शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील वायरल झालेल्या केसाळ आळी (bihar hairy caterpillar) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.यामध्ये केसाळ अळी नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते.
2. या पिकाच्या लागवड क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने वाढ होत असून एकूण देशातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 35 टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.
3. सोयाबीन मध्ये 18 ते 20 टक्के तेलाचे आणि 38 ते 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
4. जनावरांसाठी आणि पोल्ट्री उद्योगात देखील सोयाबीन पेंड एक पौष्टिक आहार म्हणून वापरला जातो.
5. सोयाबीन हे पीक आंतरपीक, पीक फेरपालटीमध्ये अतिशय महत्त्वाचे पीक असून सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे लागवड तंत्रज्ञान तसेच शिफारसीनुसार तण आणि किडींचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे.
6. या लेखामध्ये आपण सोयाबीन वर येणाऱ्या केसाळ अळी बाबतीत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन केसाळ अळीची ओळख | Bihar Hairy Caterpillar identification –
1. ही अळी डोंगराळ व वनक्षेत्र जवळील पिकात प्रथम आक्रमण करते. नंतर इतर ठिकाणी पसरते.
2. ही बहुभक्षी कीड असून, पूर्ण वाढलेली अळी 40 ते 45 मिमी लांब असते.
3. तिची दोन्ही टोके काळी व मधला भाग मळकट पिवळा असतो.
4. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूला राहून त्यातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात.
प्रादुर्भाव आणि नुकसान | Bihar hairy caterpillar infestation –
1. ही अळी केसाळ अळी (soybean insect pest) वर्गातील स्पीलोसोमा अळी म्हणून ओळखली जाते.
2. जी प्रामुख्याने सूर्यफूल पिकावर आढळते. यापुर्वी ही या किडीचा सोयाबीनवर प्रादुर्भाव होतं होता मात्र जास्त प्रमाणात नव्हता.
3. त्यामुळे ही कीड काही नवीन नाही.
4. गेल्या वर्षी मराठवाड्यात बऱ्याच भागात या किडीचा प्रादुर्भाव झाला होता.
5. सोयाबीनचं वाढलेलं क्षेत्र, पावसाची अनियमितता आणि पेरणी ची बदललेली वेळ या सर्व कारणांमुळे सोयाबीनवर या किडीचा (soybean pest) प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.
सोयाबीन केसाळ अळी नियंत्रण | bihar hairy caterpillar control –
1. मोठ्या प्रमाणात जंगलतोडीमुळे केसाळ अळ्यांना तेथे खाण्यास अत्यंत कमी झाल्यामुळे, त्यांचा प्रादुर्भाव पिकांवर दिसत आहे.
2. यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक असतात.
3. जमिनीची खोल नांगरट –
अ) या अळीचे जीवनचक्र पूर्ण झाल्यावर याचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत जातात. जमिनीची खोल नांगरणी केल्यावर ते बाहेर येतात.
ब) उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे व पक्षांनी वेचून खाल्यामुळे पुढच्या पिढीच्या जीवोत्पत्ती मध्ये फरक पडतो.
3. दीप सापळा –
अ) पावसाळ्याच्या सुरुवातीला या अळीच्या कोषामधून पतंग बाहेर येतात.
ब) दीप सापळा हा अशा पतंगांना आकर्षित करतो.
क) या सापळ्याखाली अथवा शेतात दिवा लाऊन त्याखाली रॉकेल मिश्रित पाणी असलेले घमेले ठेवल्यास त्यात या अळीचे व इतरही पतंग पडून मरतात.
4. शेतकडेचा चर –
अ) शेताच्या चहूबाजूंनी पाणी साचणारा चर खणून त्यात कीटकनाशक टाकावे.
ब) त्यामुळे दुसऱ्या शेतातून येणाऱ्या लहान अळ्यांवर नियंत्रण राखता येते.
5. ज्या शेतात यापुर्वी सुर्यफूल पीक घेतल होतं त्याठिकाणी सोयाबीन पीक घेणं टाळावं.
6. शेताच्या कडेने सोयाबीन पेरणीच्या वेळेस सापळा पिक म्हणून सूर्यफुलाची पेरणी करावी.
7. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत.
8. केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणारी अळी पुंजक्यामध्ये अंडी घालतात व त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातील एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळ्या पाने अलगत तोडून किडी सह नष्ट करावीत.
9. पिकांची नियमित पाहणी करून किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
10. पिकाच्याभोवती सापळा पिक म्हणून एरंडी ची एक ओळ लावावी आणि त्यावरील तंबाखूची पाने खाणारी अळी आणी केसाळ अळी यांची अंडीपुंज वेळेत नष्ट करावीत.
11. किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
रासायनिक उपायोजना | chemical control of bihar hairy caterpillar –
1. किडीचे रासायनिक नियंत्रण करताना क्विनॉलफॉस 25 इसी (कृश, बायोस्टेड इंडिया लिमिटेड) 30 मिली 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2. आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर क्लोरएन्ट्रानिलिप्रोल 18.5 टक्के (कोराजन, एफएमसी कॉर्पोरेशन) 3 मिली किंवा इमामेक्टीन बेंजोएट 1.9 टक्के ईसी (प्रोक्लेम, सिंजेंटा) किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के इसी 7 मिली या पैकी एका कीडनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सोयाबीन या पिकातील केसाळ आळी या किडीचे (bihar hairy caterpillar) एकात्मिक नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. सोयाबीनची पाने पिवळी का पडतात?
उत्तर – पिवळा मोजेक व्हायरस मुळे आणि नायट्रोजन मॅग्नेशियम आणि यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात.
2. सोयाबीन पिकातील केसाळ अळी नियंत्रणासाठी कोणते रासायनिक उपाय आहेत?
उत्तर – किडीच रासायनिक नियंत्रण करताना क्विनॉलफॉस 25 इसी (कृश, बायोस्टेड इंडिया लिमिटेड) 30 मिली 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3. सोयाबीन पिकात केसाळ अळीचा प्रादुर्भाव का वाढत आहे?
उत्तर – सोयाबीनचं वाढलेलं क्षेत्र, पावसाची अनियमितता आणि पेरणी ची बदललेली वेळ या सर्व कारणांमुळे सोयाबीनवर या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489