शेयर करा

sheli palan yojana

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण शेळी पालन योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेळी पालन योजना 2023 (sheli palan yojana) नक्की काय आहे, कोणासाठी आहे, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेत अनुदान किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात शेळीपालन,पशुपालन,मेंढीपालन या सारखे शेती पूरक व्यवसाय हे चांगल्या प्रमाणात केले जातात.
2. कृषि संपन्न असलेला आपला भारत देश देशाच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. पशुपालन,शेळीपालन,मेंढी पालन हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
3. यातच शेळीपालन सारख्या चांगले उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाला आता 75% पर्यंत अनुदान देखील दिले जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.




शेळी-मेंढी पालन योजना 2023 लाभार्थी | Sheli palan yojana beneficiary –

1. दारिद्र्य रेषेखालील अर्ज करणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ हा तातडीने मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
2. अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच की 2 हेक्टर किंवा 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र नावावर असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे.
3. महिला शेतकरी जर एखाद्या कुटुंबातील प्रमुख हि महिला असेल तर त्या महिलेला देखील या योजनेमध्ये प्राधान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
4. बेरोजगार तरुण तुम्ही जर शिक्षित असाल आणि बेरोजगार असाल तर तुमच्या रोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो हि बाब लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने देण्यात येत आहे.
5. बचत गटातील महिलांना देखील या योजने अंतर्गत प्रामुख्याने लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
6. त्यामुळे तुम्ही जर बचत गटात असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी त्वरित अर्ज करू शकता.

पात्रता | Sheli palan yojana eligibility criteria –

1. लाभार्थ्याकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा – त्यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची खरेदी किंमत, घर खर्च आणि लाभांश दर्शविला जाणे आवश्यक आहे.
2. जमीन – 100 बकर्‍यांसाठी 9000 चौ.मी. असावी अर्ज करताना, जमीन भाड्याची पावती / एलपीसी / लीज कागदपत्रे, जागेचा नकाशा तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे.
3 रक्कम – लाभार्थ्याला त्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे 1 लाख रुपयांचा चेक / पासबुक / एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असले पाहिजेत.

आवश्यक कागदपत्रे | Important documents for sheli palan yojana –

तुम्ही जर शेळी किंवा मेंढी घेण्यास इच्छुक असाल म्हणजेच कि जर शेळीपालन किंवा मेंढी पालन हा व्यवसाय तुम्हाला करायचा असल्यास यावर मिळणारे अनुदान साठी तुम्हाला खालील काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. अर्जदाराचा रहिवासी दाखला
3. जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
4. पासपोर्ट साईज फोटो
5. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
6. अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती
7. अर्जदार जर दिव्यांग असेल तर शासनमान्य दिव्यांग प्रमाणपत्र
8. जातीचा दाखला (गरज असेल तर)
9. पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र

शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे

अर्ज कुठे करायचा? | sheli mendhi palan yojana online application –

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर मध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज भरून घेयचा आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.

अर्ज करताना खालील बाबींची काळजी घ्या –

1. फॉर्म भरताना आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
2. अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज बाद केला जाऊ शकतो.
3. आपली सर्व कागदपत्रे अपलोड करताना ती तपासून घ्यावी.
4. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवावी.
5. अर्ज दाखल करताना तुमचा चालू मोबाईल नंबर व इमेल आयडी द्यावा.

योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप | sheli mendhi palan yojana anudan –

1. या योजनेत अर्ज कारण अर्जदार हा खुल्या प्रवर्गातील किंवा मागास प्रवर्गातील असेल तर त्याला लाभासाठी मिळणाऱ्या रकमेतील 50% हिस्सा हा राज्य सरकार भरते.
2. व उर्वरित 50% हिस्सा हा अर्जदाराला स्वत: भरावा लागेल किंवा बँकेतून कर्ज पद्धतीने भांडवल उभारणी करावी लागेल.
2. अर्जदार हा अनुसुचित जाती-जमाती च्या प्रवर्गात येत असेल तर त्याला मिळणाऱ्या एकूण लाभार्थी रक्कमेच्या 75 टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा असेल.
3. तर उर्वरित 25 टक्के हिस्सा हा लाभार्थ्यांना स्वत: रकमेच्या स्वरुपात किंवा बँकेतून लोन करून भरायचा आहे.
3. लाभार्थ्याने एक गोष्ट लक्षात घेयची आहे कि जरी बँकेकडून लोन प्रकरण मंजूर झाले तरी बँक हे जास्तीत जास्त 20 टक्के कर्ज तुम्हाला देणार आहे.
4. म्हणजेच तुम्हाला 5 टक्के रक्कम तरी स्वत: भरावी लागणार आहे.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा शेळी पालन योजना 2023 (sheli palan yojana) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. शेळीपालनासाठी मला नाबार्डकडून किती कर्ज मिळू शकेल?
उत्तर – नाबार्ड योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज –
नाबार्ड योजनेद्वारे, SC/ST आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना शेळीपालन कर्जावर 33% पर्यंत सबसिडी मिळू शकते . OBC आणि सामान्य श्रेणीतील लोक ₹ 2.5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 25% पर्यंत सबसिडी मिळवू शकतात.

2. शेळीपालन योजनेत अनुदान किती मिळते?
उत्तर – महाराष्ट्र सरकारने या योजनेचे अनुदान वाढवून ते आता 75% पर्यंत नेले आहे.

3. शेतकरी व्यतिरिक्त इतर व्यक्ती या योजनेसाठी फॉर्म भरू शकते का?
उत्तर – नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12 उतारा असणे आवश्यक आहे.

लेखक
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा