शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण आपल्या मोबाईलवर घरबसल्या ऑनलाईन ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये ई पीक पाहणी म्हणजे काय, ई पीक पाहणी उद्दिष्ट, ई पीक पाहणी फायदे, नवीन ई पीक ॲप ( e pik pahani app) मध्ये आलेल्या सुविधा, ई पीक पाहणी कशी करायची आणि ॲप डाऊनलोड कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ई – पीक पाहणी (e pik pahani app) म्हणजे काय?
1. ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲप (e pik pahani app) च्या मदतीने शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे काम केले जाते.
2. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ इ-पिक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देता येतो.
3. पीक पाहणी मुळे खातेदारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.
इ – पीक पाहणी (e pik pahani app) चे मुख्य उद्दिष्ट्य –
1. पीक पेरणी अहवालाची माहिती एकत्रित करणे.
2. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करणे.
3. पीक विमा तसेच पीक पाहणी दावे निकालात काढणे.
ई – पीक पाहणी (e pik pahani app) चे फायदे कोणते?
1. गाव तालुका जिल्हा आणि विभाग येथील पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध करून देणे.
2. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ इ-पिक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देता येणार आहे.
3. ठिबक आणि तुषार सिंचन योजनांचा लाभ अचूकरीत्या खातेदारांना देणे शक्य होईल होणार आहे.
4. कृषी गणना अत्यंत सुलभ आणि अत्यंत अचूक पद्धतीने या ॲपद्वारे करता येईल.
5. पीक पाहणी मुळे खातेदारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.
6. खातेनिहाय आणि पीक निहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांकडून देय असणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येणार आहे.
ही देखील माहिती नक्की वाचा – मिरची वरील वायरस नियंत्रणाची A to Z माहिती
नवीन ई पीक पाहणी ॲप (e pik pahani app) मध्ये असणाऱ्या सुविधा –
1. Geo Fencing सुविधा
2. शेतकरी ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता
3. किमान 10% तपासणी तलाठी मार्फत
4. 48 तासात ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
5. किमान आधारभूत किंमत नोंदणी सुविधा
6. मिश्र पिकांमध्ये इतर 3 मुख्य पीक नोंदविण्याची सुविधा
7. संपूर्ण गावाची ई पीक पाहणी बघण्याची सुविधा
8. ॲपबाबत अभिप्राय रेटिंगची सुविधा
9. खाता अपडेट करण्याची सुविधा
ई-पीक पाहणी (e pik pahani online) कशी करावी ?
आपल्या मोबाईलमध्ये ‘ई-पिक पाहणी’ व्हर्जन-2 (e pik pahani app version 2)
हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यावे.
आपला जिल्हा निवडा
|
आपला तालुका निवडा
|
आपले गाव निवडा
|
खातेदार निवडा किंवा गट नंबर टाका
|
आपला परिचय निवडा
|
परत होम पेजवर जावा
|
पिकांची माहिती भरा
|
खाते क्रमांक निवडा
|
भूमापन क्रमांक/गट क्रमांक निवडा
|
जमिनीचे एकूण क्षेत्र भरा
|
पोटखराब क्षेत्र भरा
|
त्यानंतर हंगाम निवडा
|
पिकाचा वर्ग निवडा
एक पीक असेल तर निर्भेळ पीक निवडा.
किंवा
एका पिकापेक्षा जास्त पीक असेल तर बहुपिक निवडा.
|
पिकांची नावे लिहा
|
क्षेत्र भरा (हे. आर)
|
जलसिंचनाचे साधन भरा
|
सिंचन पध्दत निवडा
|
लागवडीची दिनांक निवडा
|
मुख्य पिकाचे छायाचित्र अपलोड करा. छायाचित्र अपलोड करत
असताना आपल्या मोबाईल चे जी.पी.एस. (G.P.S) ऑन असणे आवश्यक आहे.
|
त्यानंतर सबमिट करा.
ई-पीक पाहणी ॲप (e pik pahani app) डाउनलोड कसे करावे ?
1.सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाइल मधील प्ले स्टोअर उघडायचे आहे.
2.त्या मध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे ई-पीक पाहणी.
3. त्यानंतर ई-पीक पाहणी व्हर्जन-2 (e pik pahani app version 2 ) वर क्लिक करायचं आहे.
4.त्यावर क्लिक करून इन्स्टॉल वरती क्लिक करायचे आहे .किंवा तुम्ही पुढील लिंक ला क्लिक करूनही तुम्ही हे ॲप डाउनलोड (e peek pahani app download) करू शकता .
लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा ई पीक पाहणी ऑनलाईन (e pik pahani online) कशी करायची हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. ई पीक पाहणी का करावी?
उत्तर – शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.
2. ई पीक पाहणी ॲप मध्ये आपण किती वेळात दुरुस्ती करू शकतो ?
उत्तर – 48 तासात ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा आपण करु शकतो.
3. ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे ?
उत्तर – https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंक वरून आपण ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करू शकतो.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489