारणी करताना मातीमध्ये ओलावा असावा.
6. फवारणी मिश्रण ( द्रावण ) तयार करताना त्यामध्ये स्टीकर अवश्य मिसळावे.
7. आणि फवारणीमध्ये विनाकारण एकापेक्षा जास्त घटक मिसळू नये.



Conclusion | सारांश –

अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मिरची पिकामध्ये जर थ्रिप्स (chilli thrips) किडीचे नियोजन केले तर तुम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे कमी उत्पादन खर्चासह मिरची पिकावर येणाऱ्या थ्रिप्स किडीचे नियंत्रण करू शकता. शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor वरील दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकरी मित्रासोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका विषयासह तूर्तास धन्यवाद .

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. मिरचीच्या थ्रिप्सपासून कशी सुटका मिळेल?
उत्तर – या साठी तुम्हाला – एसीटामिप्रिड 20% एसपी, सायन्ट्रानिलिप्रोल 10.26% OD, एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी, स्पिनेटोरम , फीप्रोनील 5% एससी किंवा थायामेथोक्सम 25% Wg अशा कीटकनाशकांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे.

2. सिमला मिरचीमध्ये थ्रिप्स कसे नियंत्रित करता?
उत्तर – सिमला मिरचीमध्ये थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला पुढील कीटकनाशकांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. – एसीटामिप्रिड 20% एसपी, सायन्ट्रानिलिप्रोल 10.26% OD, एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी, स्पिनेटोरम , फीप्रोनील 5% एससी किंवा थायामेथोक्सम 25% Wg.

3. मिरची थ्रीप काय खातात?
उत्तर – मिरचीवरील थ्रीप किडे पानावर ओरबाडून आतील रसशोषून घेतात आणि त्यावरच उपजीविका करतात. परिणामी आमच्या पिकाचे खूप नुकसान होते.

4. मिरचीसाठी कोणते कीटकनाशक चांगले आहे?
उत्तर – मिरची पिकासाठी तुम्ही पुढील कीटकनाशकांची निवड करू शकता – एसीटामिप्रिड 20% एसपी, सायन्ट्रानिलिप्रोल 10.26% OD, एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी, स्पिनेटोरम , फीप्रोनील 5% एससी किंवा थायामेथोक्सम 25% Wg.

5. ब्लॅक थ्रिप्स म्हणजे काय?
उत्तर – ही एक रसशोषक कीड आहे. थ्रिप्स किडीच्या प्रामुख्याने अंडी, पिले आणि प्रौढ अशा तीन अवस्था असतात. थ्रिप्स किडीची मंदी ही जवळ-जवळ 150 अंडी घालू शकते व ती अंडी उबण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. अंड्यामधून जी पिल्ले बाहेर येतात, ती फिकट रंगाची असतात ज्यांना पंख नसतात. पूर्ण वाढ झालेली पिल्ले नंतर जमिनीमध्ये कोषावस्थेत जातात. आणि ही कोषावस्था २-३ दिवस राहू शकते. कोशामधून निघणारा प्रौढ हा सर्वसाधारणपणे ६ ते ९ दिवस जगू शकतो. अश्या प्रकारे थ्रिप्स किडिचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस लागतात.

 

लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत
मू. पो. इरले, तालुका- बार्शी, जिल्हा- सोलापूर. पिन- 413412

 


शेयर करा