शेयर करा

krushi din Maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी प्रमुख व्यवसाय म्हणून लोक शेती हाच व्यवसाय करतात. महाराष्ट्राची नवीन तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबून आहे. आपला शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो, दिवसभर शेतात राबतो तेव्हा आपल्याला अन्न प्राप्त होते. म्हणून आपला भारत देश कृषिप्रधान म्हणजे शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपण आजच्या लेखामध्ये कृषी दिन (krushi din Maharashtra) साजरा केला जातो, कृषी दिन मागचा इतिहास काय आहे, वसंतराव नाईक कोण होते आणि कृषी दिनाचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन (krushi din Maharashtra) साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन साजरा केला जातो.



महाराष्ट्र कृषी दिनाचा ( Maharashtra krishi din) इतिहास –

1. भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे. वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला.
2. तेव्हापासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन (Maharashtra krishi din) साजरा होत आहे.
3. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो.
4. याबरोबरच या दिवशी ‘शेती आणि माती’ वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते.
5. महानायक वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण, लोकशाही सक्षमीकरण व विशेषतः कृषी औदयोगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना ‘महानायक’ , ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’ म्हणून आदराने संबोधले जाते.
6. शिवाय भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपुत्र आहे.
7. या शब्दात नाईक यांचा गौरव केला आहे. तसेच ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी “आधुनिक कृषिप्रधान भारताचे कृषीसंत” या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.
8. शेतकऱ्या प्रति कृतज्ञता व शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली.
9. तेंव्हापासून कृषी दिवस हा थेट बांधावर शेत शिवारातही साजरा करण्यास सुरुवात झाली. कार्यालयात साजरा होणारा कृषी दिवस आज थेट बांधावरही साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.
10. कृषी दिन ‘शासकीय स्तरावर ते थेट बांधावर ‘ साजरा करण्याच्या या प्रवासात मात्र ‘पवार’ हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल.
11. आज कृषी दिवस ( krishi din Maharashtra) हा कार्यालय याबरोबरच थेट बांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली.

वसंतराव नाईक (krushi din Maharashtra) यांच्या बाबत माहिती –

1. हा दिवस वसंतराव नाईक यांच्या आठवणीत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.
2. हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीविषयक अडचणी समस्या व्यासपीठावर मांडण्याचा एक उत्तम दिवस आहे.
3. या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाते.
4. शेतकरी बांधवांच्या सर्व शेतीविषयक समस्यांवर मुख्यत प्रकाश टाकला जातो.
5. आणि त्या सोडविण्यासाठी विविध योजना मोहीम शासनाकडुन तयार केल्या जातात.
6. शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींवर विचार केला जातो त्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाते.
7. थोडक्यात हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शेतकरींना समर्पित दिवस असतो. ज्यात शेती आणि शेतकरी या दोन बाबींचा विचार केला जातो.



कृषी दिनाचे महत्त्व ( Maharashtra krishi din) काय आहे ?

1. हा दिवस शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या आठवणीत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.
2. हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीविषयक अडचणी समस्या व्यासपीठावर मांडण्याचा एक उत्तम दिवस आहे.
3. या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाते.शेतकरी बांधवांच्या सर्व शेतीविषयक समस्यांवर मुख्यत प्रकाश टाकला जातो.
4. आणि त्या सोडविण्यासाठी विविध योजना मोहीम शासनाकडुन तयार केल्या जातात.
5. शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींवर विचार केला जातो त्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाते.
6. थोडक्यात हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शेतकरींना समर्पित दिवस असतो. ज्यात शेती आणि शेतकरी या दोन बाबींचा विचार केला जातो.

कृषी दिन शुभेच्छा मेसेज –

कष्ट करतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

करून शेती उगवून धान
यातच खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कडाक्याचे ऊन असो वा
सोसाट्याचा वारा किंवा बरसत
असो पावसाच्या ओल्याचिंब
धारा तरी राबतो आपला सर्जा राजा
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील कृषी दिन महाराष्ट्र ( krishi din Maharashtra) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. महाराष्ट्रात कृषी दिन ( krishi din Maharashtra) कधी साजरा केला जातो ?
उत्तर – 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

2. कृषी दिन का साजरा केला जातो ?
– १ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन किंवा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
– महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
– त्यामुळे हा दिवस त्यांच्या वाढदिवसाला येतो.

3) 2023 मधील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना काय आहे?
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेला मंजुरी देण्यात आली.
– महाराष्ट्र सरकारने मंगळवारी एक नवीन आर्थिक योजना आणली ज्या अंतर्गत राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातील.



लेखक

कृषि डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा
Scroll to Top