शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांच पुनः स्वागत आहे कृषि डॉक्टर (Krushi Doctor)परिवारामध्ये. तुम्हाला तर माहीत आहे, की मका हे पीक म्हणल की मका लष्करी अळी नियंत्रण (fall armyworm in maize management) हा विषय आलाच. आणि लष्करी आळी म्हणल की भरमसाठ कीटकनाशकांच्या फवारण्या देखील आल्या. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला खूप साऱ्या फवारण्या घेऊन देखील मका पिकावर लष्करी आळी नियंत्रनामध्ये म्हणावे असे यश मिळत नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की कश्या प्रकारे आपण या लष्करी आळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करू शकतो आणि खूप कमी पैशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे रिजल्ट प्राप्त करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया –
अ) मका लष्करी अळीसाठी (fall armyworm in maize management) प्रतिबंधात्मक उपाय –
1. पेरणी अगोदर खोल नांगरट करणे.
2. पिकाची फेरपालट करावी.
3. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.
4. सापळा पिकाची लागवड करावी . ( नेपियर गवत )
5. पक्षी थांबेलावावेत ( एकरी 10 )
6. कामगंध सापळे लावावेत ( एकरी 5 )
7. लष्करी आळीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करावे
परभक्षी ( ढालकिडा )
परजीवी ( ट्रायकोग्रामा )
ब) निवरात्मक उपाय –
1. निंबोळी अर्क ( 5% ) – 2 मिलि
2. अझाडीरॅक्टिन – ( 1500 ppm ) – 2 मिलि
3. थायामेथोक्सम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी ( अलिका , Synzenta ) – 0.5 मिलि
4. स्पिनेटोरम 11.7% SC ( लार्गो , धानुका ) – 0.9 मिलि
5. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC ( कोराजन , एफएमसी ) – 0.4 मिलि
क) मका लष्करी अळीसाठी (fall armyworm in maize management) महत्वाच्या सूचना –
1. फवारण्या ह्या शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर घ्यावा.
2. वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे 1 लीटर पाण्यासाठी आहे.
3. फवारणीसाठी पानी हे अनुकूल ph चे घ्यावे. ( 6.5 ते 7.5 )
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग जास्त नसू नये.
5. फवारणी करताना मातीमध्ये ओलावा असावा.
6. फवारणी मिश्रण ( द्रावण ) तयार करताना त्यामध्ये स्टीकर अवश्य मिसळावे.
7. आणि फवारणीमध्ये विनाकारण एकापेक्षा जास्त घटक मिसळू नये.
( मका प्रमाणेच आमची इतर महत्वाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
Conclusion | सारांश –
अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मका पिकाचे नियोजन केले तर तुम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे कमी उत्पादन खर्चासह मका पिकावर येणाऱ्या लष्करी आळीचे नियंत्रण करू शकता. शेतकरी मित्रांनो, कृषी डॉक्टर (Krushi Doctor) वर दिलेली माहिती आणि “मका लष्करी अळी नियंत्रण (fall armyworm in maize management): A to Z माहिती” हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकरी मित्रासोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका विषयासह तूर्तास धन्यवाद .
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. मका पिकातील लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करावे?
उत्तर – पेरणी अगोदर खोल नांगरट करणे.पिकाची फेरपालट करावी. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा. सापळा पिकाची लागवड करावी जसे की नेपियर गवत. पक्षी थांबे लावावेत ( एकरी 10 ). कामगंध सापळे लावावेत ( एकरी 5 ). लष्करी आळीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करावे जसे की – परभक्षी ( ढालकिडा ) आणि परजीवी ( ट्रायकोग्रामा ). प्रादुर्भाव जास्त वाढल्यावर शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
2. मका पिकातील लष्करी अळीसाठी कोणते कीटकनाशक सर्वोत्तम आहे?
उत्तर – मका पिकातील लष्करी अळीसाठी तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – निंबोळी अर्क ( 5% ) – 2 मिलि, अझाडीरॅक्टिन – ( 1500 ppm ) – 2 मिलि, थायामेथोक्सम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी ( अलिका , Synzenta ) – 0.5 मिलि, स्पिनेटोरम 11.7% SC ( लार्गो , धानुका ) – 0.9 मिलि किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC ( कोराजन , एफएमसी ) – 0.4 मिलि.
3. मका पिकातील लष्करी अळीचे जैविक नियंत्रण काय आहे?
उत्तर – पेरणी अगोदर खोल नांगरट करणे.पिकाची फेरपालट करावी. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा. सापळा पिकाची लागवड करावी जसे की नेपियर गवत. पक्षी थांबे लावावेत ( एकरी 10 ). कामगंध सापळे लावावेत ( एकरी 5 ). लष्करी आळीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करावे जसे की – परभक्षी ( ढालकिडा ) आणि परजीवी ( ट्रायकोग्रामा ). सोबतच तुम्ही ट्रायकोग्रामा आणि टेलिनोमस देखील वापर करू शकता.
4. मका पिकातील लष्करी अळी कीड काय आहे?
उत्तर – लष्करी अळी ही एक मका आणि ज्वारी पिकावरील एक घातक कीड आहे. या किडीचे जर वेळीच नियंत्रण नाही केले तर आपल्या पिकाचे तब्बल 40 ते 45 टक्के नुकसान होऊ शकते.
5. तुम्ही लष्करी अळीचे कसे नियंत्रित करता?
उत्तर – पेरणी अगोदर खोल नांगरट करणे.पिकाची फेरपालट करावी. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा. सापळा पिकाची लागवड करावी जसे की नेपियर गवत. पक्षी थांबे लावावेत ( एकरी 10 ). कामगंध सापळे लावावेत ( एकरी 5 ). लष्करी आळीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करावे जसे की – परभक्षी ( ढालकिडा ) आणि परजीवी ( ट्रायकोग्रामा ). प्रादुर्भाव जास्त वाढल्यावर शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
मो. 9168911489