शेयर करा

silage making process in marathi

शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी Krushi Doctor सूर्यकांत आपल्या सर्वांचे पुनः एकदा स्वागत करतो आमच्या “silage making process in marathi“ या नवीन लेखामध्ये. आजच्या लेखामध्ये आपण मुरघास ( murghas ) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. माहिती जशी की – मुरघास म्हणजे नेमक काय? मुरघास तयार करण्यासाठी कोणत्या पिकाचा वापर करावा? murghas बनवण्यासाठी ( silage making ) आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे? तसेच आपण हे देखील पाहणार आहोत की मुरघास जनावरांना देण्याचे फायदे कोणते आहेत. त्यामुळे तुम्ही जर एक दूध उत्पादक शेतकरी असाल तर खास करून तुमच्यासाठी हा लेख खूपच महत्वाचा ठरणार आहे. लेख संपूर्ण वाचा आणि लेख आवडला तर शेयर नक्की करा.

मुरघास म्हणजे काय ? what is silage ?

बऱ्याच ठिकाणी उन्हाळी हंगामात पाण्याच्या अभावी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे तेथील शेतकरी पावसाळी हंगामतच हिरव्या चाऱ्यावरती विशिष्ट प्रक्रिया करून एका बॅग मध्ये किंवा खड्यामध्ये चारा हवाबद्ध करून साठवतात व आपत्कालीन काळात तोच चारा हिरव्याचाऱ्याला उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो यालाच आपण मुरघास असे म्हणतो. इंग्रजी मध्ये यालाच सायलेज ( Silage ) देखील म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर murghas म्हणजे – मुरलेला चारा. ( घास )



Murghas तयार करण्यासाठी कोणती पिके वापरावी ?

मका, ज्वारी, बाजरी, संकरीत नेपीयर गवत, मारवेल गजराज आणि मिनी गवत इत्यादि.
1. या यामध्ये मका पीक हे दुधाळ अवस्थेमध्ये कापून घ्यावे.
2. ज्वारी हे पीक फुलोरा अवस्थेमध्ये कापावे.
3. डाळ वर्गीय चारा देखील फुलोरा अवस्थेमध्ये कापावा.
4. डाळवर्गीय पिके – 40 % व तृणवर्गीय पिके ही 60 % वापरावीत.

मुरघास बनवण्याची सामग्री

1. चारा पिके ( एकदल आणि द्विदल पिके प्रमाण – 4:1 )
2. 500 जीएसएम ची मुरघास
3. एकदल पिकांसाठी – 1 किलो शिफारशीत फिडग्रेड यूरिया + 100 लीटर पानी / 200 किलो चाऱ्यासाठी )
4. द्विदल पिकांसाठी – 4 किलो गूळ + 100 लीटर पानी / 200 किलो चाऱ्यासाठी )
5. चारा कुट्टी मशीन

( murghas kasa tayar karava प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. )

मुरघास तयार करण्याची पद्धत | silage making process in marathi –

1. सर्व प्रथम मार्केट मधून चांगल्या प्रतीची मुरघास बॅग खरेदी करा.
2. या बॅग ची साइज तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. जशी की – 1, 2 किंवा 5 टन.
3. बॅग चा रंग हा पांढरा निवडावा.
4. यानंतर निवडलेल्या पिकाची फुलोरा अवस्थेमध्ये असताना बारीक कुट्टी करून घ्यावी.
5. या वेळी पिकामध्ये योग्य ओलावा असेल याची काळजी घ्यावी व कुट्टी नंतर ओलावा कमी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. म्हणजे लगेचच चारा बॅगेत भरावा.
6. चारा बॅगेत 1 फुटापर्यंत भरावा आणि लगेच पायाने दाबून घ्यावा, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहणार नाही.
7. कारण जर बॅगेत हवा राहिली तर त्यामध्ये बुरशी लागू शकते.
8. अश्याप्रकारे टप्या-टप्याने थर देऊन बॅग भरून घ्यावी व प्रत्येक थरावर, एकदल पिकांसाठी – 1 किलो शिफारशीत फिडग्रेड यूरिया + 100 लीटर पानी प्रमाणे 200 किलो चाऱ्यासाठी फवारणी करावी.
9. जर तुमच्याकडे द्विदल पिके असतील तर द्विदल पिकांसाठी – 4 किलो गूळ + 100 लीटर पानी या प्रमाणे 200 किलो चाऱ्यासाठी फवारणी करावी.
10. अश्याप्रकारे तुमचा एका चोरस फुटामध्ये तुमचं 15 ते 16 किलो मुरघास तयार होईल.
11. नंतर भरलेली बॅग सुरक्षित जागी सावलीला ठेऊन द्यावी. पुढील 45 ते 50 दिवसात अगदी चांगल्या प्रकारचा चारा तयार होईल.
12 . तयार झालेला चारा तुम्ही पुढील 5 ते 6 महीने वापरू शकता.



जनावारांना मुरघास किती द्यावा | silage making process in marathi

1. गाई व म्हशीला – 20 ते 25 किलो मुरघास द्यावा.
2. हा चारा दिवसातून 2 ते 3 वेळा द्यावा.
3. चारा जर जास्तच आंबट किंवा आम्लयुक्त असेल तर तो थोडा वेळ सुकऊन द्यावा.
4. शेळी आणि मेंढीला हा चारा 500 ते 700 ग्राम द्यावा.
5. दुधाळ जनावरांना हा चारा धारा काढल्यानंतर द्यावा.

( सूचना – मुरघास प्रमाणेच kds 726 soybean variety बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – kds 726 )

murghas fayde in marathi | benefits of silage making –

1. मुरघास अवघ्या 45 ते 50 दिवसात तयार होतो, आणि तो पुढील 5 ते 6 महीने वापरता येतो.
2. जेणेकरून शेत पुढील पिकासाठी मोकळे होते व उन्हाळी हंगामात देखील जनावरांना सकस आणि हिरवा चारा देता येतो.
3. कमी शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना हा उत्तम पर्याय आहे.
4. दुष्काळी भागात देखील उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा देता येतो.
5. मुरघासामध्ये इतर चाऱ्यापेक्षा अधिक सकस घटक असल्या मुळे जनावरांचे दूध देखील वाढते.
6. सतत हिरवा आणि सकस चारा दिल्यामुळे जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहते.
7. कमीत-कमी जमीनिसह अधिक जनावरांचा गोठा सांभाळणे शक्य होते.
8. शेतकऱ्याचा चर्यावरील खर्च कमी होतो.

Conclusion | सारांश –

चला तर शेतकरी मित्रांनो, अशा करतो की Krushi Doctor वरील silage making process in marathi हा आमचा लेख तुम्हाला समजला आहे आणि दिलेली माहिती तुमच्या नक्कीच कामी येणार आहे. या व्यतिरिक्त मुरघास बद्दल कोणताही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तो तुम्ही मला खालील मोबाइल नंबर वरती संपर्क करून विचारू शकता. आणि हो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया ही माहिती तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. जर तुम्हाला कृषि डॉक्टर शेतकरी What’s App ग्रुप मध्ये जॉइन होयचे असेल तर कृपया शेजारील What’s App आयकॉन वर क्लिक करा. धन्यवाद !!!



FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. मुरघास म्हणजे काय?
उत्तर – मुरघास ( ( silage ) म्हणजे मुरलेला चारा. मका, ज्वारी, बाजरी, संकरीत नेपीयर गवत, मारवेल गजराज आणि मिनी गवत इत्यादि पिकांना फुलोरा अवस्थेमध्ये आल्यावर कापून बारीक तुकडे करतात व त्यांच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून 45 ते 50 दिवसांसाठी हवाबंद करून ठेवले जाते. जेणेकरून पुढील पाच ते सहा महीने त्याचा एक हिरवा चारा म्हणून वापर करता येईल. खास करून कमी क्षेत्र आणि कोरडवाहू / कमी पावसाच्या भागात याचा वापर केला जातो.

2. मुरघास किती दिवसात तयार होतो?
उत्तर – मुरघास ( silage ) हा व्यवस्थित प्रक्रिया करून योग्य पद्धतीने हवाबंद करून ठेवल्यास अवघ्या 45 ते 50 दिवसात तयार होतो.

आपला विश्वासू,
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489


शेयर करा