नमस्कार शेतकरी मित्रांनो ! Krushi Doctor परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “rhizome rot रोग नियंत्रणाची संपूर्ण माहिती ” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत.तुम्हाला तर माहितीच आहे की दर वर्षी हळद तसेच आदरक उत्पादक शेतकरी हे कंदकूज या रोगासाठी किती त्रस्त असतात. त्यासाठी ते खूप साऱ्या आळवण्या तसेच फवारण्या ( बुरशीनाशकांच्या ) करत असतात परंतु त्यांना इतका खर्च करून देखील म्हणावे तसे रिजल्ट मिळत नाहीत. म्हणूनच हळद आणि आदरक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण कंदकूज रोग येण्यामागची कारणे, त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे तसेच त्यावरील ठोस उपाय योजना पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर हळद किंवा आदरक उत्पादक शेतकरी असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. चला तर सुरू करूया –
rhizome rot येण्यामागची कारणे –
1. हळद पिकातील कंदकूज या रोगास फ्युजॅरियम, पिथियम, फायटोप्थोरा आणि रायझोक्टोनिया या बुरशी कारणीभूत असतात.
2. दमट व ढगाळ हवामान या रोगास अनुकूल असते.
3. शेतात सतत पानी साचुन राहत असल्यास हा रोग जास्त प्रमानात पसरतो.
( हळद कंदकूज रोग नियंत्रनाची संपूर्ण माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Youtube Channel )
rhizome rot रोगाची लक्षणे कोणती आहेत ?
1. या रोगाची लक्षणे तुम्हाला प्रथम रोपाच्या वरच्या बाजूला म्हणजेच कोवळ्या पानावर सहज पणे दिसून येतात.
2. पाने पिवळी पडतात व शेंडयाकडून वाळू लागतात.
3. ते रोप उपडून पहिले तर मुळी व कंदाचा भाग का काळा पडतो व हळू-हळू मऊ पडतो.
4. त्यातून एक उग्र गहान वास देखील येऊ लागतो.
5. तो कंद दाबून पाहिल्यास त्यातून उग्र द्रव बाहेर येऊ लागतो.
कंदकूज रोगाचा प्रसार कसा होतो ?
1. या रोगाचा प्रसार हा अनुकूल वातावरणात जास्त होतो.
2. सतत पानी साचून राहिल्यास हा रोग जास्त प्रसारतो.
3. अश्या शेतात मशागत केल्यास एका रोगी रोपापासून रोग दुसऱ्या निरोगी रोपाला होऊ शकतो.
rhizome rot रोगाचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे ?
अ) हळद पिकावरील कंदकूज नियंत्रणासाठी स्पेशल आळवण्या ( Drenching )
1. पाण्याचा निचरा करावा.
2. शेतामध्ये पानी जमा होऊ देऊ नये.
3. अंतर मशागत करताना कंदाला इजा होऊ देऊ नये.
4. ट्रायकोडर्मा व्हीरीडी – एकरी 2 किलो मातीत मिसळावे .
5. कार्बेन्डाझिम 50% WP – 1 ग्राम / लीटर पानी ( Bavistin , Crystal crop science )
6. मॅन्कोझेब 75% WP – 2 ग्राम / लीटर पानी ( Indofil M-45 )
7. कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP – 3 ग्राम / लीटर पानी ( Blitox , Tata rallis )
( हळद कंदकूज रोगाचे नियंत्रण या प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
ब) हळद पिकावरील कंदकूज नियंत्रणासाठी स्पेशल फवारण्या ( Spray )
1. मेटलॅक्सिल 4% + मॅन्कोझेब 64% WP – 2 ग्राम / लीटर पानी ( Ridomil gold , Syngenta )
2. हेक्साकोनाझोल 5% EC – 1 मिलि / लीटर पानी ( Contaf , Tata rallis )
3. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर करावी
4. फवारणी करताना स्टीकर चा वापर अवश्य करावा ( प्रमाण – 1 मिलि / लीटर पानी )
सोबतच काही स्मार्ट टिप्स
1. वरील फवारन्या व आळवण्या ह्या सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. यासाठी वापरण्यात येणारे पानी हे 6.5 ते 7.5 ph चे असावे.
3. फवारणी किंवा आळवणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. फवारणी किंवा करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
5. फवारणी किंवा आळवणी मिश्रनामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नये.
Conclusion | सारांश –
शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा हा लेख तुम्हाला खूप आवडला आहे. आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या हंगामात होणार आहे. वरील माहितीनुसार आपण जर हळद पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या केळी पिकाचे नियोजन केले तर हळद पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह कंदकूज रोगाचे नियंत्रण करू शकतो.
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. हळद आणि आदरक मध्ये कंदकूज रोग कशामुळे होतो?
उत्तर – कंदकूज हा रोग पायथियम ऍफेनिडरमेटम ( Pythium aphanidermatum ) या बुरशी मुळे होतो. ही एक माती मधून उद्भवणारी हानिकारक बुरशी आहे.
2. हळदीमध्ये बुरशीची वाढ होऊ शकते का?
उत्तर – नक्कीच हळद एक पीक आहे आणि पीक म्हणल की वेग-वेगळ्या मित्र आणि शत्रू बुरश्या ह्या आल्याच.
3. कच्च्या हळदीपासून किती हळद?
उत्तर – एक सोपे गणित लावले तर आपल्याला 250 ग्राम ताज्या हळदी पासून 70 ग्राम हळद पावडर मिळू शकते.
4. हळदीच्या रोगावर नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर – या साथी आपलीला हळद पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन हा उपक्रम राबवावा लागेल. म्हणजे हळद पिकामध्ये सुरुवातीपासून वेग-वेगळ्या पद्धतीने कीड नियंत्रण करावे लागेल. मगच ही शक्य होईल.
5. हळद राईझोम कशासाठी चांगले आहे?
उत्तर – हळदीमध्ये बरेच गुणकारी गुणधर्म आहेत. जसे की शरीराची संपूर्ण ऊर्जा मजबूत करणे, वायूपासून मुक्त होणे, जंत दूर करणे, पचन सुधारणे, मासिक पाळीचे नियमन करणे, पित्ताशयातील खडे विरघळवणे आणि संधिवात दूर करणे इत्यादि.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489