शेयर करा

amba lagwad in marathi

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण इस्रायल (सघन) पद्धतीने आंबा लागवड (amba lagwad) कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आंब्याची सघन पद्धतीने लागवड (amba lagwad) करता येते. यामुळे उत्पादन वाढ करणे शक्य आहे. सघन लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. या लागवड पद्धतीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते, पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी व वळण देणे हे दोन मुद्दे जर शास्त्रोक्त पद्धतीनुसार व्यवस्थित झाले, तर झाडाची फळधारणा लवकर आणि भरपूर होते.

सघन पद्धतीने आंबा लागवडीचे (amba lagwad) फायदे –

1. ज्या पद्धतीने लागवड केल्यास कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळते.
2. खतांचा आणि अन्नद्रव्यांचा योग्य व काटेकोरपणे वापर होतो.
3. आपल्याला आंब्याची काढणी, खुडणी हाताने करता येते.
4. झाडे लहान राखल्याने फवारणी, विरळणी आणि छाटणी करणे सोपे होते.



amba lagwad करण्यासाठी लागणारी जमीन –

1. आंब्याची सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी जमीन ही उत्तम निचऱ्याची, एक मीटर खोल असावी. यासाठी काळी जमीन लागते.
2. जमिनीचा सामू 6.5 ते 8 असावा लागतो.

लागवड –

1. साधारणता आंबा लागवडीसाठी 10 X 10 मीटर अंतर राखले जाते.
2. सघन पद्धतीमध्ये 5 X 5 मीटर किंवा
3. 5 X 6 मीटर अंतर ठेवतात. त्यामुळे सघन पद्धतीत एकरी चार पट झाडे जास्त बसतात.
4. सघन पद्धतीत लागवड ही चौरस पद्धती ऐवजी आयताकृती पद्धतीने करावी.
5. यामध्ये खड्डा 1X1X1 मीटर असावा. त्या खड्ड्यात तीन टोपली शेणखत टाकावे,1 किलो सुपर फॉस्फेट आणि क्लोरोपायरीफॉस 1.5% 100 ग्रॅम पावडर त्या खड्ड्यात टाकावी.

सघन लागवडीसाठी जाती –

1. सघन लागवडीसाठी हापूसची शिफारस आहे.
2. त्याच बरोबरीने ३० टक्के रत्ना, केसर, आम्रपाली, मल्लिका, केसर या जातींची लागवड करावी.

कलम निवड आणि लागवड –

1. साधारणता आंब्याचे जे कलम लावायचे आहे ते एक वर्ष वयाचे असावे आणि 10X14 इंच आकाराच्या पिशवीत वाढलेले असावे.
2. कलम लावताना पिशवीच्या आकाराचा खड्डा करून त्यामध्ये जिवाणू संवर्धके मिसळून कलम लागवड करावी.

amba lagwad पूर्वी मशागत कशी करावी ?

1. आळ्यातील तण वेळोवेळी काढावे.
2. पहिले वर्षभर दर 20 दिवसाच्या अंतराने दहा ग्रॅम युरिया येथील मातीत मिसळून द्यावा.
3. कलमी फांद्यांवरील मोहोर वेळोवेळी काढावा.
4. जनावरांपासून संरक्षण करावे.
5. कलम लागवड केल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

कृषि औषधांची सर्व माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Aushadhe

पाणी व्यवस्थापन –

1. प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करावा.
2. आंब्याला पाणी देण्यासाठी आठ लिटर प्रति तास क्षमतेचे ड्रीपर बसावेत.
3. सुरुवातीच्या काळात 15 ते 16 लिटर प्रति दिवस पाणी द्यावे.
4. पहिल्या दोन वर्षासाठी दोन ते तीन दिवसाआड पाणी द्यावे.
5. उत्पादन चालू झाल्यानंतर एका झाडास 60 ते 70 लिटर पाणी दररोज द्यावे.
6. फळ काढण्याच्या आधी 15 दिवस पाणी देणे बंद करावे.

खत व्यवस्थापन –

अ) पहिल्या वर्षी –
एक टोपली शेणखत
250 ते 300 ग्रॅम युरिया
250 ते 300 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट
0.5 किलो निंबोळी पेंड
नंतर प्रत्येक वर्षी हळूहळू हा डोस वाढवत जावा.

ब) दहाव्या वर्षी –
10 टोपली शेणखत
3 किलो युरिया
3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
10 किलो निंबोळी पेंड

आंबा लागवडीनंतर (amba lagwad) छाटणी कशी करावी ?

1. कलम 1.5 ते 2 फूट उंच होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे आणि त्यानंतर शेंडा मारावा.
2. जमिनीपासून 1.5 ते 2 फूट अतिरिक्त फुटलेला फुटवा काढावा.
3. तिसऱ्या वर्षात सुरुवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो.
4. छाटणी केलेल्या कलमांची वाढ होत असताना पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादन घेऊ नये.
5. आलेला मोहोर काढावा.

वाढ रोधक चा वापर –

1. आंब्यापासून दरवर्षी उत्पादन मिळवण्यासाठी पॅक्लोबुट्राझोल या वनस्पती वाढ नियंत्रकाचा वापर करावा.
2. हे द्रावण पाऊस किंवा जास्त पाणी साचलेले असताना देऊ नये.
3. हे द्रावण देण्याआधी आळ्यात गवत असेल तर ते काढावे.

अन्य व्यवस्थापन –

1.पावसाळा संपल्यानंतर ते फळ वाढीच्या अवस्थेत एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करावे.
2. आंब्याला मोहोर येऊन फळ लागल्यानंतर पोटॅशियम नायट्रेट (1%) च्या तीन फवारण्या कराव्यात.
3. यामुळे झाडाची फळगळ थांबते तसेच त्या फळाचे आकार आणि वजन वाढते.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Doctor या वेबसाइट वरील आमचा इस्रायल पद्धतीने आंबा लागवड (amba lagwad) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1.आंब्याचे झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
उत्तर – हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला आंब्याची झाडे लावणे सर्वात उत्तम मानले जाते.

2. आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर – कोरड्या भागात कलम केलेली झाडे साधारणपणे 3 ते 5 वर्षात फळ देतात, तर रोपे लावलेल्या झाडांना साधारणपणे पाच वर्षे लागतात.

3. आंब्याची झाडे किती काळ उत्पन्न देऊ शकतात?
उत्तर – आंब्याची झाडे 40 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ उत्पादन देऊ शकतात.

4.एक आंबा पिकायला किती महिने लागतात?
उत्तर – झाडाला फुले आल्यानंतर आंब्याची फळे पिकण्यास तीन ते पाच महिने लागतात.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा