शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी Krushi Doctor सूर्यकांत आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषि डॉक्टर या वेबसाइट वरती. आजच्या लेखामध्ये आपण inter cropping information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. याच्या मध्ये आपण पाहणार आहोत की यंदाच्या खरीप हंगामामध्ये पेरणी करताना आपण कोणत्या आंतरपिकाची निवड करू शकता? ही निवड करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहेत ? आणि जर आपण आंतरपीक घेतले तर आपल्याला त्याचे कोणते फायदे होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा लेख ( ब्लॉग ) खूप महत्वाचा आहे, हा लेख संपूर्ण वाचा आणि शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत तुमच्या What’s App ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर सुरू करूयात –
आंतरपीक म्हणजे काय ? intercropping definition –
एकापेक्षा अनेक पिके एकाच शेतात एकाच वेळी/हंगामात घेण्याच्या पद्धतीला आंतरपीक म्हणतात.
आंतरपिके निवडताना कोणती काळजी घ्यावी ? | inter cropping farming –
1. एकाच वर्गातील पिके आंतर पिके म्हणून निवडू नयेत. उदा –
अ) वेलवर्गीय पिकात वेलवर्गीय पीक.
ब) मिरची पिकात, टोमॅटो, वांगी, भेंडी.
2. जास्त कालावधीच्या पिकात कमी कालावधीच्या पिकाची निवड करावी. उदा – ऊस पिकात कोबी, फुलकोबी, कलिंगड भुईमूग, बटाटा.
3. जास्त खोलवर मुळे जाणाऱ्या पिकात कमी खॊलवर मुळे जाणारी पिकाची निवड करावी. जेणेकरून एकदल पिकांना द्विदल पिकांपासून नत्र मिळेल. उदा. भुईमूग, चवळी सोयाबीन, हरभरा यांसारख्या द्विदल पिकात मका, ज्वारी यांसारखी एकदल पिके घ्यावी.
4. पपई सारख्या पिकात मिरची, भेंडी किंवा इतर वेलवर्गीय पिकांची एकत्र लागवड करू नये. कारण ह्या सगळ्या पिकांचे रस शोषक कीड व व्हायरस रोगामुळे जास्त नुकसान होते.
5. आंतर पीक घेताना पिकात तणनाशकाचा वापर करणे टाळावे. जेणेकरून दुसऱ्या पिकाचे तणनाशकांमुळे नुकसान होणार नाही.
6. मुख्य पिकातील रस शोषक कीड, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी झेंडू सारख्या पिकांची आंतर पीक म्हणून निवड करावी.
( आंतरपीक पद्धती प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. )
मुख्य पिकामध्ये आंतरपीक कोणते निवडावे ? | inter cropping examples –
अ) अधिक पावसाचा प्रदेश –
1. कापूस + सोयाबीन ( ओळीचे प्रमाण – 1 : 1 )
2. कापूस + मग/उडीद ( ओळीचे प्रमाण – 1 : 1 )
3. सोयाबीन + तूर ( ओळीचे प्रमाण – 4 : 2 )
4. ज्वारी + तूर ( ओळीचे प्रमाण – 4 : 3 )
5. ज्वारी + मग/उडीद ( ओळीचे प्रमाण – 4 : 2 )
6. कापूस + तूर ( ओळीचे प्रमाण – 6 : 2 )
ब) कमी पावसाचा प्रदेश –
1. ज्वारी + तूर ( ओळीचे प्रमाण – 3 : 3 )
2. बाजरी + तूर ( 2 : 1 )
3. तूर + मूग ( ओळीचे प्रमाण – 1 : 2 )
4. तूर + सोयाबीन ( ओळीचे प्रमाण – 2 : 4 )
5. बाजरी + हुलगे ( ओळीचे प्रमाण – 2 : 1 )
6. बाजरी + सोयाबीन ( ओळीचे प्रमाण – 2 : 1 )
7. एरंडी + सोयाबीन ( ओळीचे प्रमाण – 1 : 1 )
( टीप – या लेखा प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
आंतरपिक पद्धतीचे फायदे | advantages of intercropping –
1. पिकास देणारे पाणी, खते, जमीन, सूर्यप्रकाश यांचा पुरेपूर वापर केला जातो.
2. दुबार पीक पेरणीचे संकट दूर होते.
3. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो.
4. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
5. जमिनीची धूप कमी होते.
6. कमी उत्पादन खर्चामध्ये चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळते.
7. कुटुंबाच्या वार्षिक वेण-वेगळ्या अन्नधण्याच्या कमतरता भरून निघतात. कारण शेतामध्ये कमी कालावधीत एकापेक्षा जास्त पिके घेत येतात.
8. तसेच एखादे पीक जैविक किंवा अजैविक ताणामुळे खराब झाले तर दुसऱ्या पिकामुळे शेतकऱ्याचे जास्त नुकसान होत नाही
Conclusion | सारांश –
चला तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा हा “inter cropping information in marathi” लेख तुम्हाला समजला आहे आणि तुम्हाला यंदाच्या खरीप हंगाम 2023 मध्ये याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. ही माहिती आदली असले तर शेयर नक्की करा. आणि आंतर पीक पद्धती बद्दल तुमच्या मनात आजूनही काही समस्या असतील तर मला नक्की संपर्क साधा. शेतकरी बाधवांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे.
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. प्रश्न – आंतरपीक पद्धतीची उदाहरणे कोणती आहेत?
उत्तर – अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये – कापूस + सोयाबीन, कापूस + मूग/उडीद, सोयाबीन + तूर, ज्वारी + तूर, ज्वारी + मग/उडीद आणि कापूस + तूर. तसेच कमी पावसाचा प्रदेशामध्ये – ज्वारी + तूर, बाजरी + तूर, तूर + मूग, तूर + सोयाबीन, बाजरी + हुलगे, बाजरी + सोयाबीन आणि एरंडी + सोयाबीन अशी पिके पद्धती तुम्ही घेऊ शकता.
2. प्रश्न – कोणते पीक आंतरपिकासाठी सर्वात योग्य आहे?
उत्तर – अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये – कापूस + सोयाबीन, कापूस + मूग/उडीद, सोयाबीन + तूर, ज्वारी + तूर, ज्वारी + मग/उडीद आणि कापूस + तूर. तसेच कमी पावसाचा प्रदेशामध्ये – ज्वारी + तूर, बाजरी + तूर, तूर + मूग, तूर + सोयाबीन, बाजरी + हुलगे, बाजरी + सोयाबीन आणि एरंडी + सोयाबीन अशी पिके पद्धती तुम्ही घेऊ शकता.
3. प्रश्न – आंतरपीकांमध्ये कोणती पिके घेतली जाऊ शकतात?
उत्तर – अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये – कापूस + सोयाबीन, कापूस + मूग/उडीद, सोयाबीन + तूर, ज्वारी + तूर, ज्वारी + मग/उडीद आणि कापूस + तूर. तसेच कमी पावसाचा प्रदेशामध्ये – ज्वारी + तूर, बाजरी + तूर, तूर + मूग, तूर + सोयाबीन, बाजरी + हुलगे, बाजरी + सोयाबीन आणि एरंडी + सोयाबीन अशी पिके पद्धती तुम्ही घेऊ शकता.
4. प्रश्न – आंतरमशागत म्हणजे काय?
उत्तर – उभ्या पिकामध्ये केल्या जाणाऱ्या मशागतीला आपण आंतरमशागत असे म्हणतो. याच्यामध्ये – खुरपणे, बुडाला माती लावणे, पानी देणे, खत टाकणे इत्यादि कामांचा समावेश होतो.
5. प्रश्न – आंतरपीक घेण्याचे फायदे काय आहेत?
उत्तर – पिकास देणारे पाणी, खते, जमीन, सूर्यप्रकाश यांचा पुरेपूर वापर केला जातो. दुबार पीक पेरणीचे संकट दूर होते.जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.जमिनीची धूप कमी होते. तसेच कमी उत्पादन खर्चामध्ये चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळते.
लेखक –
Krushi Doctor सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489