महाराष्ट्रात हे पीक खास करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. म्हणून तुम्ही जर यंदाच्या खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी ( लागवड ) करणार असाल आणि तुम्ही जर एका उत्तम सोयाबीन वाणाच्या शोधात असाल तर खास करून तुमच्या साठी हा ब्लॉग खूप महत्वाचा ठरणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख संपूर्ण वाचा आणि लेख आवडला तर शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूयात –
जाणून घ्या kds 726 soybean variety चा इतिहास –
1. माहात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत KDS 726 हे सोयाबीनचे वाण 2016 साली विकसीत करण्यात आले आहे.
2. या वाणाची लागवड ही देशातील अनेक राज्यामध्ये केली जाते. त्यामध्ये – महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांचा खासकरून समावेश आहे.
3. हे वान खास करून बागायती शेतकऱ्यांच्या कमालीच्या पसंतीस उतरले आहे.
kds 726 ची प्रमुख वैशिष्ट्ये | kds 726 soybean variety characteristics –
1. या जातीच्या फुलांचा रंग जांभळा आहे.
2. याचा कालावधी एकूण १०० ते १०५ दिवसांचा आहे.
3. हे वान खास करून तांबेरा रोगास प्रतिबंधक आहे.
4. हे वान जर आपण महाराष्ट्रात पहिले तर खास करून पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आले आहे.
5. या वानापासून आपण एकरी 10 ते 15 क्विंटल इतक उत्पादन घेऊ शकतो.
6. या वानात आपल्याला 38.14 टक्के प्रोटीन आणि 18.42 टक्के तेलाचे प्रमाण मिळते.
7. चांगली उगवण शमता व रोगापासून मुक्त वाण KDS 726 ( fule sangam soybean ) म्हणून ओळख.
kds 726 ची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी ?
1. पेरणी करताना योग्य व निरोगी बियाणे निवडा.
2. निवड करताना बियाण्याची उगवण क्षमता चांगली असेल याची काळजी घ्या.
3. या वाणाची ची उगवण क्षमता ही 70 % पेक्षा जास्त असावी.
4. पेरणी करताना बीज प्रक्रिया नक्की करा. यामध्ये तुम्ही सुरुवातीला १ किलो बियाण्यास बाविस्टीन (कार्बेन्डाझिम ५०% WP) २ ग्राम + कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ % SL ) ०.५ मिली चोळू शकता.
5. किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १० मिली हे प्रति किलो बियाण्यास चोळू शकता.
6. या वाणाची पेरणी ही 15 जून ते 25 जुलै या कालावधीत करावी.
7. सोयाबीनच्या kds 726 लागवडीसाठी सलग पेरणी करताना 35 ते 40 किलो तर टोकण पद्धतीमध्ये 12 ते 15 किलो बियाणे / एकरी वापरावे.
8. टोक करण्यासाठी दोन ओळीतील अंतर दोन फुट ठेवावे. व बियातील अंतर 6 ते 9 इंच असावे.
9. आणि पेरणी करण्यासाठी ४५ x ५ सें.मी. अंतर ठेवावे. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
सोयाबीन पिकाच्या इतर काही जाती ( soybean variety ) –
MACS 1188
एमएसीएस 1281
एमएयुएस 158
एमएयुएस 162
MAUS 612
केडीएस 344
जेएस 335
जेएस 93-05
एमएसीएस 1188
MSCS 1281
पीकेव्ही अंबा ( एमएस 100-39 )
सुवर्ण सोया ( एमएस – एमबी 5-18 )
पीकेव्ही यल्लो गोल्ड ( एएमएस 1001 )
पीडीकेव्ही पूर्वा ( एमएस – 2014-1 )
जेएस 20-116
JS 20-98
जेएस 20-34
JS 20-29
Conclusion | सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की kds 726 soybean variety information ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि सोयाबीन पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क नक्की करा. धन्यवाद. तुमचा विश्वासू –
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. सोयाबीन ( soybean ) किती दिवसात उगवते?
उत्तर – तस पहिल तर 2 दिवसातच सोयाबीन बियाला अंकुर फुटतात. पण अंकुर फुटून जमीनच्या बाहेर यायला जवळ-जवळ 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो.
2. सोयाबीन ( soybean ) उत्पादन कसे वाढवावे?
उत्तर – सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला जमीनच्या माती परीक्षण रेपोस्ट नुसार खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच कीड व रोगांसाठी वेळीच उपाय योजना देखील करणे आवश्यक आहे.
3. हिवाळी सोयाबीन ( soybean ) येते का?
उत्तर – याचे उत्तर देणे कठीण आहे पान जर पोशाक वातावरण मिळाले, व थंडी जर कमी पडली तयार हिवाळ्यात देखील सोयाबीन पीक येऊ शकते. पण या गोष्टी जर तर च्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रिस्क घेऊ नये व योग्य हंगाम निवडून पेरणी करावी.
4. सोयाबीनची ( soybean ) लागवड करण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता आहे?
उत्तर – तस पाहिल तर सोयाबीन ही खरीप हंगामातील पीक आहे. पण जर तुमच्या कडे चांगले पानी उपलब्ध असेल तर तुम्ही सोयाबीन ही एप्रिल महिन्याच्या शेवटी व मे शेवटच्या आवठवड्यापर्यंत देखील पेरू शकता. पण बरेच शेतकरी पाण्याच्या अभावी पावसाबरोबर पेरणी करतात.
5. भारतातील कोणते राज्य सोयाबीनचे ( soybean ) सर्वात जास्त उत्पादक आहे?
उत्तर – भारतामध्ये सोयबिनचे उत्पादन हे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राज्यस्थान, कर्नाटक आणि तेलंगना या प्रमुख राज्यामध्ये केले जाते. यामध्ये मध्यप्रदेश मध्ये 50 % तर महाराष्ट्रामध्ये 38 % उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारतामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये मध्यप्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात हे पीक खास करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते.
लेखक –
कृषि डॉक्टर टीम