शेयर करा

thibak sinchan yojana

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ठिबक सिंचन योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ठिबक सिंचन योजना 2023 (thibak sinchan yojana) नक्की काय आहे, कोणासाठी आहे, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेत अनुदान किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आराखडा मध्ये नमूद केले आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाने सन 2017-18 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना प्रती थेंब अधिक पिक केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना राबविण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच राज्य शासनाने सन 2018-19 या वर्षात करिता सूक्ष्म सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सुक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार सिंचन राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पांतर्गत प्रथम टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये सूक्ष्म सिंचन ठिबक व तुषार सिंचन हा मंजूर घटक राबविण्यात येत आहे.



ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेचे उद्दिष्टे | Objective of thibak sinchan yojana –

1. प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
2. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीस चालना देणे.
3. कृषी उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनात वाढ करणे.
4. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.

लाभार्थी निवडीचे निकष | Selection criteria for thibak sinchan yojana –

1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अत्यल्प व अल्प भूधारक,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्य क्रमानुसार लाभार्थी निवड करण्यात येईल.
2. शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर सर्व संबंधितांचे करारपत्र आवश्यक आहे.
3. उपलब्ध सिंचन स्त्रोतातील पाण्याचा विचार करून, तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ हा देय असणार आहे.
4. विद्युत पंप करिता कायमस्वरूपी जोडणी आवश्यक आहे.
5. ज्या पिकाकरिता संच बसविण्यात येणार आहेत. या पिकाची नोंद सातबाराचा उतारा वर क्षेत्रासह असावी.
6. सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून पीक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे.

योजनेसाठी समाविष्ट असणाऱ्या बाबी –

अ) ठिबक सिंचन –
1. आउटलाइन
2. सबसरफेस
3. मायक्रो जेट

ब) तुषार सिंचन –
1. सूक्ष्म तुषार सिंचन
2. मिनी तुषार सिंचन
3. हलविता येणारे तुषार सिंचन
4. मिस्टर रेनगन
5. सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम.



पात्रता | Eligibility criteria for thibak sinchan yojana –

1. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे असणार आहे.
2. यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ सातबारा उतारा, ८ अ असणे गरजेचे आहे तो तुम्ही डिजिटल पद्धतीने देखील काढू शकता काढण्यासाठी डिजिटल सातबारा ईथे क्लिक करा.
3. यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कास्ट मधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे.
4. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जमिनीचे क्षेत्र हे पाच हेक्टर पेक्षा कमी असायला पाहिजे.
5. यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरवेल,विहीर,शेततळे किंवा इतर पाण्याचा साठा असायला हवा व त्याची नोंद तुमच्या सातबारा उतारा वरती असायला हवी जर नोंद सातबाऱ्यावर नसेल तर तुम्ही ती नोंद जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करू शकता जर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रात पाण्याचा साठा असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

अनुदान | thibak sinchan subsidy –

1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमाती मधील लाभार्थ्यांना 80 टक्के अनुदान असणार आहे.
2. अल्प व अत्यल्प भूधारक सर्वसाधारण लाभार्थींना 75 टक्के अनुदान देय असणार आहे.

प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे | Important documents for thibak sinchan yojana –

1 पाणी व मृदा तपासणी अहवाल
2. कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
3. भौगोलिक स्थान पद्धतीने शेतकरी व तपासणी अधिकारी समवेत संचाचे अक्षांश आणि रेखांश फोटोची प्रत
4. विक्रेते किंवा वितरक यांच्याकडील बिलांची मुळप्रत टॅक्स इनव्हॉईस.

अर्ज कुठे करायचा? | Online application –

1. शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या mahadbt.in या संकेतस्थळावर जायचं आहे.
2. त्यासाठी आपण मोबाईल मध्ये Google chrome वरती जाऊन सर्च मध्ये https://mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ वापरावे.
3. संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने तुमचं नवीन रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसे केले जाते या संबंधित तुम्ही youtube वरती असंख्य व्हिडिओ आहेत त्या पाहू शकता.
4. तर शेतकरी मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन या पर्यायावर क्लिक करून सर्वप्रथम लॉगिन करून घ्यायचं आहे
5. शेतकरी मित्रांनो महाडीबीटी या पोर्टल वरती लोगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे लिहिलेलं असेल की अर्ज करा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
6. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन मजकूर उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकार दिसतील त्यामधील पहिला म्हणजे कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर दुसरा सिंचन साधने व सुविधा आणि यानंतर शेवटचा एक पर्याय दिसेल फलोत्पादक.
7. त्या शेतकऱ्यांना तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पुढील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
8. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे.
9. त्यामध्ये तुम्हाला मुख्य घटक मध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे. आणि यानंतर बाब निवडा मध्ये ठिबक सिंचन हा पर्याय निवडायचा आहे.
10. यानंतर तुम्हाला या योजनेसाठी उपघटक निवडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले असतील त्यामधील तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला कोणत ठिबक हवं त्याप्रमाणे ठिबक हे निवडायचा आहे.
11. यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकामधील अंतर हे निवडायचं आहे तुम्हाला ज्या पिकासाठी ठिबक करायचा आहे त्या पिकाच अंतर तुम्हाला व्यवस्थित निवडायचा आहे.
12. अशी संपूर्ण पिकाबद्दल माहिती व तुमच्या जमिनीच्या क्षेत्रा बद्दल माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.
13. अर्जा संबंधित अधिक माहितीसाठी किंवा तो व्यवस्थितपणे कसा भरा यासाठी तुम्ही कृषी कार्यालयांमध्ये जाऊन माहिती घेऊ शकता.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा pradhan mantri thibak sinchan yojana: ठिबक सिंचन योजना हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. एक एकर ठिबक साठी किती खर्च येतो?
उत्तर –  ठिबक चा एकरी खर्च फक्त 60000 रुपये येतो.

2. तुम्ही तुमची ठिबक यंत्रणा किती वेळा चालवावी?
उत्तर – प्रत्येक हंगामात ठिबक सिंचन प्रणाली खालील प्रमाणे चालवण्याची आम्ही शिफारस करतो:-
👉शरद ऋतू आणि वसंत ऋतु: आठवड्यातून एकदा किंवा दोनदा .
👉हिवाळा: आठवड्यातून एकदा किंवा प्रत्येक दुसऱ्या आठवड्यात.
👉उन्हाळा: आठवड्यातून 2 ते 3 दिवस.

3. खालीलपैकी कोणते ठिबक सिंचनाचा वापर प्रतिबंधित करते?
उत्तर – नलिका कधीकधी अडकतात . पाणी जाऊ शकत नाही आणि मुळे निर्जलित होतात.

लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489




शेयर करा