शेयर करा

white grub control in marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी प्रमुख व्यवसाय म्हणून लोक शेती हाच व्यवसाय करतात. आपण आजच्या लेखांमध्ये हुमणी किड नियंत्रण (white grub control) कसे करावे याविषयी माहिती पाहणार आहोत. हुमणी म्हणजे काय, हुमणीचा प्रादुर्भाव कसा होतो, हुमणीचा जीवनक्रम कसा आहे, हुमणीचे नियंत्रण करण्यासाठी कोणते एकात्मिक उपाय आहेत हे सर्व पाहणार आहोत.

आज आपण पाहतो वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणाऱ्या हवामान बदलामुळे, तसेच उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मागील दोन वर्ष पासून झपाट्याने वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते. साधारण: ही कीड पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ज्या ठिकाणी वळवाचा पाऊस होऊन गेला आहे, अशा ठिकाणी हुमणी (Humni Kid) भुंगे मिलनासाठी जमिनीबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. मिलनानंतर हे प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालतात. त्यामुळे येत्या काळामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. वेळीच नियंत्रणाचे उपाय योजण्याची (white grub control) आवश्यकता आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके (उदा. ज्वारी, बाजरी, मका इ.) यांची मुळे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करते. झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या लक्षात येई पर्यंत मोठे नुकसान झालेले असते.



हुमणी किडी ची ओळख | white grub symptoms –

1. हुमणीचा प्रौढ भुंगेरा गडद विटकरी रंगाचे ते निशाचर निशाचर असतात.
2. एक मादी सरासरी 60 अंडी घालते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच सुरू होतो.
3. अंड्यातून बाहेर पडलेली अळी ही अळी तीन वेळेस कात टाकते.

हुमणी किडीमुळे होणारे नुकसान | white grub damage –

1. हुमणी किडीची अळी पिकाला खूप उपद्रव पोहोचवते.
2. अळीचा कालावधी 5 ते 8 महिन्यांचा असतो. जमिनीत राहून ही अळी मुख्य पिकांच्या मुळ्या खाऊन टाकते.
3. मुळे कुरतडून खाल्ल्याने पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडते.
4. त्यामुळे पिकाच्या पानाचा रंग पिवळा पडतो. कालांतराने ती पाने वाळून संपूर्ण झाड किंवा बेटच वाळून जाते.
5. जास्त प्रादुर्भाव झालेल्या पिकाला हाताने सहजपणे उपटता येते. या हुमणी किडी मुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
6. अळी शिवाय प्रौढ भुंगेरे सुद्धा पिकाला हानिकारक असतात.
7. हे भुंगे पिकाची पाने अर्धचंद्राकृती कुरतडतात. परंतु हे नुकसान त्यामानाने कमी असते.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळी | white grub economic threshold level –

1. एक हुमणी अळी (humani aali) प्रति घनमीटर अंतरास आढळून आल्यास किड नियंत्रण सुरू करावे.
2. हुमणी ग्रस्त शेतात पावसाळ्यात कडुलिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय करावे.



हुमणी कीडीचा प्रसार कसा होतो? white grub spread –

1. हुमणी ही कीड (white grub insect) हलकी जमीन, कमी पाण्याच्या ठिकाणी ही जास्त प्रमाणात आढळते.
2. तसेच शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये होतो.
3. ही कीड जवळ-जवळ सर्व पिकांवर तसेच भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे या किडीचा प्रसार जास्त प्रमाणात दिसून येतो.

हुमणी किडीचे जीवनचक्र (white grub life cycle) –

1. भुंगेरे – भुंगेरे हे विटकरी रंगाच्या असतात. त्यांचे पंख झाड आणि टणक असतात. पाय तांबूस रंगाचे असतात. नर मादी मिलनानंतर भुंगेरे शेता शेजारी झाडा झुडपांवर जाऊन बसतात. सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत जाऊन बसतात.
2. अंडी – जमिनीत चार इंच खोलवर मादी दररोज एक याप्रमाणे साठ दिवस अंडी घालते. अंडी ज्वारी किंवा मटकीच्या आकाराची असतात. सुरुवातीला तांबूस नंतर गोलाकार आकाराचे होऊन अंड्यातून दहा ते पंधरा दिवसांनी अळी बाहेर पडते.
3. अळी – अळी अवस्था- 5 ते 7 महिन्यांची असते. जमिनीत ती 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते. हीच अवस्था पिकासाठी नुकसानकारक अवस्था असते. ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते.
4. कोश – कोश तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो. कोषावस्था 20 ते 25 दिवस असू शकते. कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसा पर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत असतात व भुंगेरे सुरुवातीला पिवळसर पांढरी व कालांतराने तपकिरी होतात. भुंगेरे आयुष्य सुमारे 80 ते 90 दिवस. हुमणीची अशा प्रकारे एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.

यजमान वनस्पती | white grub host plant –

1. हुमणी ही बहुपक्षीय कीड आहे. हुमणीचे भुंगेरे प्रामुख्याने कडूनिंब, बाभळीची पाने खाऊन जगतात.
2. त्या व्यतिरिक्त ते बोर, पिंपळ, गुलमोहोर, शेवगा, पळस, चिंच अशा निरनिराळ्या 56 वनस्पतींवर उपजिविका करतात.
3. हुमणीची अळी साधारणपणे ऊस, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, आले, तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, तेलबिया व फळवर्गीय अशा सर्व पिकांच्या मुळा वर उपजीविका करते.



एकात्मिक नियंत्रण (white grub control)-

अ) निवरात्मक उपाय –

1. एक अळी प्रती चौरस मीटर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
2. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.
3. मे-जून महिन्यात पहिला पाऊस पडताच भूंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात.
4. झाडावरील भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत्.
5. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
6. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.
7. जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.
8. भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुंगे गोळा करून मारावेत.
9. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो. या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेरे चा नाश होतो.
10. निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील.

ब) उपचारात्मक उपाय (रासायनिक उपाय | white grub chemical control) –

1. कडूनिंब अथवा बाभळीच्या झाडावर इमिडॉक्लोप्रिड (17.8% एस.एल.) 0.3 मिली प्रती लिटर पाण्यातून फवारावे.
2. किटकनाशके फवारलेली पाने खाल्ल्याने भुंगेर्‍याचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
3. शेणखत, कंपोस्ट, इ. मार्फत हुमणीच्या लहान व अळ्या व अंडी शेतात जातात.
4. त्यासाठी एक गाडी खतात एक किलो 3 जी कार्बोफ्युरॉन दाणेदार मिसळावे व नंतर खत शेतात टाकावे.
5. उन्हाळ्यात शेण खताचे लहान ढीग करावेत.
6. मोठ्या ऊसात (जून-ऑगस्ट) क्लोरपायरीफॉस 20% प्रवाही 5 लि./प्रति हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे.
7. ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 3% दाणेदार फिप्रोनिल अथवा 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 25 कि./हे. मातीत मिसळून किंवा क्लोथीयानिडीन 50% पाण्यात मिसळणारी भुकटी 250 ग्रॅम वाळूमध्ये मिसळून मातीत मुळांच्या जवळ टाकावे व नंतर हलके पाणी द्यावे.

क) जैविक नियंत्रण | white grub biological control –

1. जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम एनीसोपली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.



2. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.

Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील (white grub control) हुमणी नियंत्रण कसे करावे याचे A to Z गाईड हा लेख तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. हुमणी किडीच्या जीवन चक्राच्या अवस्था कोणत्या आहेत ?
उत्तर – यामध्ये अंडी, अळी, कोष, भुंगेरे या चार अवस्था असतात.

2. हुमणी किडीचा प्रसार कसा होता ?
उत्तर – हुमणी ही कीड (white grub insect) हलकी जमीन, कमी पाण्याच्या ठिकाणी ही जास्त प्रमाणात आढळते. तसेच शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये होतो.

3. कोणत्या पिकात हुमणी चा प्रादुर्भाव होतो ?
उत्तर – महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

4. हुमणी नियंत्रणाचे (white grub control) जैविक उपाय काय आहेत ?
उत्तर – अळी सुरुवातीला सेंद्रिय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर हेक्टरी 25 किलो मेटारायझम किंवा बिव्हेरिया बुरशी मिसळून टाकावे.

 

लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा