शेयर करा

leaf reddening in cotton

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकातील लाल्या या रोगविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये लाल्या रोग (leaf reddening in cotton) नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि लाल्या रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कपाशी हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते, परंतु कपाशीवर ही मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड आळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे इत्यादींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व आर्थिक उत्पन्नात घट होते. त्यातल्या त्यात मागील बऱ्याच वर्षापासून कपाशीवर लाल्या (cotton reddening) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पन्न जवळजवळ 20 ते 25 टक्क्यांनी घटते. या रोगाविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. लाल्या रोग प्रामुख्याने जमिनीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो किंवा त्याला अन्य कारणे ही कारणीभूत आहेत.



कपाशीवरील लाल्या रोगाची लक्षणे | Symptoms of leaf reddening in cotton –

1. कपाशीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते.
2. त्यानंतर पानामध्ये हरितद्रव्य नष्ट होऊन अँथोसायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते.
3. त्यामुळे कपाशीची पाने लाल पडल्यासारखी दिसतात.
4. त्यांचा रंग लाल होतो व शेवटी प्रादुर्भाव झालेली पाने गळून पडतात तसेच कपाशीवरील पाते, फुले ही गळून पडतात.

कपाशीवर लाल्या रोग येण्याची कारणे | Reason behind leaf reddening in cotton –

1. जर आपण जास्त अन्नद्रव्य लागत असलेल्या पिकांची लागवड केली असेल.
2. जसे ऊस, केळी यासारखे पिके शेतात घेतली व त्याच्यानंतर त्या जागेवर कपाशीची लागवड केली तर कपाशीला लागत असलेले अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात मिळत नाहीत.
3. हे प्रमुख आणि महत्त्वाचे कारण आहे.
4. बरेच शेतकरी पीक फेरपालट करत नाहीत जसे की कपाशीच्या लागवड केलेल्या शेतात पुन्हा कपाशीची लागवड करणे.
5. अतिशय हलक्‍या जमिनीत किंवा मुरमाड जमिनीत कपाशीची लागवड केल्यास त्याचा प्रादुर्भाव होतो.
6. जमिनीत जर जास्त पाणी झाले होते साचून राहिले पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही किंवा पाण्याचा जास्त ताण पडला तर त्याचा परिणाम जमिनीतील नत्र, मॅग्नेशियम हो जास्त सारखे आवश्यक मूलद्रव्य झाडांना आवश्यक त्या प्रमाणात शोषता येऊ शकत नाही.
7. साधारणत आपण पाहतो की कपाशीच्या बोंडे येण्याच्या अवस्था असते तेव्हा कपाशीच्या पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज असते.
8. नेमके याच काळात जर नत्राचे प्रमाण कमी झाले तर कपाशीची पाने लाल होतात.
9. सध्याच्या बीटी जनुक असलेल्या कपाशीच्या जातींमध्ये बोंड आळीला अटकाव करण्यासाठी चा गुणधर्म असतो.
10. त्यामुळे झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात.
11. परिणामी जास्त बोंडाना जास्त प्रमाणात नत्राची गरज भासते व झाडास जमिनीतून आवश्यक त्या नत्र न मिळाल्यास बोंड साठी लागणाऱ्या नत्राची गरज पानातून भागवली जाते.
12. त्यामुळे पानांमधील नत्राचे प्रमाण कमी होऊन कपाशीचे पाने लाल पडू लागतात.
13. साधारणतः पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाचा कालावधी काही प्रमाणात कमी होतो त्यामुळे ही पाने लाल पडू शकतात.
14. कपाशीवर तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पान सुरुवातीस कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पाने लालसर दिसते.
15. तसेच फुलकिडे व लाल कोळ्याच्या प्रादुर्भावामुळे ही काही प्रमाणात पाणी लालसर दिसतात.



उपाययोजना | Control measure of leaf reddening in cotton –

1. जमीन –

👉चिबाड व हलक्‍या जमिनीमध्‍ये कपाशीची लागवड करू नये.
👉मातीची खोली कमी असल्‍यास मुळांची वाढ कमी होते.
👉अश्या वेळी फुल किंवा बोन्डे लागताना ह्यूमिक ऍसिड – 200 ग्राम प्रति एकरी खतासोबत मिसळून किंवा ड्रेंचिंग मार्फत द्यावे.

2. पिकांच्‍या संतुलीत अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍‍थापन –

पध्‍दतीनुसार रासायनिक खतासोबत शेणखत किंवा कंपोस्‍ट खत, हिरवळीची खते, जीवाणु खते – एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्तिया 1 लिटर प्रति एकरी वापर केल्‍यामुळे जमिनीमध्‍ये अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता वाढते तसेच जलधारणशक्‍ती व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचे प्रमाण वाढते.

3. पिक फेरपालट –

👉कापुस पीक घेण्‍यापुर्वी जमिनीमध्‍ये जास्‍त अन्‍नद्रव्‍ये शोषुन घेणारी मका, ऊस, केळी अशी पीके घेतलेली असल्‍यास अशा जमिनीत सेंद्रीय द्रव्‍याचे प्रमाण कमी होते.
👉जमिनीत सामु वाढल्‍यास या जमिनीत नत्र, सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये यांचे शोषण कमी होते, त्‍यामुळे कापुस पीक घेण्‍यापुर्वी मुग, उडीद, सोयाबीन, ज्‍वारी, बाजरी ही पीके घ्‍यावीत.
👉कपाशीचा खोडवा घेऊ नये.

4. कपाशीची पेरणी उशीरा केल्‍यास बोंडे लागण्‍याचा कालावधी ऑक्‍टोबर – नोंव्‍हेंबर महिन्‍यात येतो. या काळात रात्रीचे तापमान कमी असते, त्‍यामुळे पेरणी वेळेवर करावी.

5. नत्राचे व्‍यवस्‍थापन –

👉कपाशीमध्‍ये व्दिदलवर्गीय पिकांचा आंतरपीक म्‍हणुन अंतर्भाव करावा.
👉पेरणीपुर्वी एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्टिया प्रती कीलो बियाण्‍यास 10 मिली या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
👉नत्रयुक्‍त खतांच्‍या मात्रा विभागुन दयाव्‍यात. 12:61:00 या खतांची 5 ग्राम प्रति लिटर पाणी प्रमाणात पाते व बोंडे लागतांना फवारणी करावी.
👉परिणामकारक तणनियंत्रण व आंतरमशागत यामुळे अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता वाढते.

6. पेरणीपूर्वी मातीची तपासणी करून रासायनिक खतांची मात्रा द्यावी. मातीमध्‍ये मॅग्‍नेशिअमची कमतरता असल्‍यास एकरी 8 किग्रॅ मॅग्‍नेशियम सल्‍फेट जमिनीतुन द्यावे.

7. फुले व बोंडे लागतांना मॅग्‍नेशियम सल्‍फेटची प्रती 10 लिटर पाण्‍यात 25 ग्रॅम फवारणी करावी किंवा चिलेटेड मॅग्नेशियम 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

8. जमिनीत पाण्‍याची उपलब्‍धता वाढविण्‍यासाठी जलसंधारण पध्‍दतीचा अवलंब करावा. पावसाचा खंड पडल्‍यास उपलब्‍धेनुसार पाणी द्यावे.

9. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्यास खालील पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची फवारणी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

👉बायर अलांटो (थियाक्लोप्रिड 240 एससी) – 8 मिली
👉बायर कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.एसएल) – 10 मिली
👉पीआय रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी) – 30 मिली
👉बायर सोलोमन (बीटा-साईफ्लोथ्रीन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी) – 15 मिली
👉धानुका पेजर (डायफेनथुराँन 50% डब्ल्यूपी) – 25 ग्रॅम.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा leaf reddening in cotton: कापूस पिकातील लाल्या रोगाची संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. कापूस पिकातील लाल्या रोग म्हणजे काय?
उत्तर – अन्नद्रव्यांची (मॅग्नेशियम) कमतरता, नैसर्गिक ताण तणाव या कारणामुळे पाने लाल होऊन गळून पडतात याला लाल्या रोग म्हणतात.

2. लाल्या रोगाची लक्षणे काय आहेत?
उत्तर – सुरुवातीला पानांचे कडा पिवळ्या रंगाच्या होतात आणि नंतर शिरांमधील जागा लाल होते आणि शेवटी पाने गळून पडतात.

3. लाल्या रोग पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये येतो?
उत्तर – लाल्या रोग फुल किंवा बोन्डे लागण्याच्या अवस्थेनंतर येतो.

4. लाल्या रोग येऊ नये म्हणून काय करावे?
उत्तर – शिफारसीनुसार खते द्यावी, लागवडीच्या वेळी मॅग्नेशियम सल्फेट ८ किलो प्रति एकरी द्यावे.

लेखक –

K Suryakant


शेयर करा