शेयर करा

kanda chal anudan

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कांदा चाळ अनुदान (kanda chal anudan) योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय, अनुदान किती मिळते, लाभार्थी निवडीचे निकष कोणते, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहेत.

कांदा चाळ अनुदान (kanda chal anudan) बाबत लेटेस्ट अपडेट –

1. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यावर्षी देखील कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
2. यासाठी 51 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.
3. या मंजूर झालेल्या निधीतून आता राज्यातील 20 कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
4. नासिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना यांसारख्या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये चाळी उभारण्याचे उद्दिष्टे अधिक आहे.



कांदा चाळीसाठी किती अनुदान आहे?

1. कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून 5,10,15,20 व 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50% व कमाल 3,500/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.
2. यात 25 टन साठवण क्षमता असलेल्या चाळीस 87 हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाणार आहे.

कांदा चाळ अनुदानाचे (kanda chal anudan) उद्दिष्ट काय?

1. कांदा चाळ उभारल्याने शेतकर्‍याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल.
2. हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात.
3. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे.
4. कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे

ही देखील माहिती नक्की वाचा – पानी परीक्षण कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कांदा चाळ अनुदान ( kanda chal anudan) पात्रता –

1. या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याच्या अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.
2. ७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
3. अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.

कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?

1. वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
2. शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
3. शेतकरी महिला गट
4. शेतकऱ्यांची उत्पादक संघ
5. नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
6. शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
7. सहकारी पणन संघ



आवश्यक कागदपत्रे –

1. सातबारा उतारा
2. आधार कार्डची छायांकित प्रत
3. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
4. संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
5. विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २)

अर्ज कुठे करायचा –

1. या अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.
2. रजिस्ट्रेशन करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.
3. पूर्व संमती पत्र आलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये सादर करावे लागेल.
4. पूर्वसंमती पत्रासोबत आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे बंधनकारक असणार आहे.
5. तुमचा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल.
6. कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवावे लागेल.

ही देखील माहिती नक्की वाचा – माती परीक्षण कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत आणि फायदे

कोणत्या जिल्ह्यात किती कांदा चाळ बनवण्याचे उद्दिष्ट आहे?

👉नाशिक – 525
👉धुळे – 380
👉नंदुरबार – 192
👉जळगाव -190
👉पुणे – 275
👉नगर – 590
👉सोलापूर – 286
👉छत्रपती संभाजीनगर – 595
👉जालना – 440
👉बीड – 443
👉लातूर – 288
👉नांदेड – 132
👉परभणी – 340
👉हिंगोली – 63
👉धाराशीव – 335
👉अमरावती – 82
👉अकोला – 118
👉वाशीम – 118
👉यवतमाळ – 92
👉बुलडाणा – 190



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा कांदा चाळ अनुदान (kanda chal anudan) बाबत हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. कांदा चाळ अनुदान कोणत्या योजनेतून देण्यात येते?
उत्तर – राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यावर्षी देखील कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

2.कांदा चाळ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा?
उत्तर – पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.

3. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदा चाळ अनुदान साठी किती रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत?
उत्तर – कांदा चाळ उभारण्यासाठी 51 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.

 

लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा