नमस्कार शेतकरी मित्रांनो ! Krushi Doctor परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “kapus favarni niyojan ची A to Z माहिती” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत.तुम्हाला तर माहितीच आहे की कापूस उत्पादक शेतकरी हे वेग-वेगळ्या कीड आणि रोगाने किती त्रस्त असतात. त्यासाठी ते खूप सारे प्रयत्न देखील करत आहेत परंतु त्यांना इतका खर्च करून देखील म्हणावे तसे रिजल्ट मिळत नाहीत. म्हणूनच खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण कापूस पिकावर sucking pest of cotton म्हणजेच मावा ( cotton aphid ), तुडतुडे ( cotton thrips ) आणि पांढरी माशी ( cotton whitefly ) येण्यामागची कारणे, त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे तसेच त्यावरील ठोस उपाय योजना पाहणार आहोत. तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतरकांदा उत्पादक शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करा . चला तर सुरू करूया –
1. sucking pest of cotton ची लक्षणे कशी ओळखायची ?
1. पाने पिवळी पडतात.
2. पानावर पांढरे व तांबरत ठिपके पडतात.
3. पाने कालांतराने वाळून जातात. त्यांची गळ होते.
4. पाते गळ देखील दिसून येते.
5. पाने गुंडाळळी जातात व झाडाची वाढ प्रकाश संश्लेषण न झाल्यामुळे खुंटते.
5. बोंडाची क्वालिटी खराब होते.
( Krushi Doctor Website प्रमाणेच आमचा एक यूट्यूब चॅनल आहे, तेथे तुम्ही अशीच माहिती विडियो स्वरूपात पाहू शकता. – Krushi Doctor Youtube Channel )
2. कापसावर sucking pest येण्याची कारणे कोणती आहेत ?
1. सततचे दमट व ढगाळ वातावरण.
2. नत्र युक्त खतांचा अतिरिक्त वापर.
3. अपुरे खत व्यवस्थापन.
4. पांढऱ्या मुळीची वाढ थांबणे.
5. माती मध्ये पानी साचून राहणे.
3. कापसावरील मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे साठी kapus favarni niyojan –
अ) kapus favarni niyojan मधील निवारक उपाय ( प्रादुर्भाव कमी असताना ) –
1. प्रादुर्भाव हंगाम – सप्टेंबेर ते नोव्हेंबेर ( अधिक )
2. प्लॉट चे वेळो – वेळी निरीक्षण करावे .
3. प्लॉट हा तण मुक्त ठेवावा
4. नत्र युक्त खतांचा संतुलित वापर करावा ( मातीपरीक्षण करावे )
5. परोपजीवी कीड संवर्धन ( उदा – ढालकिडा, सीरफीड माशी, क्रायसोपा )
6. पिवळे चिकट सापळे ( एकरी – 10 ते 15 )
( कापूस पिकाप्रमानेच प्रमाणेच आमचे इतर लेख पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
ब) kapus favarni niyojan मधील प्रतीबंधात्मक उपाय ( प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर ) –
1. खालील कीटकनाशकांच्या आलटून-पालटून फवारण्या घ्याव्या.
➡निंबोळी अर्क ( 5% ) —– 2 ते 3 मिलि
➡फ्लॉनिकॅमिड 50 WG —– 0.3 ग्राम ( Ulalla , UPL )
➡थायामेथोक्सम 25% Wg —– 0.2 ग्राम ( Actra , Syngenta )
➡बुप्रोफेझिन 25% Sc —– 2 मिलि ( Banzo , Biostadt )
➡फीप्रोनील 5% एससी —– 3 मिलि ( Regent , Bayer )
➡डायफेंथियुरॉन 50% w/p —– 1.2 ग्राम ( Pegasus , Syngenta )
➡एसीफेट ५०% + इमिडाक्लोप्राइड १.८% एसपी —– 2 ग्राम ( Lancergold , UPL )
➡स्पिनेटोरम 11.7% SC —– 3 मिलि ( Largo , Dhanuka )
3. Conclusion | सारांश –
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मी आशा करती की Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा “kapus favarni niyojan ची A to Z माहिती” हा लेख तुम्हाला आवडला आहे. आणि तुम्ही तो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेयर नक्की कराल. वरील माहितीनुसार आपण जर आपल्या कापूस पिकाचे नियोजन केले आणि योग्य ती काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला, तर आपण देखील सहज पने कमी उत्पादन खर्चासह कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो.
4. FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. कापसासाठी सर्वोत्तम खत कोणते आहे?
उत्तर – असे सांगणे कठीण आहे. कारण माती परीक्षण आणि कापूस पिकातील अन्नद्रव्य कमतरता यावर अवलंबून असते की आपण कोणते खत टाकायला हवं. त्यामुळे अभ्यास करून गरजेनुसार खत मात्रा द्यावा. यासाठी तुम्ही – महधान, जय किसान, ग्रोमोर, इफ्फको, आरसीएफ अशा नामांकित निवड करू शकता.
2. कपाशीची पेरणी कोणत्या महिन्यात होते?
उत्तर – कापूस पिकाची बाययाती पेरणी ही एप्रिल-मे महिन्यात केली जाते तर कापसाची पावसावर आधारित पेरणी ही जून-जुलै दरम्यान केली जाते.
3. कापसासाठी एकरी किती खत द्यावे?
उत्तर – कापूस पिकासाठी प्रती एकरी तुम्ही – 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश देऊ शकता. परंतु हे एक सर्वसाधारण गणित आहे. अचूक निदान करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मातीचे माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
4. संकरित कापसासाठी खत वापरण्याची कोणती पद्धत चांगली आहे?
उत्तर – यासाठी तुम्ही तुमच्या मातीचे माती परीक्षण करून आवश्यक अन्नद्रव्य माती मध्ये मिसळू शकता. जर तुमच्या कडे ड्रीप असेल तर तुम्ही शिफारशीत विद्राव्य खते ड्रीप ने देखील देऊ शकता. पण जर पाऊस आणि वातावरण ढगाळ असेल तर हीच खते आपण फवारणी मधून देखील देऊ शकता.
5. कापसाला कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे?
उत्तर – कोणत्याही पिकाला एकूण 13 पोशाक घटकांची गरज असते. त्यांची नावे पुढील प्रमाणे – नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मॅंगनीज, लोह, जस्त, कोबाल्ट आणि मॉलिब्डेनम.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489