शेयर करा

water testing

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पाणी परीक्षण (water testing) कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पाणी परीक्षण (pani parikshan) म्हणजे काय, पाणी परीक्षण करण्याचे फायदे, पाणी परीक्षण (water testing) करताना कोणते घटक तपासले जातात आणि पाणी परीक्षण कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

प्रस्तावना –

1. पाणी परीक्षण (water testing) म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण व इतर पाण्यामध्ये असलेले घटक माहिती करून घेण्यासाठी आपण प्रयोग शाळेमध्ये पाणी तपासतो त्याला पाणी परीक्षण असे म्हणतात.
2. शेतकरी बांधवानो, आपण सर्वांना माती परीक्षण बद्दल तर माहितीच आहे व आपण माती परीक्षण हे करतो सुद्धा.
3. पण भरपुर शेतकरी यांना पाणी परिक्षण (water testing) बद्दल कमी माहिती असून पाणी परिक्षण कोणी करत नाही.
4. पाणी परीक्षण करणे हे किती गरजेचे आहेत ते आपण सविस्तर जाणुन घेऊयात.
5. आपल्याला माहीतच आहे की पिकाची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्ते वर अवलंबून असते, तर मातीची गुणवत्ता ही पाण्याच्या गुणवत्ते वर अवलंबून असते.
6. म्हणजेच पाण्याची गुणवत्ता ही पिकाच्या गुणवत्ते वर चांगला किंवा वाईट परिणाम करू शकते.

हे देखील वाचा – मुरघास तयार करण्याची संपूर्ण पद्धत

पाणी परीक्षणाचे महत्व | Importance of water testing –

1. पाण्यातील क्षारता समजण्यासाठी व कमी व जादा प्रमाणातील क्षारांवर योग्य तो उपाय करण्यासाठी.
2. पाण्याचा सामू जाणून घेण्यासाठी.
3. पिकाला पाण्याचे नियोजन ठरविण्यासाठी.
4. पाण्यापासून होणारे संभाव्य धोके अथवा फायदे यांचा अंदाज येण्यासाठी.
5. या निदानांवरुन कोणत्या प्रकारचे पिक जमिनीस योग्य आहे हा निष्कर्ष काढता येतो.
6. ड्रीप मधून द्यावयाची खताची मात्रा चे अचूक नियोजन करता येते.
7. बहुमोल पाण्याचे नियोजन व बचत शक्य होते.



पाणी परीक्षणामध्ये (water testing) खालील घटका विषयी निष्कर्ष काढले जातात –

1. सामू (pH water tester)
2. क्षारता
3. कॅल्शियम
4. मॅग्नेशियम
5. सोडियम
6. पालाश
7. कार्बोनेट
8. बायोकार्बोनेट
9. क्लोराईड सल्फेट
10. सोडियम स्थिरीकरण गुणोत्तर
11. सोडियम कार्बोनेट
12. पाण्याचे वर्गीकरण

पाणी नमुना कसा घ्यावा –

अ) विहिरीतील नमुना –

1. विहिरीतील पाण्याचा वापर मोटार पंप द्वारे करण्यात येत असेल तर पाणी ज्या दिवशी शेतीसाठी वापरण्यात येईल त्याचे दुसरे दिवस सकाळी दहा ते पंधरा मिनिटं मोटर पंद्वारे पाण्याचा उपसा करून टाकावे त्यानंतर जी बाटली वापरणार आहोत ती त्याच पाण्याने स्वच्छ धुऊन एक लिटर पाण्याचा नमुना गोळा करावा.
2. विहिरीतील पाणी पंपा व्यतिरिक्त अन्य प्रकारे वापरण्यात येत असेल तर ज्या दिवशी शेतीसाठी पाणी वापरण्यात येईल त्याचे दुसरे दिवशी सकाळी विहिरीतील पाणी बादलीने ढवळून काढावे.
3. दहा बादल्या बाहेर फेकल्यानंतरच पाण्याचा नमुना एक लिटर बादली मध्ये गोळा करावा.

ब) इतर नमुना –

1. नदी,कालवा व तलावा पासून पाण्याचा नमुना घेताना तो काठा पासून दूर किंवा मध्य प्रवाहातून घ्यावा.

water testing साठी पाण्याचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी ?

1. धातूच्या भांड्यांचा वापर नमुना घेण्यासाठी करू नये.
2. पाण्याच्या नमुन्यासाठी घेण्यात येणारी काचेची अगर प्लास्टिकची बादली कोणत्याही औषधी द्रव्य, कीटकनाशक, जंतुनाशक इत्यादीची असू नये.
3. काचेची किंवा प्लास्टिकची बादली स्वच्छ पाण्याने बऱ्याच वेळी धुवावी मात्र धुताना कोणत्याही सोड्याचा,पावडरचा अगर राखेचा वापर करू नये.
4. पाणी नमुना गोळा केल्यावर प्रयोगशाळे कडे तपासणीसाठी 24 तासाचे आत प्राप्त होईल अशा बेताने पाठवावा.



खालील माहितीसह पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा –

1. शेतकऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता
2.शेतीचा सर्वे क्रमांक
3. विहिरीचे ठिकाण, पाण्याची पातळी
4.नमुना घेतल्याची तारीख
5. जमिनीची माहिती – हलकी, मध्यम, भारी
6.जमिनीचा उतार- प्रकार, उतार, खोली
7.मागील हंगामातील पीक
8. रासायनिक खतांचा वापर

पाणी परीक्षण (water testing) कुठे करतात? |

1. कृषी विभाग माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा.
2. कृषी महाविद्यालय माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा.
3. खाजगी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा.
4. कृषी विज्ञान केंद्र माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा

( टीप – तुम्हाला जर पानी परीक्षण करायचे असल्यास आपण आम्हाला – 9168911489 या मोबाइल नंबर वरती संपर्क करू शकता. )

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा पाणी परीक्षण (water testing) कसे करावे हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे देखील वाचा – हुमणी किडीचे नियंत्रण कसे करावे?

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. पाण्याला जीवन असे का म्हणतात?
उत्तर – आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात.

2. पाण्याचे किती प्रकार आहे?
उत्तर – पाण्याचे जवळपास 9 प्रकार असतात. या प्रत्येक प्रकारानुसार त्याचे फायदे आणि दुष्परिणाम असतात.

3. जमिनीवर पाणी किती आहे?
उत्तर – पृथ्वीवर 71% पाणी आहे. 97% पाणी खारे आहे, आणि फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. 69% बर्फ ग्लेशियर रूपातले,तर 30% भूजल,आणि 1% जमिनीवर उपलब्ध पाणी आहे.

4. भूजलाचे तीन प्रकार कोणते?
उत्तर – जलचर, हाताने खोदलेल्या विहिरी आणि आर्टेशियन विहिरी हे भूजलाचे विविध प्रकार आहेत.

5. पाणी तपासणी (water testing) किती वेळा केली जाते?
उत्तर – एकूण कॉलिफॉर्म बॅक्टेरिया, नायट्रेट्स, एकूण विरघळलेले घन पदार्थ आणि पीएच पातळीसाठी वर्षातून एकदा तुमची चांगली चाचणी झाली पाहिजे.



लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा