शेयर करा

halad karpa niyantran

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण हळद पिकातील करपा (halad karpa niyantran) या रोगाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये करपा रोग नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

हळद व आले या पिकांच्या शाकीय वाढीत निर्माण होणारी पानांची व फुटव्यांची संख्या यांचा उत्पादन वाढी मध्ये मोठा वाटा असतो. मात्र यंदा लांबलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले तसेच वातावरणात अधिक काळ आर्द्रता राहिली. परिणामी या पिकात कंदकूज व करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करावी. हळद व आले या पिकांची शाकीय वाढ पूर्ण होऊन कंद वाढ होत आहे. शाकीय अवस्थेत पानात अन्न साठवले जाते. मात्र रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास रोग व कीड यांच्याकडूनच अन्नाचा वापर केला जातो. परिणामी उत्पादनात घट येते. बुरशीमुळे लहान तांबूस रंगाच्या गोलाकार ठिपके पानांवर आढळतात पुढे वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. रोगावर लवकर नियंत्रण मिळवले नाही तर उत्पादनामध्ये 20 ते 30 टक्के घट येऊ शकते.



हळद पिकावर करपा रोग येण्यामागची कारणे आणि लक्षणे | halad karpa niyantran –

अ) कोलेटोट्रीकम कॅपसीसी
ब) टॅफरीन मॅक्युलन्स

1. पहिल्या प्रकारच्या बुरशीमुळे ठिपक्यांचे आकार लंब गोलाकार असून वेगवेगळ्या आकाराचे दिसून येतात.
2. ठिपक्यांचा मध्यभाग पांढरट जांभळ्या रंगाचा असून कडेने विटकरी रंगाचे ठिपके दिसून येतात.
3. हे ठिपके एकमेकांत मिसळून वाढत जावून संपूर्ण पान वाळून जाते.
4. दुसऱ्या प्रकारात पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान, गोलाकार किंवा ता-यांसारखे लाल ठिपके तयार होतात.
5. ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशीची काळी वर्तुळाकार फळे रचल्यासारखी दिसतात.
6. नंतरच्या काळात ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी कडा तयार होते. असंख्य ठिपके तयार होत असल्यामुळे संपूर्ण पान लाल रंगाचे होवून वाळून जाते.
7. यामुळे पानांमध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेत अडथळा येतो व याचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो.

नुकसान – लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.

हळद पिकातील करपा रोग नियंत्रण | halad karpa niyantran –

1. हळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
2. लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
3. हळद पिकास लागवडीपासून 6 ते 7 महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात. ही फुले दांड्यासहीत काढावीत.
4. फुले काढल्यामुळे पूर्ण अन्न पुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते.
5. शिफारशीत वेळेत हळदीची भरणी करावी, त्यामुळे रोग-किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.
6. हळदीनंतर परत हळद किंवा आले यांसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांची फेरपालट करावी.
5. रासायनिक पद्धत | Chemical control –

1. मॅंकोझेब 75% wp – 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर
इंडोफिल एम 45 (इंडोफिल)
टाटा एम 45 (टाटा)
मार्ले्ट (कोरोमंडल)
युथेन एम 45 (युपीएल)

2. कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 50%wp – 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर
ब्लू कॉपर (सिजेंटा)
ब्लायटॉक्स (टाटा)
धानुकोप (धानुका)
ब्लायटॉन (क्रिस्टल)

(टीप – धुके 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास 15 दिवसांच्या अंतराने सात महिने पूर्ण होईपर्यंत आलटून-पालटून फवारण्या कराव्यात.)



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा जाणून घ्या हळद पिकातील करपा रोग नियंत्रण (halad karpa niyantran) बद्दल संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. हळद पिकात कोणते रोग होतात?
उत्तर – हळदीला रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने तीन रायझोम रोगाने होतो उदा., रायझोम आणि रूट रॉट, कोरडे रॉट आणि तपकिरी रॉट आणि चार पाणा संबंधी रोग उदा., लिफ ब्लॉच, कोलेटोट्रीकम लीफ स्पॉट, सरकोस्पोरा लीफ स्पॉट आणि लीफ ब्लाइट.

2. हळद वाढण्यास किती वेळ लागतो?
उत्तर – जानेवारी-मार्चमध्ये लागवडीनंतर 7-9 महिन्यांत पीक कापणीसाठी तयार होते. सुरुवातीच्या वाण 7-8 महिन्यांत, मध्यम वाण 8-9 महिन्यांत आणि उशिरा वाण 9 महिन्यांनंतर परिपक्व होतात.

लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत




शेयर करा