शेयर करा

rabies

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज यारोगाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने रेबीज रोग म्हणजे काय, त्याचा प्रादुर्भाव आणि प्रसार कसा होतो, त्याचे नियंत्रण करण्यासाठी काय काय उपाय योजना आहेत तसेच रेबीज साठी असणाऱ्या लसी (rabies) बद्दल याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे.
2. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजार पेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात.
3. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात.
4. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
5. सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नाही. त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या लेखातून मिळणार आहेत.



रेबीज म्हणजे काय? | What is rabies –

1. प्राण्यांनी चावल्यामुळे त्यातही कुत्र्यामुळे पसरणारा ‘रेबीज’ हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे.
2. रेबीजचा व्हायरस रुग्णांच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टम वर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो.
3. त्यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.
4. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीज व्हायरस रुग्णांच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो.
5. काही रुग्णांमध्ये पॅरालिसीसची (लकवा) समस्या निर्माण होते.
6. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात.
7. माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते.
8. तज्ज्ञ म्हणतात, एकदा रेबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही.
9. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.

रेबीज कसा पसरतो? | How rabies spread –

1. रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्ये आढळून येतो.
2. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो.
3. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) माहितीनुसार, प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसाच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.
4. भारतात 95 टक्के प्रकरणात माणसाला रेबीज (rabies in humans) होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे.
5. तर, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मुंगूस यामुळे रेबीज परसतो.

रेबीजची लक्षणं काय? | Symptoms of rabies –

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रेबीज रोगाची (rabies disease) लक्षणं काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात. पण, तोपर्यंत उपचार कठीण होण्याची शक्यता असते. रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते एक वर्षात लक्षणं दिसू लागतात. पण, सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यात दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार –

1. ताप आणि अंगदुखी होणं.
2. व्हायरस सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये (चेतासंस्थेला) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं.
3. फ्युरिअस रेबीज मध्ये रुग्णाचं वागणं बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते.
4. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं.
5. पॅरेलॅटीक रेबीज मध्ये स्नायू हळूहळू कमकुवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो.
6. तात्काळ उपचार केले नाहीत तर 100 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो.

प्राणी चावल्यामुळे झालेल्या जखमेवर हे लावू नका –

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार,
1. साध्या हातांनी जखमेला स्पर्श करू नका, स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करावेत.
2. जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यांसारखे पदार्थ लावू नका.
3. जखमेवर पट्टी बांधू नका.



डॉक्टर कडे केव्हा जावं? rabies treatment –

1. कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
2. कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर जखम झालेली जागा तात्काळ साबण आणि पाण्याने धुवून रुग्णालयात जावं. सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, रेबीजवर नियंत्रण हा एकमेव पर्याय आहे.
3. प्राणी चावल्यानंतर किंवा प्राण्याने अंगावर ओरखडा मारल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
4. प्राण्याने शरीरावर ओरखडा मारला असेल तर रुग्णाला तातडीने रेबीजची लस (rabies vaccine) दिली जाते. पण, जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लसी सोबत रेबीज इम्युनोग्लोबिन देण्यात येते.
5. प्राणी चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे लक्षणांवर योग्य उपचार होतात आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवता येतो.
6. रेबीज प्रतिबंधासाठी रेबीज विरोधी लसीचे (anti rabies vaccine) पाच डोस घ्यावे लागतात.
7. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस (rabies vaccine) घ्यावी लागते.
8. याला शून्य दिवस असं म्हटलं जातं. त्यानंतर तीन, सात, 14 आणि 28 व्या दिवशी रेबीज विरोधी लस घ्यावी लागते.
9. प्राण्यांनाही अशा पद्धतीने रेबीज विरोधी लसीचे (rabies vaccine for dogs) डोस देण्यात येतात.

रेबीज बद्दल चुकीचे समज –

1. रेबीज बाबत लोकांमध्ये जनजागृती अभाव असण्यासोबतच गैरसमजही खूप आहेत.
2. रेबीजच्या उपचारात 14 दिवस सलग पोटात इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर हळद, हायड्रोजन-पेरॉक्साईड, औषधी वनस्पती, तूप लावल्याने संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येते.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील rabies vaccine: शेतामध्ये कुत्रा सांभाळताय? मग ही माहिती तुम्हाला माहितीच असलीच पाहिजे हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. मेलेल्या प्राण्यापासून रेबीज होऊ शकतो का?
उत्तर – जरी हा विषाणू यजमानाच्या शरीराबाहेर थोड्या काळासाठी जगू शकतो, परंतु मृत प्राण्यांच्या शरीरात तो जास्त काळ टिकू शकतो. त्यामुळे, हा विषाणू लाळ, अश्रू किंवा मेलेल्या हडबडलेल्या प्राण्यांच्या मेंदूच्या/नर्वस टिश्यूचा संपर्कातून पसरू शकतो.

2. रेबीज वर इलाज का नाही?
उत्तर – रेबीज तुमच्या मेंदूमध्ये गेल्यावर त्यावर कोणताही इलाज नाही कारण ते तुमच्या रक्त-मेंदूच्या अडथळ्याद्वारे संरक्षित आहे . तुमचा रक्त-मेंदूचा अडथळा हा तुमचा मेंदू आणि तुमच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांमधील एक थर आहे.

3. कुत्र्याला रेबीज कसा होतो?
उत्तर – संक्रमित प्राण्याच्या लाळेच्या संपर्कात असलेल्या खुल्या जखमेतून देखील जाऊ शकते, सहसा चाटणे. हे पाळीव प्राण्यांमधून जाऊ शकते, परंतु कुत्र्यांमध्ये रेबीज बहुतेक वेळा वटवाघुळ, रॅकून आणि कोल्ह्यासारखा वन्य प्राण्यांच्या संपर्कात आल्याने येतो.



लेखक –

K Suryakant


शेयर करा