नमस्कार, Krushi Doctor (कृषि डॉक्टर) वेबसाइट वरती आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्वपूर्ण योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आजची योजना ही शेतकऱ्यांसाठी ही एक आनंददायीच योजना म्हणावी लागेल. कारण ही योजना अशी आहे की शेतकऱ्यांना आता विजेची गरज नाही ना विज बिल भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने शेतकरी हिताची योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (saur krushi pump yojana 2023)”. आता मुख्यमंत्री सोलर पंप योजना म्हणून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकारने जीआर सुध्दा काढला आहे.
1. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा (saur krushi pump yojana 2023) उद्देश –
– मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना या योजनेचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना सौरपंप खरेदीवर अनुदान देणे.
– कृषी पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता ऐवजी दुसरे सिंचनासाठी तंत्र म्हणजेच सौरपंप.
– सिंचन क्षेत्राला वीज अनुदानाच्या ओझ्यातून मुक्त करणे.
2. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे (saur krushi pump yojana 2023) स्वरूप –
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता किंवा स्रोत आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी परंतु अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने याआधी विद्युत जोडणी झालेली नसावी.
– पाच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 एच पी क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप (krushi pump) व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 एचपी क्षमतेचा सौर कृषीपंप देण्यात येत आहे.
– राज्य सरकार द्वारा शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही आहे.
– या योजनेचे असे आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहोचू शकत नाही अशा सर्व शेतकऱ्यांना 1 लाख सोलर पंप योजनेअंतर्गत पुरवले जाणार आहेत.
3.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाचा लाभ नेमका किती आहे ?
– शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना रात्रीचा त्रास होऊ नये आणि दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकास पाणी देता यावे यासाठी शासनामार्फत 90 टक्के अनुदानावर सौरपंप दिले जातात.
– मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने (kusum saur krushi pump yojana) अंतर्गत 9 जानेवारी 2023 रोजी शेतकऱ्यांना एक लाख सौर पंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
– याशिवाय महावितरणच्या माध्यमातून एक लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत.
– आता राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम सौर योजनेतून 1 लाख आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून 1 लाख सौर पंप दिले जाणार आहेत. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख सौरपंप दिले जाणार आहेत.
5. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी (saur krushi pump yojana 2023) आवश्यक कागदपत्रे –
– पासपोर्ट फोटो
– आधार कार्ड
– बँक पासबुक झेरॉक्स
– 7/12 उतारा आणि 8अ
– कुपलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
– पाण्याची मोटर विहीर किंवा शेती सामायिक असल्यास भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
6. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी (saur krushi pump yojana 2023) अर्ज कोठे करावा –
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी पुढील वेबसाइट वर क्लिक करून अर्ज भरावा.
– वेबसाइट – महाडिसकॉम
– अर्ज हा नजीकच्या “ई सेवा केंद्र“ किंवा “सायबर कॅफेत“ जाऊन भरावा.
– कारण मोबाइल अर्ज करताना काही चुका होऊ शकतात.
7. सौर पंप योजनेचा योजनेचा लाभ घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
– ज्या ज्या शेतकऱ्यांनी सौर पंप (solar krushi pump) योजनेचा लाभ घेतलेला आहे व सर्व सामान आपल्या जागेत उपलब्ध झाल्यानंतर त्याची जर विक्री केली तर गुन्हा नोंदविण्यात येतो व कारवाई केली जाते.
– त्यामुळे शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यानंतर सौर पंपाचा आपल्याच शेतामध्ये वापर करावा. त्याचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतील.
8. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमधील (saur krushi pump yojana 2023) लाभार्थी निवडीचे निकष –
अ) ३ आणि ५ एचपी सौर पंपसाठी –
– शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन असू नये.
– पाण्याचे निश्चित स्रोत असलेली शेतजमीन असावी.
– यापूर्वी कोणत्याही योजनेतून विद्युतीकरण झालेले नसू नये.
– ५ एकरांपर्यंत शेतजमीन असणारी ३ एचपी पंप (krushi pump) पात्र आहे आणि ५ एकरांपेक्षा जास्त शेती जमीन ५ एचपी आणि ७.५ एचपी पंपसाठी पात्र आहे.
– दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल.
ब) ७.५ एचपी पंपसाठी –
– शेतकऱ्याकडे पाण्याचे स्रोत म्हणजेच विहिर किंवा कुपनलिका असणे आवश्यक आहे.
– पाण्याच्या स्त्रोताची खोली ६० मीटरपेक्षा जास्त नसावी.
– जीएसडीएने परिभाषित केलेल्या अति शोषित, शोषित आणि अंशतः शोषित गावांच्या अंतर्गत येणा विहिरी व ट्यूबवेलवर सौर पंप देण्यात येणार नाही.
– ६०% पेक्षा कमी विकास / उतारा घेण्याचे टप्पे असणाऱ्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये येणा लाभार्थ्यांना सौर पंप (mahadiscom solar pump) देण्यात येईल.
– रॉक एरियाखाली येणाऱ्या बोअरवेलवर सौर पंप देण्यात येणार नाही.
9. प्रवर्गनिहाय लाभार्थी योगदान –
अ) सामान्य प्रवर्गातील लाभार्थी –
– योगदान १० टक्के असणार आहे.
– त्यामध्ये ३ (krushi pump) एचपी साठी लाभार्थी योगदान रु. १६५६०/-
– ५ एचपी साठी रु.२४७१०/-
– तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. ३३४५५/- एवढे असणार आहे .
ब) अनुसूचित जाती (SC ) प्रवर्गासाठी लाभार्थी –
– योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/-
– ५ एचपी साठी रु.१२३५५ /-
– तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .
क) ST प्रवर्गासाठी लाभार्थी –
– योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/-
– ५ एचपी साठी रु. १२३५५ /-
– तर ७.५ एचपी (krushi pump) साठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .
( या योजने प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
Conclusion | सारांश –
– महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चालू केली आहे.
– सदर योजनेचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना तंत्रज्ञाना सोबत चालण्याची आणि कष्ट कमी, फायदा जास्त असे जाणवणार आहे.
– एकदा शेतात बसवल्यानंतर दीर्घकाळ टिकणारा व कोणतीही चिंता नसण्याचे कारण नाही.
– त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आणि व्यवस्थित अर्ज करून या अप्रतिम योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.
– आशा करतो की Krushi Doctor वरील “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने (saur krushi pump yojana 2023) ची संपूर्ण माहिती!” आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल.
– आमची एक विनंती आहे की, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर कृपया शेयर नक्की करा.
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. सोलर पंप योजना काय आहे?
उत्तर – मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना या योजनेचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना सौरपंप खरेदीवर अनुदान देणे हा आहे. या योजने अंतर्गत शेकऱ्याला मात्र 10 टक्के रक्कम भरून आपल्या विहीर किंवा बोरवेल वरती सौर पंप बसवता येतो. म्हणजेच तब्बल 90% अनुदान मिळते.
2. कुसुम योजनासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे?
उत्तर – या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी पुढील वेबसाइट वर क्लिक करून अर्ज भरावा. वेबसाइट – महाडिसकॉम अर्ज हा नजीकच्या “ई सेवा केंद्र“ किंवा “सायबर कॅफेत“ जाऊन भरावा. कारण मोबाइल अर्ज करताना काही चुका होऊ शकतात.
3. सोलर पंप वर किती अनुदान मिळते?
उत्तर – या योजने अंतर्गत शेकऱ्याला मात्र 10 टक्के रक्कम भरून आपल्या विहीर किंवा बोरवेल वरती सौर पंप बसवता येतो. म्हणजेच तब्बल 90% अनुदान मिळते.
4. कुसुम योजना मध्ये आपले नाव कसे पहावे?
उत्तर – कुसुम योजनेमध्ये आपले नाव पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करावे. – कुसुम योजना लिंक .
5. 5 एचपी सोलर पंप ची किंमत किती आहे?
उत्तर – 5 एचपी सोलार पंप ची किंमत ही त्याच्या विविध प्रकारानुसार वेग-वेगळी असू शकते. ही किंमत अंदाजे – 1,80,000 /- ते 3,15,000 /- रुपये इतकी असू शकते.
लेखक,
कृषि डॉक्टर सूर्यकांत (इर्लेकर)
मो – 9168911489