शेयर करा

wheat farming

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण गहू लागवड(wheat farming) करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये गहू लागवड (gahu lagwad) करण्यासाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, गहू लागवडीची पद्धत आणि पाणी व्यवस्थापन,काढणी आणि उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

जमिनीची निवड | Best soil for wheat farming –

पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्‍यक असते.

हवामान –

1. गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते.
2. पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्‍यकता असते.
3. दाणे भरण्याच्या वेळी 25 डिग्री सें. तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.



पूर्वमशागत –

1. खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोलवर नांगरट करावी.
2. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी.
3. शेवटच्या कुळवणी आधी हेक्‍टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे.
4. पूर्वीच्या पिकाचे धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

पेरणीची वेळ | Best time for wheat farming –

1. जिरायत गव्हाची पेरणी (gahu perni mahiti) आक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
2. बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
3. बागायत उशिरा पेरणी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान करावी.
4. बागायती गव्हाची पेरणी 19 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन प्रत्येकी हेक्‍टरी 2.5 क्‍विंटलने घटते.

पेरणी पद्धत –

1. गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणी साठी दोन ओळींत 22.5 सें.मी. आणि बागायती उशिरा पेरणी साठी दोन ओळींत 18 सेंमी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी.
2. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच 5 ते 6 सेंमी. खोल करावी.

हेक्‍टरी बियाणे –

1. जिरायत पेरणी – 75 ते 100 किलो
2. बागायती वेळेवर पेरणी – 100 किलो
3. बागायत उशिरा पेरणी – 125 ते 150 किलो

सुधारित वाण | Best varieties for wheat farming –

1. एन आय ए डब्ल्यू-301 (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू-917 (तपोवन), एम ए सी एस-6222 हे सरबती वाण व एन आय डी डब्ल्यू-295 (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा.
2. बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-34 आणि एके ए डब्ल्यू-4627 या वाणा प्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू-15 (पंचवटी) एकेडी डब्ल्यु-2997-16 (शरद) हे वाण उपयुक्त आहेत.
3. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आय.ए.डब्ल्यू-1415 (नेत्रावती) व एच.डी. 2987 (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी.
4. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.

बीजप्रक्रिया –

पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी, तसेच प्रति 10 किलो बियाण्यासाठी ॲझोटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.



खत व्यवस्थापन | Fertilizer management in wheat farming –

1. जिरायत पेरणी – 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी पेरणीवेळी द्यावे.
2. बागायती वेळेवर पेरणी – 60 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व 60 कि. नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
3. बागायती उशिरा पेरणी – प्रत्येकी 40 किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व 40 किलो नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.

पाणी व्यवस्थापन –

मध्यम ते भारी जमिनीत 21 दिवसांच्या अंतराने गहू पिकास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी द्यावे. (दिवस पेरणीनंतरचे)

1. मुकुट मुळे फुटण्याची अवस्था – 18-21 दिवसांनी
2. कांडी धरण्याची अवस्था – 40-42 दिवसांनी
3. फुलोरा येण्याची अवस्था – 65-70 दिवसांनी
4. दाणे भरण्याची अवस्था – 80-85 दिवसांनी

अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन –

1. एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
2. दोन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी व दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
3. तीन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत –

1. जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी.
2. गव्हामधील रूंद पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी तणे दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर मेटसल्फ्युरॉन मिथाईल (20 टक्‍के) हेक्‍टरी 20 ग्रॅम प्रति 800 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पीक संरक्षण –

1. गहू पिकातील प्रमुख कीड – खोडकिडा, मावा आणि वाळवी
2. गहू पिकातील प्रमुख रोग – तांबेरा, काणी आणि करपा.

कापणी व मळणी –

1. गव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते.
2. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या 2 ते 3 दिवस आधी गव्हाची कापणी करावी.
3. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 टक्‍के असावे.
4. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी.
5. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.



उत्पादन क्षमता –

सुधारित वाणांची उत्पादन क्षमता हेक्‍टरी 40 ते 50 क्‍विंटल असताना महाराष्ट्रातील गव्हाची सरासरी हेक्‍टर उत्पादकता केवळ 14.73 क्विंटल (सन 2012-13) एवढी आहे.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा wheat farming: गहू लागवड ते काढणी संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’S | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. गव्हाची पेरणी कधी करावी?
उत्तर – गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

2. गहू पिकायला किती वेळ लागतो?
उत्तर – वसंत ऋतूतील गहू वाढण्यास सुमारे 100-130 दिवस लागतात, तर हिवाळ्यातील गहू वाढण्यास सुमारे 180-250 दिवस लागतात.

3. एकरी गव्हाचे बियाणे किती?
उत्तर – कडक लाल वसंत ऋतु गव्हासाठी सरासरी इष्टतम स्टँड, जेव्हा लवकर लागवड केली जाते, तेव्हा प्रति चौरस फूट 28 ते 30 झाडे किंवा प्रति एकर अंदाजे 1.25 दशलक्ष रोपे असतात.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर


शेयर करा