शेयर करा

harbhara lagwad

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर ( Krushi Doctor ) परिवारामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत “harbhara lagwad ची संपूर्ण माहिती” बद्दल सविस्तर माहिती. तुम्हाला तर माहितीच आहे हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख कडधान्य पीक आहे. हरभरा हे पीक खास करून महाराष्ट्रामध्ये पहिले तर 18.95 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती पेरले जाते. त्याच्यामधून एकूण उत्पादन – 17.77 लाख मे टन एवढे आहे तर उत्पादकता ही – 9.5 क्विंटल / हे ( सुधारित वाण – 30 ते 35 क्विंटल / हे ) आहे.

शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे

जमीन आणि हवामान –

  1. मध्यम ते भारी
  2. पाण्याचा उत्तम निचरा होणारी
  3. कसदार , भुसभुशीत जमीन
  4. पाऊस ( 700 ते 1000 मी. मी. )
  5. तापमान ( 15 ते 25 अंश से. ग्रे )
  6. सामू ( 5.5 ते 8.5 )
  7. सेंद्रिय कर्ब ( 0.5 ते 1% )
  8. चुनखडी ( 0.1 ते 2.0 % )
  9. विद्युत वाहकता ( <0.7 मिलिम्हॉस / सेंटीमीटर )

harbhara lagwad साठी पूर्व मशागत कशी करावी ?

  1. खोल नांगरट करावी. ( 25 से. मी. )
  2. दोन कुळवाच्या पाळ्या
  3. 2 ते 3 टन चांगले कुजलेले शेणखत + 1 लीटर कंपोस्टिंग बॅक्टेरिया

हरभरा लागवड मध्ये पेरणीची योग्य वेळ –

  1. जिरायत – सप्टेंबेर अखेर ते 15 ऑक्टोबर ( खोली – 10 से. मी.)
  2. बागायती – 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ( खोली – 5 से. मी. )

पेरणी अंतर –

  1. दोन ओळीतील अंतर – 30 से. मी.
  2. दोन रोपतील अंतर – 10 से. मी.
  3. रोपांची संख्या – 3,33,000 / हेक्टरी



सुधारित वाण | harbhara lagwad –

  1. विजय
  2. विशाल
  3. दिग्विजय
  4. विराट
  5. कृपा
  6. पी. के. व्ही – 2
  7. पी. के. व्ही – 4
  8. बिडीएनजी 797
  9. फुले विक्रम

harbhara lagwad बिजप्रकिया –

  1. बुरशीनाशक – ट्रायकोडर्मा व्हीरिडी 5 ग्राम किंवा 2 ग्राम थायरम किंवा 2 ग्राम कार्बेन्डाझिम 50% WP / किलो बियाणे
  2. जिवाणू संवर्धन – अझाटोबॅक्टर – 250 ग्राम / 10 किलो बियाणे सोबतच पीएसबी – 250 ग्राम / 10 किलो बियाणे ( 125 ग्राम सेंद्रिय गूळाच्या द्रवणात वापरावे )

बियाणे प्रमाण –

  1. मध्यम दाणे – 65 ते 70 किलो हेक्टरी ( विजय )
  2. टपोरे दाणे – 100 किलो / हेक्टरी ( दिग्विजय / विराट )
  3. जास्त टपोरे दाणे – 125 ते 130 किलो / हेक्टरी ( कृपा / पी. के. व्ही. 4 )

खत व्यवस्थापन –

  1. हरभऱ्याची पेरणी करताना ८ किलो नत्र आणि १६ किलो स्फुरद व १२ किलो पालाश प्रति एकरी द्यावा.
  2. गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरदासोबत ८ किलो गंधक किंवा १० किलो झिंक सल्फेट प्रति एकरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे. म्हणजेच पेरणी करताना १२:३२:१६ – ५० किलो आणि सल्फर ८ किलो प्रति एकरी पेरणीच्या वेळी द्यावे.

अंतरमशागत | harbhara lagwad –

  1. पहिली कोळपणी – 20 दिवस
  2. दुसरी कोळपणी – 35 दिवस

हरबरा तणनाशक –

1. हरबरा पिकात इतर पिकाप्रमाणे उगवनीनंतर वापरण्यात येनारे तननाशक उपलब्ध नाही. त्यामुळे हरबर्याचे तनव्यवस्थापन करण्यासाठी पेरणी झाल्याबरोबर उगवनपुर्व पेंडीमेथलीन (Pendamethalin 38.7%) हा घटक असलेले तननाशक वापरावे. पेरणी मागे तननाशक वापरताना एक एकरसाठी 150 लिटर पाण्यामधे 700ml पेंडीमेथलीन (Pendamethalin 38.7%) चे प्रमाण घ्यावे.

2. पेरणी मागे तननाशक वापरणार्या भरपुर शेतकर्याचे असे प्रश्न असतात , कि आम्हाला औषधाचा रिझल्ट आला नाही किंवा कमी आला.तर रिजल्ट कमी येण्याचे मुख्य कारण आहे पाण्याचे प्रमाण. काहि शेतकरी औषधाचे प्रमाण जास्त वापरतात आणि पाणी कमी वापरतात. त्यामुळे जमीन योग्य प्रमाणात भिजत नाही आणी लवकर गवत उगते. पेरणीमागे पेंडीमेथलीन तननाशक फवारताना चांगल्या रिझल्ट साठी 150 लिटर पाण्यामधे 700ml पेंडीमेथलीन (Pendamethalin 38.7%) एक एकरसाठी वापरावे. म्हणजे 15 लिटरच्या पंपसाठी 70ml एवढी मात्रा घ्यावी. फवारणी करताना जमीनीत ओलावा असणे गरजेचे आहे.



पानी नियोजन | harbhara lagwad –

  1. पाहिले पानी – 25 दिवसांनी
  2. दुसरे पानी – 45 दिवसांनी
  3. तिसरे पानी – 65 दिवसांनी

( येथे शक्यतो तुषार सिंचनाचा वापर करावा. )

आंतर पीक –

  1. मोहरी
  2. करडई
  3. ज्वारी
  4. ऊस

कीड व रोग –

1. घाटे आळी

  • निंबोळी अर्क 5 %
  • कोराजन – 30 मिलि / एकर
  • फेम -100 मिलि / एकर
  • प्रोक्लेम – 100 ग्राम / एकर

2. मर
3. मूळ कुजव्या
3. मान कुजव्या

  • प्रतिबंधतां नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा १० मिली किंवा कार्बेन्डाझिम २.५ ते ३ ग्राम प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळून बीजप्रक्रिया करावी
  • हरभरा पिकात मर रोग प्राथमिक अवस्था असताना . २ लिटर ट्रायकोडर्मा २०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. 3 दिवसां नंतर मरप्रादुर्भावित भागात याचा वापर करा. किंवा तुषार सिंचन असल्यास त्यामधून १ लिटर ट्रायकोडर्मा किंवा कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ४०० ग्राम एकरी देऊ शकता

काढणी –

हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.

शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे

Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही जर हरभरा पिकाचे पेरणी पासून काढणी पर्यन्त जर नियोजन केले तर नक्कीच तुम्हाला एकरी 12 ते 15 क्विंटल इतके उत्पादन निघू शकते.  मित्रांनो तुम्हाला हा लेख जर आवडला असेल तर तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेयर नक्की करा.

प्रश्न-उत्तरे | FAQs

1. हरभरा एकरी किती पेरावे?
उत्तर – विजय सारख्या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता 30 ते 35 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या सारख्या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता 40 ते 45 किलो प्रति एकर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.

2. हरभऱ्याची राज्यात किती टन उत्पादन अपेक्षित आहे?
उत्तर – यंदा राज्यामध्ये हरभरा पिकाचे एकूण 90 ते 95 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे.

3. हरभरा वापरून कोण-कोणते अन्नपदार्थ बनवतात?
उत्तर – हरभरा दाणे वापरुन आपण पुढील अन्नपदार्थ बनऊ शकतो – फुटाणे, उसळ, मिसळ, पुरणपोळी इत्यादि. तसेच हरभऱ्याचे पीठ वापरुन ( म्हणजेच बेसल वापरुन ) आपण – शेव, भजी, वडे, फरसाण, ढोकळा, पिठले, थालीपीठ, लाडू इ. पदार्थ बनऊ शकतो.

4. हरभरा लागवड कधी करावी?
उत्तर – जिरायती हरभरा पेरणी ही सप्टेंबेर शेवटचा आठवडा ते ओक्तोंबर दुसऱ्या आठवड्या पर्यन्त करावी. बागायती हरभरा पेरणी ओक्तोंबर दूसरा आठवडा ते नोव्हेंबेर दुसऱ्या आठवड्यापर्यन्त करावी.

5. हरभरा ला इंग्लिश मध्ये काय बोलतात?
उत्तर – हरभरा पिकाला इंग्लिश मध्ये चिकपी ( Chickpea ) असे म्हणतात.

 

लेखक

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412.


शेयर करा
Scroll to Top