शेयर करा

Tomato thrips niyantran

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “टोमॅटो थ्रिप्स नियंत्रण (Tomato thrips niyantran) ची संपूर्ण माहिती” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. चला तर सुरू करूया –



प्रतिबंधात्मक उपाययोजना (Tomato thrips niyantran) –

1. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील.
2. मागील हंगामतील पिकाचे सर्व अवशेष काढून टाकावे व ते नष्ट करावेत.
3. रसशोषक किडीसाठी एकरी पिवळे – 13 व निळे – 12 चिकट सापळे लावावे.
4. नत्राचा अतिरिक्त वापर करू नये.
5. पिकाची फेरपालट करावी.
6. लागवडीपुर्वी बीज आणि रोपांची प्रक्रिया करावी. ( ७० टक्के थायोमिथॉक्झॉंम – 0.5 ग्राम किंवा इमिडाक्लोप्रीड 0.5 मिलि प्रती लीटर पानी. )

निवारात्मक उपाय –

1. टोमॅटो पिकावर रसशोषक किटकांचा प्रकोप वाढल्या नंतर आणि किटकांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर आपण खालील कीटकनाशकांची फवारणी करू शकता –
1. सायनट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी – 1.8 मिलि
2. इमिडाक्लोप्रीड – 70 % डब्ल्यूजी – 0.1 ग्राम
3. प्रोपरगाइट 50% +. बायफेन्थ्रिन ५% एससी – 2 मिलि
4. वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे प्रती लीटर पाण्यासाठी आहे.

( टोमॅटो प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )



सोबतच काही स्मार्ट टिप्स | Tomato thrips niyantran –

1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी वापरण्यात येणारे पानी हे 6.5 ते 7.5 ph चे असावे.
3. फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
5. फवारणी मिश्रनामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नये.

Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो की Krushi Doctor (कृषि डॉक्टर) वरील आमचा “टोमॅटो थ्रिप्स नियंत्रण (Tomato thrips niyantran) ची संपूर्ण माहिती” हा लेख तुम्हाला समजला आहे आणि याचा तुम्हाला येणाऱ्या हंगामात नक्कीच फायदा होईल. आपण जर टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या टोमॅटो पिकाचे नियोजन केले तर टोमॅटो पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह अतिशय चांगले उत्पादन घेऊ शकतो.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. थ्रिप्ससाठी सर्वोत्तम नियंत्रण काय आहे?
उत्तर – पिकामध्ये निळे चिकट सापळे लावावे. तसेच फवारणी मध्ये तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – सायनट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी – 1.8 मिलि, इमिडाक्लोप्रीड – 70 % डब्ल्यूजी – 0.1 ग्राम किंवा प्रोपरगाइट 50% +. बायफेन्थ्रिन ५% एससी – 2 मिलि.

2. टोमॅटोमध्ये कोणते कीटकनाशक चांगले आहे?
उत्तर – टोमॅटो मध्ये तुम्ही थ्रिप्स कीड नियंत्रणसाठी पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – सायनट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी – 1.8 मिलि, इमिडाक्लोप्रीड – 70 % डब्ल्यूजी – 0.1 ग्राम किंवा प्रोपरगाइट 50% +. बायफेन्थ्रिन ५% एससी – 2 मिलि.

3. थ्रिप्ससाठी निवडक कीटकनाशक म्हणजे काय?
उत्तर – म्हणजे असे कीटकनाशक जे विशिष्ट पिकावरती निवडक किडीसाठी वापरले जाते. जसे की टोमॅटो पिकावरील थ्रिप्ससाठी – सायनट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी – 1.8 मिलि, इमिडाक्लोप्रीड – 70 % डब्ल्यूजी – 0.1 ग्राम किंवा प्रोपरगाइट 50% +. बायफेन्थ्रिन ५% एससी – 2 मिलि.

4. थ्रिप्स टोमॅटो खातात का?
उत्तर – हो थ्रिप्स ही कीटक टोमॅटो पिकातील पाने आणि फळे खातात. परिणामी त्यांची गुणवत्ता ढासळते आणि त्याठिकाणी रोगांची शक्यता वाढते.

5. टोमॅटो थ्रिप्स कसे ओळखायचे?
उत्तर – तुम्हाला जर टोमॅटो पिकाच्या पानावर आणि फळावर ओरखडे पडलेले निशाण दिसले तर तुम्ही सहज पणे ओळखू शकता की पिकावर थ्रिप्स या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

6. थ्रिप्सचे नैसर्गिक शत्रू कोणते आहेत?
उत्तर – याच्या मध्ये विविध नैसर्गिक शत्रू चा समावेश आहे जसे की – शिकारी माइट्स, शिकारी बग्स, शिकारी थ्रिप्स, लेसविंग्ज, लेडीबर्ड्स आणि पॅरासाइटॉइड वेस्प्स.

7. कोणते विष थ्रिप्स मारते?
उत्तर – यामध्ये तुम्ही सायनट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी – 1.8 मिलि, इमिडाक्लोप्रीड – 70 % डब्ल्यूजी – 0.1 ग्राम किंवा प्रोपरगाइट 50% +. बायफेन्थ्रिन ५% एससी – 2 मिलि या कीटकनाशकांचा प्रती लीटर पाण्यासाठी वापर करू शकता.

8. कोणते जीवाणू थ्रिप्सला मारतात?
उत्तर – थ्रिप्स किडीला मारण्यासाठी तुम्ही – बॅसिलस थुरिंगिएन्सिस या जैविक कीटकनाशकाचा वापर करू शकता.

9. थ्रिप्सचे सेंद्रिय औषध कोणते आहे?
उत्तर – यासाठी तुम्ही निम तेल किंवा बॅसिलस थुरिंगिएन्सिस चा वापर करू शकता.

10. कडुलिंब थ्रिप्सवर प्रभावी आहे का?
उत्तर – होय. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही थ्रिप्स किडीच्या नियंत्रनासाठी कडुलिंबाचा वापर करू शकता.



लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत
मो. 9168911489


शेयर करा