शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 1 रुपयात पिक विमा योजना (1 rupayat pik vima) याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना काय आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
प्रस्तावना –
शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा (1 rupayat pik vima) मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली.यासाठी अंदाजे ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा सारखी होणारी अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.
१ रुपयात पिकविमा (1 rupayat pik vima) योजना कशी राबविण्यात येईल?
सर्वसमावेशक पिक विमा योजना ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांच्या कालावधीत Profit & Loss Model किवा Cup & Cap Model (80:110) नुसार राबविण्याकरिता मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या दि.04.05.2023 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार परिच्छेद 3 मध्ये नमूद बाबींचा समावेश करुन, निविदा प्रक्रीया राबविण्यात येईल.
प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने Profit & Loss Sharing Model व Cup & Cap Model (80:110) या पर्यायांपैकी उचित पर्यायांसह (Model) योजना राबवण्यासाठी मान्यता देण्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आला आहे.
या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा विमा भरता येईल –
शेतकऱ्यांसाठी एक जुलैपासून पीक विम्याचे पोर्टल चालू झालेले आहेत व शेतकऱ्यांना एक जुलैपासून सीएससी सेंटर वरून किंवा इतर ठिकाणाहून पिक विमा भरता येणार आहे. खरीप हंगामाचा पिक विमा हा पिक विमा पोर्टलवर जाऊन भरता येणार आहे त्याचप्रमाणे खरीप हंगामासाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरता येईल.
1 rupayat pik vima या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
1. सातबारा उतारा, खाते उतारा
2. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
3. आधार कार्ड
4. घोषणा पत्र
कोणत्या पिकांचा यामध्ये समावेश आहे ?
1. खरीप हंगामातील त्यामध्ये तीन टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये ऋण धान्य व कडधान्य पिके यामध्ये नाचणी, तुर, उडीद,मुंग, मका, ज्वारी, बाजरी.
2. त्याचप्रमाणे नगदी पिकांमध्ये, कापूस व खरीप कांदा.
3. गळीत धान्य पिकांमध्ये सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, कारळे, तीळ अशाप्रकारच्या पिकांचा समावेश आहे.
पंतप्रधान पिक विमा योजना 2023 बद्दल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पिक विमा कंपन्याची यादी पहा –
1. अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा – ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
2. परभणी, वर्धा, नागपूर – आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
3. जालना, गोंदिया, कोल्हापूर – युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
4. नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
5. औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड – चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
6. वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार – भारतीय कृषी विमा कंपनी.
7. हिंगोली, अकोला, धुळे, पुणे – एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
8. यवतमाळ, अमरावती, गडचिरोली – रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
9. उस्मानाबाद – एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
10. लातूर – एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
11. बीड – भारतीय कृषी विमा कंपनी
खालील बाबतीत पीक विमा लागू –
1. जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान
3. पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ व चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूसंख्यलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात होणारी घट.
4. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
5. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान.
1 rupayat pik vima साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
Step-1 – सर्वप्रथम तुम्हाला PMFBY योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Step-2 – वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला Dashboard मध्ये Farmer Corner या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Step-3 – त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, त्यावर तुम्हाला खाली असलेल्या हिरव्या बटणावर म्हणजेच Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Step-4 – मग तुमच्या समोर अजून एक पेज येईल, तेथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करायची आहे.
Step-5 – नोंदणी साठी तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर Address आणि बँकेचे Details अशी सर्व माहिती भरायची आहे.
Step-6 – शेवटी Captcha टाकून, Create User या बटनावर क्लिक करायचे आहे.
Step-7 – मग तुमच्या समोर पिक विम्याचा फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यात बँकेची माहिती न चुकता टाकायची आहे.
Step-8 – मग सांगितलेल्या सूचनांचे पालन करून, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे. शेतीत पीक कोणते लावले आहे, ते टाकायचे आहे क्षेत्र निवडायचे आहे.
Step-9 – मग संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पाहून, एखादी चूक झाली असेल तर दुरुस्त करायची आहे. मग 1 रुपये (1 rupayat pik vima) Payment करायचे आहेत.
Step-10 – त्यानंतर पिक विमा फॉर्म Submit करायचा आहे, अशा रीतीने तुम्ही तुमचा पिक विमा फॉर्म भरू शकणार आहात.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील 1 रुपयात मिळणार पिक विमा (1 rupayat pik vima) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. पीक विम्याचा हप्ता किती आहे?
उत्तर – शेतकऱ्यांना आता फक्त नवीन पिक विमा योजनेनुसार फक्त 1 रुपया पीक विमा (1 rupayat pik vima) भरावा लागेल.
2. पीक विम्याची गरज काय?
उत्तर – पीक विमा हे पीक अपयश/निष्ठित किंवा त्यांच्या नियंत्रणाबाहेरील सर्व अनपेक्षित संकटांमुळे उद्भवणार्या अनिश्चिततेमुळे शेतक-यांना आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे एक साधन आहे.
3. पीक विम्याचा हप्ता कसा मोजला जातो?
उत्तर – प्रीमियम दर = प्रीमियम / दायित्व (किंवा दायित्वाच्या प्रति डॉलर प्रीमियम).
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489