शेयर करा

sugarcane woolly aphid

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाइट वर आज आपण पाहणार आहोत, ऊस पिकावर लोकरी मावा कीड ही कशी येते त्याची नेमकी लक्षणे नेमकी कोणती आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला एकात्मिक उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. चला तर आजच्या “उसावरील लोकरी मावा नियंत्रण (sugarcane woolly aphid)” या लेखाला सुरू करूया ही माहिती जर तुम्हाला आवडली तर तुमच्या इतर शेतकरी मित्रासोबत शेयर करायला विसरू नका.

उसावरील लोकरी मावाची (sugarcane woolly aphid) लक्षणे –

1. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकावरील लोकरी मावा कीड ही एक रसशोषक कीड आहे.
2. प्रादुर्भाव ग्रस्त पानावर तुम्हाला पिवळे ठिपके पडलेले दिसतील.
3. जास्त प्रादुर्भावानंतर ऊसाचे संपूर्ण पान वाळून जाते.
4. परिणाम ऊसाचे वजन कमी भरते व साखरेचे प्रमाण देखील खूप कमी होते.
5. लोकरी मावा ही कीड तिच्या अंगामधून एक मधासारखा द्रव सोडत असल्यामुळे त्याच्यावर बुरशीची वाढ होऊन संपूर्ण पान नंतर काळे पडलेले दिसून येते.



( असेच लेख विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor youtube Channel )

उसावरील लोकरी मावा (sugarcane woolly aphid) एकात्मिक उपाय –

1. लागवड करताना प्रादुर्भाव मुक्त बियाणे निवडावे.
2. ऊस लागवड करताना बेणे प्रक्रिया अवश्य करावी.
3. लागवड ही नेहमी पत्ता पद्धतीने करावी.
4. ऊस पिकाचे खत व्यवस्थापन हे माती परीक्षण वर आधारित करावे.
5. ऊस पिकामध्ये युरिया सारख्या खताचा अतिशय संतुलित वापर करावा.
6. जैविक पद्धतीने ऊस पिकावरील मावा किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात –
– कोनोबाथ्रा ॲफिडीव्हारा १००० अळ्या किंवा मायक्रोमस इगोरोटास २५०० अळ्या किंवा क्रायसोपर्ला कार्निया या मित्रकिटकांची २५०० अंडी प्रति हेक्टरी ऊस पिकात सोडावीत.
– परंतु वरील मित्रकीटक शेतात सोडल्यानंतर एक काळजी घ्यावी, ऊस पिकात पुढील 4 ते 5 आठवडे कोणतीही कीटकनाशकाची फवारणी करू नये.
– जर आपण आधीच फवारणी केली असेल तर फवारणीनंतर 15 दिवसांनी मित्रकीटक सोडावेत.
– ॲझाडिरॅक्टीन (५ टक्के) – 1 मिलि / लीटर पानी या प्रमाणे ऊस पिकावर फवारणी करावी.
7. रासायनिक पद्धतीने ऊस पिकावरील मावा किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात –
– क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) ०.७५ ते १.५ मि.लि./ लीटर पानी
– ॲसिफेट २ ग्रॅम / लीटर पानी
– वरील फवारणी करताना पॉवर स्प्रे ( जास्त दाबणे ) फवारणी करावी.
– व फवारणी मध्ये 0.5 मिलि स्टीकर / लीटर पानी अवश्य वापरावे.

( ऊस पिकाप्रमाणेच प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )



Conclusion | सारांश –

अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor Website वरील “उसावरील लोकरी मावा (sugarcane woolly aphid) नियंत्रण: संपूर्ण गाईड” या लेखामध्ये सांगितल्या प्रमाने तुम्ही जर ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचे नियंत्रण केले तर नक्कीच तुम्हाला खूप कमी कालावधी मध्ये अतिशय चांगले रिजल्ट मिळतील ते देखील खूप कमी खर्चामध्ये. चला तर मी येथेच थांबतो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये मध्ये सांगायला विसरू नका.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. लोकरी मावा म्हणजे काय?
उत्तर – हे एक पांढऱ्या रंगाचे कीटक असतात. जे ऊस पिकाच्या पानावर वाढतात व पानाच्या आतील रसशोषून घेतात. परिणामी पान आपल्याला पिवळे पडलेले दिसून येते आणि वाळून जाते. पानाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते व उत्पादनामध्ये कमालीची घट होते.

2. ऊस रोगावर नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर – ऊस पिकाच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला ऊस पिकाचे वेळो-वेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे. आणि एखाद्या कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसतात, योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. सोबतच आपल्याला रोपाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी खत व्यवस्थापणावर देखील भर देणे आवश्यक आहे.

3. उसाचे उत्पादन कशामुळे वाढते?
उत्तर – ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे – खत व्यवस्थापन करणे. मातीचे परीक्षण करा आणि त्यानुसार योग्य त्या वेळी, योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या मात्रेमध्ये खतांचे डोस द्या.

4. ऊस कुठे पिकतो?
उत्तर – उसाचा पिकाचा उगम हा आशिया आणि न्यू गिनीच्या उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशातून झाला. त्यामुळे असे सेम हवामान असलेल्या भागात म्हणजे – लाओस, चीन, ब्राझील, मेक्सिको, भारत, फिलीपिन्स आणि म्यानमार अशा प्रमुख भागामध्ये ऊस पिकाचे उत्पादन घेतले जाते.

5. साखर उत्पादन करणारी शीर्ष 5 राज्ये कोणती आहेत?
उत्तर – भारतामध्ये प्रामुख्याने पाहिले तर – महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि गुजरात या भागामध्ये ऊस पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.



लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत
मो – 9168911489


शेयर करा