Taiwan pink: तैवान पिंक पेरू बद्दल A to Z माहिती

पिंक तैवान पेरू- या पेरूचे वजन 500 ग्रॅम असते. आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो.

लागवड अंतर- 6×10, 6×12, 8×12, 8.5×5 किंवा 6×9 घनदाट पद्धतीने लागवड केल्यास एकरी एक हजार रोपे बसतात.

लागवड करताना- 1×1 चे खड्डे करावे व खड्ड्यात कुजलेले शेणखत टाकून रोपाची एका सरळ रेषेत लागवड करावी. पाण्यासाठी ड्रिप चा वापर करावा. 

खत व्यवस्थापन- शेणखत २० ते २२ किलो प्रती झाड या प्रमाणे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच द्यावे. लागवडीनंतर 6 महिन्यांनी 150 ग्रॅम नत्र 50 ते 60 ग्रॅम स्फुरद, 50 ग्रॅम पालाश द्यावे. त्यानंतर पुढील वर्षापासून प्रतिझाड 800 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश अशी खतमात्रा 2 ते 3 हप्त्यामध्ये विभागून द्यावी.

पाणी व्यवस्थापन- जमिनीच्या मगदुरानुसार 10 ते 15 दिवसाच्या अंतराने द्यावे बुंधा भोवती दुहेरी आळे करून बाहेरील अळ्यास पाणी द्यावे. उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 20 दिवसांनी पाणी द्यावे.

पेरू फळांची काढणी आणि उत्पन्न - 120 -150 दिवसांच्या छाटणीनंतर पेरूची फळे काढणीस तयार होतात. कलम केलेल्या झाडापासून प्रति झाड 350 किलो पेरू तयार होतात. शिवाय, प्रति एकर उत्पादन 6 टन असू शकते.

Taiwan pink: तैवान पिंक पेरू बद्दल A to Z माहिती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा.

Arrow