शेतकरी मित्रांनो नमस्कार, या Krushi Doctor ( कृषि डॉक्टर ) च्या नवीन लेखामध्ये आपले स्वागत आहे. आपण घेणाऱ्या प्रत्येक पिकामध्ये वेग-वेगळ्या किडी जर वर्षी येतात आणि या किडीच्या नियंत्रणासाठी आपण वेग-वेगळ्या फवारण्या देखील घेत असतो, परंतु यामध्ये आपला खूप सारा वेळ आणि पैसा खर्च होतो मात्र रिजल्ट म्हणावे इतके येत नाहीत. म्हणूनच या ठिकाणी मी आज तुम्हाला खूप कमी खर्चातील आणि विना फवारणीचा कीड नियंत्रणाचा जुगाड सांगणार आहे, तो म्हणजे “kamgandh sapla: उपयोग आणि फायदे ( A to Z माहिती )” !
kamgandh sapla ( कामगंध सापळे ) म्हणजे नेमक काय ?
1. मादी किडीचा विशिष्ट गंध असलेली गोळी लावलेला एक कृत्रिम सापळा म्हणजे कामगंध सापळा होय . ( फेरोमोन ट्रॅप )
2. पिके आणि किडीनुसार कामगंध सापळे आणि ल्युर
3. कापूस ( गुलाबी बोंड आळी ) – पेक्टिनो ल्युअर
4. ज्वारी आणि मका ( लष्करी आळी ) – एफएडब्लयू / स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ल्युअर
5. सोयाबीन कपाशी ( पाने खणारी आळी ) – स्पोडो ल्युअर
6. कापूस , सोयाबीन आणि तूर ( हिरवी घाटे आळी ) – हेक्सा ल्युअर
7. भेंडी – ( व्हीट ल्युअर )
8 वांगे ( फळ आणि शेंडा पोखरणारी आळी ) – ल्युसीन ल्युअर
कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा ?
1. पिकानुसार कामगंध सापळे आणि ल्युर खरेदी करावी.
2. पीक शाखिय वाढीच्या अवस्थेत असताना ट्रॅप लाऊन त्या मध्ये ल्युर बसऊन टाकावी.
3. ल्युर बसवताना प्लॅस्टिक मोजे वापरावे.
4 . किडीचे निरीक्षण करण्यासाठी एकरी 5 ते 6 कामगंध सापळे आणि नियंत्रण करण्यासाठी 10 ते 15 सापळे लावावेत.
5. ट्रॅप मध्ये अडकलेल्या किडी ( पतंग ) वारंवार काढून नष्ट कराव्यात.
6. 40 ते 45 दिवसांनी ल्युर बदलणे गरजेचे आहे.
7. पावसाळ्यात हा कालावधी कमी असू शकतो.
( कामगंध सापळ्यांचा वापर आणि फायदे या प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
कामगंध सापळ्यांचा फायदा ( kamgandh sapla ) –
1. फवारणी खर्च कमी होतो.
2. सेंद्रिय शेतीसाठी खूप फायदा होतो.
3. किडीची पुढील सर्व पिढी नियंत्रणात येऊ शकते.
4. फवारणीची संख्या देखील कमी होते.
Conclusion | सारांश –
अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला? आशा करतो हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल. वरील सांगितल्या प्रमाणे तुम्हाला जर कामगंध सापळे खरेदी करायचे असतील तर येथे क्लिक करा – BharatAgri Krushi Dukan. आपण कामगंध सापळे आपल्या शेतामध्ये लाऊन विशमुक्त शेती करू शकता. आणि तुमच्या पीक उत्पादनाचा खर्च देखील कमी करू शकता. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका. धन्यवाद
FAQ | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. फेरोमोन सापळे काय करतात?
उत्तर – फेरोमोन सापळा म्हणजेच कामगंध सापळा. यांचा उपयोग हा विशिष्ट किटकांच्या नर पतंगला आकर्षित करण्यासाठी केला जातो. या सापळ्यांनमध्ये मादीचा विशिष्ट वास असलेली गोळी लावलेली असते ज्याच्या कडे नर पतंग आकर्षित होतात व परिणामी त्या सापळ्यात अडकून जातात. अडकलेल्या नराच्या मदतीने आपल्याला समझू शकते की पिकावर कोणत्या किडीचा आणि किती प्रादुर्भाव झाला आहे.
2. फेरोमोन सापळे किती काळ टिकतात?
उत्तर – कामगंध सापळे हे दीर्घ काळ राहू शकतात पण त्याच्या मधील ल्युर ( गोळी ) ही दर दोन महिन्याला आपल्याला बदलावी लागते.
3. फेरोमोन ट्रॅपमध्ये कोणते रसायन वापरले जाते?
उत्तर – फेरोमोन सापळ्यांनमध्ये नर पतंगाला आकर्षित करण्यासाठी मादीचा विशिष्ट वास असलेले प्रलोभन ठेवले जाते. ज्याच्या कडे नर पतंग सहजपणे आकर्षित होतात.
4. फेरोमोन ट्रॅप हे जैविक नियंत्रण आहे का?
उत्तर – नक्कीच फेरोमोन ट्रॅप हा नर कीटकांना नियंत्रण करण्याचा एक जैविक उपाय आहे.
5. फेरोमोन सापळे किती प्रकारचे असतात?
उत्तर – फेरोमोन सापळे ही पीक आणि किटकानुसार वेग-वेगळे असू शकतात, जसे की – कापूस पिकातील गुलाबी बोंड आळीसाठी पेक्टिनो ल्युअर असलेला सापळा, ज्वारी आणि मका पिकातील लष्करी आळीसाठी एफएडब्लयू / स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ल्युअर असलेला सापळा, सोयाबीन आणि कपाशी मधील पाने खणारी आळीसाठी स्पोडो ल्युअर असलेला सापळा, कापूस, सोयाबीन आणि तूर पिकातील हिरवी घाटे आळीसाठी हेक्सा ल्युअर असलेला सापळा, वांगे पिकातील फळ आणि शेंडा पोखरणारी आळीसाठी ल्युसीन ल्युअर असलेला सापळा.
लेखक
कृषि डॉक्टर सूर्यकांत
9168911489