शेयर करा

chandan lagwad

शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये चंदन लागवड (chandan lagwad) कडे सध्या खूप सारे शेतकरी चंदन लागवडीकडे वळत आहे. चंदनाचा वापर मुख्यतः कॉस्मेटिक, उपचारात्मक, व्यावसायिक आणि औषधी यासाठी वापरले जाते.भारतीय संस्कृतीत सुद्धा चंदनाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मार्केट मध्ये चंदनाला जास्त मागणी आहे. भाजीपाला पिके असो किंवा नगदी पिके असोत, फळ पिके असोत मार्केटमधील चढ उतार, वाढत असलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी बांधव हुकमी आणि जास्त नफा यामुळे चंदन शेतीकडे वळू लागले आहेत.  लागवड सुरू करण्यापूर्वी, आपण योग्य प्रकारे पिकाचे नियोजन केल्यास आपण, खर्च आणि नफ्याची गणना करून एक चांगला चंदन लागवडीचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि चांगला नफा कमवू शकतो. चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या ह्या लेखामध्ये आपण चंदन लागवडीच्या महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत.

चंदन लागवडीसाठी (chandan lagwad) आवश्यक हवामान –

  1. चंदनासाठी दमट वातावरणात चांगली वाढ होते, तर त्याच्या वाढीसाठी गरम वातावरणाची आवश्यकता असतो. 
  2. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी १२ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु १२ अंश से. पेक्षा तापमान कमी झाल्यास किंवा ३५ अंश से पेक्षा जास्त झाल्यास झाडांची वाढ मंदावते. 



Chandan लागवडीसाठी (chandan lagwad) आवश्यक जमीन –

  1. पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि वालुकामय चिकन मातीची सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली जमीन आवश्यक असते. 
  2. पिकाचा कालावधी मोठा असल्याने लागवड करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेतले पाहिजे. 
  3. जमिनीचा सामू (Soil pH)  ६.५ ते ७.५ असणे आवश्यक आहे. 

चंदन लागवडीसाठी (chandan lagwad) आवश्यक जाती –

1. लाल चंदन
2. श्वेत चंदन

लागवडीसाठी रोपे कशी तयार करावीत ?

  1. रोपे तयार करण्यासाठी कमीत कमी १५ ते २० वर्षे जुन्या झाडाची निवड करतात. 
  2. रोपे तयार करण्यासाठी बियांची लागवड रोपवाटिकेत केली जाते. 
  3. साधारणतः ७-८ महिन्यांची आणि १ ते १.२५ फूट उंचीची रोपे लागवडीसाठी वापरली जातात. 

चंदन रोप लागवड कशी करावी ?

  1. झाडांची लागवड करण्यासाठी १० फूट X १० फूट अंतरावर १ रुंद, १ फूट लांब आणि १ फूट खोल असे खड्डे तयार करावेत. 
  2. अशा पद्धतीने लागवड केल्यास एकरी ४०० पर्यंत रोपे लागतात. 
  3. लागवडीच्या दरम्यान प्रति खड्डा २-३ किलो चांगले कुजलेले शेणखत, बाविस्टीन बुरशीनाशक  १० ग्राम, फिप्रोनील दाणेदार १०-२० ग्राम आणि निंबोळी पेंड ५० ग्राम नुसार खड्डा भरून त्यानंतर लागवड करावी. 

चंदन लागवडीमध्ये होस्ट प्लांट (Host Plant) लागवडीचे महत्व –

  1. चंदनाची लागवड करताना होस्ट प्लांट महत्वाचा असतो कारण सुरुवातीच्या ३-४ वर्षांमध्ये चंदनाचे झाड होस्ट प्लांटवर अन्नद्रव्यांसाठी अवलंबून राहते. 
  2. त्यासाठी २ झाडांच्या मध्ये साग, कडुलिंब, सुबाभूळ, रामफळ, सीताफळ, बाभूळ निलगिरी यांपैकी पिके होस्ट प्लांट म्हणून लावावीत. ह्यामध्ये जवळ जवळ १८०-२०० होस्ट प्लांट प्रति एकर बसतात. 

कृषि औषधांची सर्व माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Aushadhe

सुरुवातीच्या काही वर्षांत घेता येणारी अंतर पिके –

लागवडीनंतर पहिल्या ३-४ वर्षांपर्यंत हरभरा, सोयाबीन, उडीद, भुईमूंग किंवा मुंग या साठी पिके घेता येतात. 

Chandan लागवडीसाठी (chandan lagwad) आवश्यक आंतरमशागत –

  1. लागवड केल्या नंतर प्रत्येक ६ महिन्यांनी होस्ट प्लांट ची उंची/ वाढ हि पिकापेक्षा जास्त होत असेन तर छाटणी  करावी. 
  2. दोन ओळींमध्ये जर तणांचा प्रश्न दिसत असेन तर वेळोवेळी कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. 

चंदन पिकाचे (chandan lagwad) पाणी व्यवस्थापन –

  1. चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी आठवड्यातून १ ते २ वेळा पाणी द्यावे. 
  2. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून २ वेळा पाणी ठिबकने द्यावे. 
  3. चौथ्या वर्षांपासून फक्त जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. 
  4. पावसाळ्यात पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी द्यावे

Chandan पिकातील किडी व रोग –

चंदनाच्या रोपांची लागवड झाल्या नंतर मूळकू रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो तर पाने खाणारी अळी, पाने गुंळाळणारी अळी, शेंडे पोखरणारी अळी आणि साल खाणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. 

चंदन पिकाची काढणी आणि उत्पादन –

  1. चंदनाची खोड निर्मिती ७ ते १० वर्षांनंतर होते. लागवाडीच्या १० वर्षांनी साधारणतः १ किलो चा चंदनाचा गाभा मिळतो. 
  2. तर लागवडीच्या २० वर्षांनी साधारणतः ४ किलोचा गाभा मिळतो. 
  3. चंदनाच्या गाभ्याचे लाकूड तयार होण्यास 20 ते 30 वर्षांचा कालावधी लागतो.

चंदन उत्पादन –

 साधारणतः २० वर्षानंतर प्रति झाड ४ किलो गाभ्याच्या उत्पादनापासून एकरी ३५० झाडांपासून  १४०० किलो गाभा मिळतो. 

लागवड करताना आणि काढणी करताना लक्षात ठेवा- 

1. लागवड केल्यानंतर तलाठी कार्यालयातुन साताबाऱ्यावर चंदन लागवड नोंद करून घ्यावी
2. तसेच तोडताना वन विभागाची (Forest Dept.) ची परवानगी घ्यावी लागते.



Conclusion | सारांश –

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor website वरती सांगितल्या प्रमाणे तुम्ही जर चंदन पिकाची योग्य रीतीने आणि शास्त्रीय प्रद्धतीने व्यवस्थापन केल्यास १५-२० वर्षांमध्ये ५-७ लाखांपेक्षा जास्त उत्पादन मिळते. चला तर मग आमचा “चंदन लागवडीची (chandan lagwad) संपूर्ण माहिती: सरकारमान्य चंदन शेती” हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला अवश्य सांगा. आणि आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तिला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. 

( चंदनाप्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

१) चंदन किती रुपये किलो आहे?
उत्तर – चंदन गाभा साधारणतः २५००० ते ३०००० रुपये प्रति किलोंपर्यंत विकले जाते. १५-२० वर्षांमधे प्रति झाड ४ किलोंपर्यंत गाभा मिळतो.

२) लाल चंदन कुठे सापडते?
उत्तर – लाल चंदन आंध्रप्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक आढळते.

३) चंदन चोरी जाऊ नये म्हणून काय करावे?
उत्तर – लागवडीनंतर ५ वर्षांनी शेताच्या बाजूने तारेचे ७-१० फुटांपर्यंत चे कुंपण घालावे.

४) चंदनाची लागवडीनंतर १० वर्षांमधेच तोडणी केली तर चालेल का?
उत्तर – नाही, १० वर्षांपूर्वी तोडणी केल्यास लाकडाचा सुगंध येत नाही, ज्याला मार्केट मध्ये कमी मागणी किंवा मागणीच नसते.

५) चंदन लागवडीमधून एकरी किती पैसे मिळतील ?
उत्तर – चंदन लागवडीमधून एकरी ५-७ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा