शेयर करा

lumpy skin disease treatment

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! Krushi Doctor परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “lumpy skin disease treatment in marathi” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत.तुम्हाला तर माहितीच आहे की महाराष्ट्र तसेच भारतामधील दूध उत्पादक शेतकरी तसेच अन्य पशू पालक लम्पी सारख्या रोगाने किती त्रस्त असतात. त्यासाठी ते खूप सारे प्रयत्न देखील करत आहेत परंतु त्यांना इतका खर्च करून देखील म्हणावे तसे रिजल्ट मिळत नाहीत. म्हणूनच खास करून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण गाई आणि म्हशी मध्ये लम्पी स्किन रोग येण्यामागची कारणे, त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे तसेच त्यावरील ठोस उपाय योजना पाहणार आहोत. तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतरकांदा उत्पादक शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करा . चला तर सुरू करूया –



लम्पी स्किन रोग सुरुवात आणि उगम कोठून झाला ?

1. युरोपीयन अन्न सुरक्षितता प्राधिकरण अर्थात ईएफएसएने (EFSA) दिलेल्या माहितीनुसार, लम्पी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य रोग असून, तो जनावरांना होतो.
2️. या आजाराचा प्रसार माश्या, डास, गोचीड यांसारख्या कीटकांद्वारे होतो. एलएसडी हा लम्पी स्किन डिसीज व्हायरसमुळे होतो.
3️. हा पॉक्सिव्हिरिडी कुळातला कॅप्रीपॉक्सव्हायरस आहे
4️. उगम – आफ्रिका
5️. रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण “ राज्य नियंत्रित “ क्षेत्र म्हणून घोषित

lumpy skin disease ची लक्षणे कोणती असतात ?

1️. जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, डोळे आणि नाकातून स्राव, दूध उत्पादन कमी होणं आणि आहार घेण्यात अडचण निर्माण होणं.
2️. गाभण गायी आणि म्हशींचा गर्भपात होतो.

लम्पी स्किन रोग चा प्रसार नेमका कसा होतो ?

1️. ऑर्थ्रोपॉड व्हेक्टर म्हणजेच ऑर्थ्रोपोडा गटातले कीटक हे या रोगाच्या प्रसाराचं प्रमुख साधन आहे.
2️. संसर्गग्रस्त जनावरांशी थेट संपर्कामुळे होणारा विषाणू प्रसार तुलनेने किरकोळ असतो.
3️. या आजाराचा संसर्ग खाद्य, संसर्गग्रस्त जनावराची लाळ किंवा दूषित पाणी पिणं यासारख्या गोष्टींमुळे होतो की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी हे मार्ग संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात.
4️. जनावरांपासून जनावरांना संसर्ग पसरण्याचा विचार केला, तर एकदा जनावरं या संसर्गातून बरी झाली की ती सुरक्षित मानली जातात. त्यामुळे ती इतर जनावरांसाठी संसर्गाचा स्रोत ठरू शकत नाही.
5️. ज्या संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये क्लिनिकल लक्षणं दिसत नाहीत, अशा जनावरांच्या रक्तात काही आठवडे विषाणू राहू शकतो.

lumpy skin disease मुळे मानवाला धोका आहे का?

1️. `डब्ल्यूओएएच`च्या म्हणण्यानुसार, या आजाराचा मानवाला धोका नाही. कारण हा आजार झूनॉटिक नाही. याचा अर्थ तो जनावरांपासून मानवामध्ये पसरत नाही आणि माणसाला या विषाणूचा संसर्ग होऊ शकत नाही.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

lumpy skin disease उपचार  –

1️. लसीकरण हा सरोत्तम मार्ग
2️. सध्या प्रतिबंध म्हणून शेळीची देवीची लस चा वापर
3️. खरेदी विक्री आणि वाहतूक टाळावी
4️. विलीगिकरण करावे
5️. जनावरांना माशा आणि गोचीडांपासून दूर ठेवावे
6️. गोठे स्वच्छ आणि साफ ठेवावे
7️. लसिकरणानंतर 22 दिवस जनावरे मोकळी चरायला सोडू नये .

Conclusion | सारांश –

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor या वेबसाइट वरील आमचा “जाणून घ्या lumpy skin disease treatment ची संपूर्ण माहिती ” हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की संग. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. वरील माहितीनुसार आपण जर तुमच्या गाई आणि म्हशीचे नियोजन केले आणि योग्य ती काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला तर आपण सहज पने कमी खर्चामध्ये लम्पी रोगाचे नियंत्रण करू शकतो.

FAQs | lumpy skin disease साथी सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. लंपी आजार माणसाला होतो का?
उत्तर – `डब्ल्यूओएएच`च्या म्हणण्यानुसार, या आजाराचा मानवाला धोका नाही. कारण हा आजार झूनॉटिक नाही. याचा अर्थ तो जनावरांपासून मानवामध्ये पसरत नाही आणि माणसाला या विषाणूचा संसर्ग होऊ शकत नाही.

2. लंपी रोगाची लक्षणे कोणती आहेत?
उत्तर – जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, डोळे आणि नाकातून स्राव, दूध उत्पादन कमी होणं आणि आहार घेण्यात अडचण निर्माण होणं. गाभण गायी आणि म्हशींचा गर्भपात होतो.

3. गाईला लंपी रोगापासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करावे?
उत्तर – लसीकरण हा सरोत्तम मार्ग. सध्या प्रतिबंध म्हणून शेळीची देवीची लस चा वापर. खरेदी विक्री आणि वाहतूक टाळावी. विलीगिकरण करावे. जनावरांना माशा आणि गोचीडांपासून दूर ठेवावे. गोठे स्वच्छ आणि साफ ठेवावे. लसिकरणानंतर 22 दिवस जनावरे मोकळी चरायला सोडू नये.

4. लंपी रोग कसा पसरतो?
उत्तर – या आजाराचा संसर्ग खाद्य, संसर्गग्रस्त जनावराची लाळ किंवा दूषित पाणी पिणं यासारख्या गोष्टींमुळे होतो की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी हे मार्ग संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात.

5. लंपी रोगावर कोणते औषध आहे?
उत्तर – या रोगावर थेट कोणतेही औषध नाही. लसीकरण करणे हा एकमेव उपाय आहे.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा